शिरस्त्राण ' हा सध्या पुणेकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. परवा पुण्यात गेलो असताना एका मित्राला दोन चाकी गाडी मागितली, त्याने दिली आणि ' शिरस्त्राण ' देण्याची मागणी केली असता म्हणाला 👇🏻
(चाल : हे वेड मजला लागले , तुजलाही ते लागेल का ? )
हे ल्मेट मजला लागते , तुजलाही ते चालेल का ?
माझ्या डोक्यातील ही ' उवा ' कोणी तुला दावेल का ?
हे ल्मेट मजला लागते. . . . .
मी घालतो स्वप्नी सुद्धा , मी घालतो जागेपणी
जो मी निषेध करितो, सत्यात तो येईल का ?
हे ल्मेट मजला लागते. . . .
ही वाट घटकेची जरी , 'घामा'ळ मी पण जाहलो
जे वाचले माझे ' मनी' , पार्टित ते संपेल का ?
हे ल्मेट मजला लागते. . . .
माझे "मनोगत" मी तुला केले निवेदन आज, हे
सर्वस्व हे 'हेल्मेट' माझे,डोस्क्यात तुझ्या शिरेल का?
हे ल्मेट मजला लागते. . . . .
🛵 --------------------> 🚲
अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
a.kelkar9@gmail.com
📝 पौष शु ३

No comments:
Post a Comment