काल एक मला अनोखी धमकी मिळाली 
धमकी दिली ओळींनी
चारोळी करू खराब
एकतीसला जर दिली नाहीस
प्यायला थोडी शराब
चारोळी करू खराब
एकतीसला जर दिली नाहीस
प्यायला थोडी शराब
म्हणलं ठीक आहे, ३६४ दिवस मी आठवण काढली की तुम्ही येता , एक दिवस तुमच्या मनासारखे होउ दे . बोला, कुणा कुणाला काय काय पाहिजे
शब्दाने केलेली सुरवात म्हणाला
मी घेईन बिअर खास
बायकोमधेच मग मला
प्रेयसीचा होईल भास
मी घेईन बिअर खास
बायकोमधेच मग मला
प्रेयसीचा होईल भास
वेलांटी लगेच म्हणाली
मला चालेल जींन
पण तू शेजारी बसलास
तरच मी थोडी पीन
मला चालेल जींन
पण तू शेजारी बसलास
तरच मी थोडी पीन
यमक म्हणाले माझ्यासाठी
रेड किंवा व्हाईट वाईन
रजनीकांत ही म्हणेल मग
कविता आहे बडी साईन
रेड किंवा व्हाईट वाईन
रजनीकांत ही म्हणेल मग
कविता आहे बडी साईन
वृत्त म्हणाले पिताना
कॉकटेल घ्यायचे माझे सूत्र
येताना मी बांधून ठेवलय
गल्लीतलं ते काळं कुत्र
कॉकटेल घ्यायचे माझे सूत्र
येताना मी बांधून ठेवलय
गल्लीतलं ते काळं कुत्र
अनुस्वारला बोलतानाच
लागत होता मोठा दम
म्हणलं थाब ! माहीत आहे मला
तुला पाहिजे नेहमीची रम
लागत होता मोठा दम
म्हणलं थाब ! माहीत आहे मला
तुला पाहिजे नेहमीची रम
गण म्हणाले ' डायट कोक'
फारच सुटलय माझं पोट
कालच मला मिळाली आहे
एटीम मधून पाचशेची नोट
फारच सुटलय माझं पोट
कालच मला मिळाली आहे
एटीम मधून पाचशेची नोट
सगळ्याच ऐकून म्हणणे
मी म्हणालो ,
मी म्हणालो ,
प्या एक दिवस सगळे
पण जरा जपून
पोलिस दिसलाच समोर
तर कवितेतच राहा लपून
पण जरा जपून
पोलिस दिसलाच समोर
तर कवितेतच राहा लपून
( टुकार ई -चार अनुदिनी तर्फे (www.poetrymazi.blogspot.in) येणा-या सर्व नवीन दिवसाच्या साहित्यिक शुभेच्छा )
