२०१६ -----> २०१७
सोळावं वर्ष हे धोक्याचं , तर सत्राला असेल खतरा
नवीन वर्षाच्या सुरवातीलाच 
वेळेवर जागा हो मीतरा 
सोळावं वर्ष हे धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा
मंगल पहाटे मंदिरातून 
ऐकूया सुरेख अंतरा 
सोळावं वर्ष हे धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा
नोटबंदी केशलेस व्यवहार 
थोडावेळ तरी विसरा
सोळावं वर्ष हे धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा
ग्रह ता-यांना कामाला लावून 
जोतिषी देऊ दे मंतरा 
सोळावं वर्ष धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा
वेस्टर्नच्या मुलींचा सेंट्रलवाला 
सहन करतोय नखरा
सोळावं वर्ष हे धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा
टुकार कवी अमल्याने केलीय
चार ओळीची स्पेशल जतरा 
सोळावं वर्ष हे धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा....
मजा आली असेल वाचून
तर चेहरा करा हसरा 
सोळावं वर्ष धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा
टुकार कवी - अमोल
No comments:
Post a Comment