करूण नायरने क्रिकेटमध्ये तीनशेचा टप्पा पार केला आणि क्रिकेटच्या या साहेबासाठी आम्हाला हे काही शब्द सुचले ....
( चाल : तरुण आहे रात्र अजूनही )
करुण भासे संघ अजुनी , साहेबा हरलास का रे ?
तीनशेच्या त्या खेळीवर तू सुद्धा भाळलास का रे ?
अजुनही दिसतील सदनी चौकाराच्या सर्वमाळा
अजुन तो दमला कुठे रे ? हाय ! तू दमलास का रे ?
सांग ह्या चेन्नईच्या मैदानाला काय सांगू ?
उमलले रोमांच सारे , .. पण तू झुकलास का रे ?
बघ तुला दिसत होता षटकातला चेंडू सारा
चेंडूफळीच्या खेळाचा गंध तू मुकलास का रे
उसळती विराट अशा प्रेक्षकांच्या धूंद लाटा
तू क्षेत्र-रक्षूनी सारे कोरडा ठरलाय का रे ?
No comments:
Post a Comment