नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, December 21, 2016

भले भले ते पिऊन गेले


मागील काही दिवस आम्ही नोटबंदी सप्ताह पाळला , आता ३१ डिसेंबर सप्ताह करायचा ठरवलाय. या सदरातला  हा दुसरा अध्याय 

भले भले ते पिऊन गेले 
विसळून घेऊ पेले भरभर 
जरा विसावू या धाब्यावर 

असे कुठूनही येतो आपण 
काही न कळता देतो ऑर्डर 
असेच बसतो उगाच हसतो 
क्षणात वेटर करतो सादर 


कधी रम ही आम्ही चाखली 
तरी  चाललो सरळ पावली 
बर्फ  टाकुनिया घेती सारे 
चकणा घेउनी ये रे लवकर 




खेळ जुना हा पिण्यापिण्याचा 
रोज पिऊनी  बरगळण्याचा 
पेग चढता जाताजाता 
येते आपले स्टेशन नाहूर 


अमोल संकल्पना 

मूळ गाणे : - 
भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर


कधी ऊन तर कधी सावली

कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...