.एका आईने या अमावस्येला ' गटार माई ' जवळ व्यक्त केलेले भावनिक विचार कवितेतून :
अमावस्येला गटार गंगे
विनंती करते तूला
पडलं जरी माझं पोरं
सांभाळून घे त्याला
अमावस्येला नसतेच ग
नभामध्ये चंद्र कोर
नित्याच्याच बार मधे
पित असेल माझे पोर
समजवायला गेले तर म्हणतो
पुरे झाली तुझी मचमच
कस सांगायचं याला आता
काय खोटं असतं आणि काय सच .
चूक माझीच झाली कारण
वेळीच उगारला नाही हात
कधीच नाही आलं पोरगं
बाराच्या आत घरात
देवघर , उंबरठ्या बरोबरच
तुझ्यापाशी ही एक दिवा ठेवीन
न धडपडता पोरग घरी आलं
तरच चार घास जेवीन
असेल जरी आईची भावना
एकदम टुकारी
काळजीपूर्वक सगळेजण
साजरी करा गटारी
माझे टुकार विचार
३/७/२०१७
.एका आईने या अमावस्येला ' गटार माई ' जवळ व्यक्त केलेले भावनिक विचार कवितेतून :
अमावस्येला गटार गंगे
विनंती करते तूला
पडलं जरी माझं पोरं
सांभाळून घे त्याला
अमावस्येला नसतेच ग
नभामध्ये चंद्र कोर
नित्याच्याच बार मधे
पित असेल माझे पोर
समजवायला गेले तर म्हणतो
पुरे झाली तुझी मचमच
कस सांगायचं याला आता
काय खोटं असतं आणि काय सच .
चूक माझीच झाली कारण
वेळीच उगारला नाही हात
कधीच नाही आलं पोरगं
बाराच्या आत घरात
देवघर , उंबरठ्या बरोबरच
तुझ्यापाशी ही एक दिवा ठेवीन
न धडपडता पोरग घरी आलं
तरच चार घास जेवीन
असेल जरी आईची भावना
एकदम टुकारी
काळजीपूर्वक सगळेजण
साजरी करा गटारी
माझे टुकार विचार
३/७/२०१७
No comments:
Post a Comment