नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, July 18, 2017

माझी 'मटारगिरी '



करू मटारी  , मौज हीच वाटे भारी 

नवरत्न सोसायटीचे अध्यक्ष   ' काय. अप्पा खवखवे'   यांनी रात्री जाहीर केले की  यंदा सोसायटीत ' मटारी '  उत्सव जोरात साजरा करायचा .गेल्या अनेक दशकात  सोसायटीत  या ना त्या  कारणाने  हा उत्सव करायचे राहून जात होते . यंदाची अमावस्यां रविवारी आल्याने  तयारीला  आणि कार्यक्रम साजरा करायला  पुरेसा अवधी मिळणार होता 
रोजच्या रोज त्या चिकन मटण  बिर्याणी कबाब तंदुरी  पापलेट सुरमयी  पासून काही तरी वेगळे  खायला मिळणार  याची उत्सुकता सर्वानाच  होती 
या कार्यक्रमासाठी  खास कमिटी नेमण्यात आली. कमिटीतील काही सदस्यांनी खास ए. पी. एम . सी  मार्केट  वाशीहून  ' मटार ' आणू या असे सुचवले . प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आधी  महिलांसाठी ' सोल मिनिस्टर ' अर्थात मटार सोलण्याची  स्पर्धा घ्यायचे ठरले जेणेकरून  ते सोललेले मटार  वेगवेगळ्या पाककृतीत वापरता येतील . त्यातीलच काही मटार घेऊन लहान मुलांसाठी अर्थातच ' मटार चमचा ' ' हवेतील मटार तोंडात ' अशा स्पर्धेचे आयोजन करावयाचे ठरले . गण्याने तर उत्सवासाठी प्रायोजक मिळ्वण्यासाठी  म.टा त  जहिरात देऊया असेही सुचवून पाहिले 
प्रत्यक्ष  ' मटारीचा ' मेनू ठरवताना मात्र खूप दमछाक झाली. शेवटी काय अप्पा यांना अथक प्रयत्नांतर  मेनू ठराव्यात यश आले. 
१) ' मटारी ' महोत्सव असल्याने सुरवातीला  लहान मुलांना   ' स्वीट मटर  सूप ' आणि मोठ्यासाठी  ' मटारी  वाईन '   ठेवायचे ठरले.
 २) सोबत स्टार्टर म्हणून  मटार पॅटिस, कोबी- मटार - बटाटा भजी  इ इ 
३ ) जेवायला - मटार करंजी  , अक्खा मटार , मटर पनीर मसाला आणि  मटर के परोठे असा जगी बेत ठरला आहे 
 ४ ) उत्सवात काहीच गोड नाही का ? या भावे आजीच्या प्रष्णांवर  शेवटी  ' मटार हलवा ' ठेवायचे ठरले.

बेत तर ठरला आहे आता  सगळे वाट पहात आहेत ' मटारीचा ' दिवस येण्याची 

करू मटारी  , मौज हीच वाटे भारी 

अमोल 

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...