सध्या अनेक ग्रुपची अवस्था पाहून आम्हाला हे बालगीत आठवले . वय वर्ष ४० च्या आसपासच्या सर्व ग्रुपमधील बालगोपाळांना समर्पित
महत्वाची सूचना : - *मनोरंजन हाच हेतू , असा ग्रुप कुठेही सापडणे शक्य नाही* ( ~म्हणूनच सापडला तर योगायोग समजावा या वाक्याला अर्थ नाही~)
( चाल : टप टप टप टप थेंब वाजती , गाणे गातो वारा )
-----------------------------------------
पट पट पट पट मित्र गळती , स्तब्ध ग्रुप सारा
विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा
लोच्या झाला हो लोच्या झाला.
नमो रागावर ना-ताळ्यावर झाली धुसफूस वाणी
कुरकुरती मागे बोलून सगळी इथली शहाणी
अवती भवती मिटून नाती, द्वेष भरला सारा
विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा
लोच्या झाला हो लोच्या झाला.
मुद्देसूद तत्वांना झाली कोसळण्याची घाई
तिखट एवढे बोल वाचुनी ग्रुप सोडतात ताई
आनंदे लिहीतच जाई टुकार विसरून मारा
विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा
लोच्या झाला हो लोच्या झाला.
📝२७/१२/१८
विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो . . ..
poetrymazi.blogspot.in
मुळ गाणे:-
टप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा
विसरा आता पाटी-पुस्तक, मजेत झेला धारा
पाऊस आला, रे पाऊस आला
घरा-घरावर, कौलारावर, आले झिमझिम पाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवी-हिरवी गाणी
अवती-भवती भिजून माती, सुगंध भरला सारा
काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
आनंदे हंबरती गाई समोर विसरून चारा
महत्वाची सूचना : - *मनोरंजन हाच हेतू , असा ग्रुप कुठेही सापडणे शक्य नाही* ( ~म्हणूनच सापडला तर योगायोग समजावा या वाक्याला अर्थ नाही~)
( चाल : टप टप टप टप थेंब वाजती , गाणे गातो वारा )
-----------------------------------------
पट पट पट पट मित्र गळती , स्तब्ध ग्रुप सारा
विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा
लोच्या झाला हो लोच्या झाला.
नमो रागावर ना-ताळ्यावर झाली धुसफूस वाणी
कुरकुरती मागे बोलून सगळी इथली शहाणी
अवती भवती मिटून नाती, द्वेष भरला सारा
विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा
लोच्या झाला हो लोच्या झाला.
मुद्देसूद तत्वांना झाली कोसळण्याची घाई
तिखट एवढे बोल वाचुनी ग्रुप सोडतात ताई
आनंदे लिहीतच जाई टुकार विसरून मारा
विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा
लोच्या झाला हो लोच्या झाला.
📝२७/१२/१८
विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो . . ..
poetrymazi.blogspot.in
मुळ गाणे:-
टप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा
विसरा आता पाटी-पुस्तक, मजेत झेला धारा
पाऊस आला, रे पाऊस आला
घरा-घरावर, कौलारावर, आले झिमझिम पाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवी-हिरवी गाणी
अवती-भवती भिजून माती, सुगंध भरला सारा
काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
आनंदे हंबरती गाई समोर विसरून चारा
No comments:
Post a Comment