🔅🔆 उत्प्रेरक -(अर्थातच कॅटॅलिस्ट) 🔆🔅
मंडळी 🙏🏻
मला वाटत आपण ८ वी ते १० वी मध्ये कुठल्यातरी वर्षी रसायन शास्त्र या विषयात हा विषय शिकलोय . 'उत्पेरकाची' शास्त्रीय दृष्ट्या व्याख्या :-
"ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे एखाद्या रासायनिक विक्रियेचा/प्रक्रियेचा वेग बदलतो अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात व या क्रियेला उत्प्रेरण म्हणतात".
ब-याचदा हा उत्प्रेरक प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या उपस्थितीमुळे मात्र इतर सुप्त घटक अचानक जागे होऊन रासायनिक क्रिया घडते ( घटना घडते )
मंडळी , प्रत्यक्ष आपल्या जीवनातही असे अनेक उत्प्रेरक कळत-नकळत येतात जे आपल्याला मदत करून जातात ,आपल्या जीवनाला कलाटणी देतात, या घटनेनंतर मी बदललो, माझ्यात बदल झाला असे आपणास वाटायला लागते .
अशा सर्व घटना, संबधीत व्यक्ती, परिस्थिती हे आपल्यासाठी उत्प्रेरकच . प्रत्येकाने हे उत्प्रेरक आपापले शोधायचे .
काही उत्प्रेरकांचा सरळ सहभाग असतो. उदा. आपले पालक - नातेवाईक , मित्र , शिक्षक इ, जे आपल्याला वेळोवेळी भानावर आणतात , रागवतात , टोचून बोलतात पण हे ते सगळं करतात ते आपल्या भल्यासाठी. आपल्यातील सुप्त गुण ( चांगले ) वाढीस लागून एका विशिष्ट दिशेने ( फोकस) आपला प्रवास व्हावा असा त्यांचा उद्दात्त हेतू असतो. कधी कधी मला असे वाटते 'निंदकाचे घर असावे शेजारी ' असे म्हणले जाते ते याच आपल्या फायद्यासाठी.
काही उत्प्रेरक आपण लांबून बघतो, टीव्हीवर बघतो , काही आपले आदर्श असतात पण त्यांचा प्रत्यक्ष आपल्याशी कधी संबंध आलेला नसतो. ते आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात, आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. आपल्या यश -अपयशाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नसतो, ते आपल्याला ओळखतही नसतात पण त्यांच्या बाबतची एखादी गोष्ट , घटना आपल्याला मात्र एखादे ध्येय ठेऊन वाटचाल करायला प्रवृत्त करते.
अरे काय काढली मॅच त्याने ! वाटलं नव्हतं जिकेलं, अशी घटना आपल्याला स्फूर्ती देऊन जाते ( अशक्य वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात घडणे).
एखाद्या वक्त्याचे व्याख्यान, एखादे प्रवचन, एखादे ऐतिहासिक पुस्तक , सिनेमा , लहान वयात यशाच्या शिखरावर गेलेल्या व्यक्ती , एखादं मस्त गाणे , मित्रांबरोबरची / समवयस्क व्यक्तींबरोबरची सहल, सूर्योदय / किंवा सूर्यास्ता वेळचे विलोभनीय दृश्य इ इ इ
अशा उत्प्रेरकांना शोध आपण आपल्या पद्धतीने घ्यायचा. कधी कधी आपण स्वतः :इतरांसाठी असा उत्प्रेरक बनायचं.
खाली लिहिलेली काही वाक्य -ve म्हणून वापरलेली आपण नेहमीच बघतो/ ऐकतो, पण ही वाक्य आपण एक चॅलेंज म्हणून घेतली तर यांच्यासारखा उत्पेरक नाही. आता जेंव्हा केंव्हा अशी वाक्ये 👇🏻ऐकाल तेंव्हा हे लिखाण आठवा आणि दुप्पट जोमाने कामाला लागा 😉
🗣तुला आयुष्यात काहीही जमणार नाही
🗣एक गोष्ट व्यवस्थित केलीस तर शप्पथ
🗣हे ! शक्यच नाही तूला जमणे.
🗣तुझे काय कर्तृत्व ? सगळं आयत मिळालय तुला ?🤭
🗣काय टुकार / सुमार/ घाणेरडं लिहितोस.
इ इ इ इ. 😛
'कौतुकाचे दोन शब्द' जसे जरुरी आहेत तसेच ही 'उत्प्रेरके' ही 'मोलाची' आहेत हे नक्की
मंडळी, कधी कधी गावाबाहेरच्या देवळात जाऊन ( गर्दी नसलेल्या ठिकाणच्या )
गाभा-यातील मूर्तीला मनापासून केलेला नमस्कार आणि त्यातून मिळालेली आंतरिक शांती , समाधान हे पण एक वेगळे उत्प्रेरकच नाही का?
घेतलाय तुम्ही हा स्वर्गीय अनुभव ????
या लेखनाची समाप्ती श्री रामदास स्वामींच्या या काही ओळीने 🌷
हवाया नळे बाण भांडी अनंते !
बळे सोडितां जाति आकाशपंथे !
बती लागता वेळ नाही उठाया !
तयाचे परी स्फूर्ती दे देवराया !!
सर्वांचे कल्याण होऊ दे हीच इच्छा 🙏🏻
📝अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment