नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, May 4, 2020

तूला पाहतो ग


करोनाला न जुमानता सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणा-या, चांदा पासून बांद्या पर्यंतच्या सर्व तळीरामांना( योध्दयांना 🏇🏻 ) समर्पित 🥴
🍺🍷🥃🍸🥂🍻


( मुळ गाणे: तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पहाते)

तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझी चव माझ्या गळी ठेवतो
तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझ्यासाठी रांगेत उभा राहतो

तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या मिळण्याने मनी प्रित जागे
तुझ्या दर्शनाने सुखी होवतो

तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझ्यासाठी रांगेत उभा राहतो


किती भाग्य हे 'लाॅक डाऊन' असुनही
दिसे ग्लास झोपेत जागेपणीही
'चणे चकण्याचे' आता मागतो

तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझ्यासाठी रांगेत उभा राहतो

कधी 'भक्त' का पाहतो ईश्वराला
नदी न्याहाळी का कधी सागराला
त्यांचा सारखा मी सदा वागतो

तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझ्यासाठी रांगेत उभा राहतो

📝अमोल केळकर
०४/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...