'लस'श्वी भव | 💉
एक लाजरा न साजरा मुखडा, चंद्रावाणी फुलला ग
राजा मदन हसतोय असा की'मास्क' आता सुटला ग
या लसीकरणाचा तुला इशारा कळला ग 😌
'लस ' आडवी येते मला की जीव माझा दुखला ग 😏
नको राणी नको लाजू, दंडावर आता घेऊ
इथं तिथं नको जाऊ ,सेंटरला सरळ जाऊ
का?
टोचत्यात 💉😩
वाफेचा विळखा घेऊन सजणा नको तो घसा धरु
खसाखसा हात धुवून भोळं फसलंय फुलपाखरु
आता मिळावा पुन्हा 'लसीचा' मोका दुसरा ग
राजा मदन हसतोय असा की'मास्क' आता सुटला ग 🤡
डोळं चोळून, पाणी पिऊन,झुकू नका हो फुडं
पटकन पटकन, आवरून सगळं जाऊ या तिकडं
*लई दिसान सखे आज या,"ओळी" जमल्या ग*📝
राजा मदन हसतोय असा की'मास्क' आता सुटला ग 🤡
( पुण्याहून कॅमेरामन 📹 टूच सह मी 'टुकार पूनावाला' , टवाळखोरी माझी 😝)
अमोल केळकर
१७/०१/२०२१
No comments:
Post a Comment