'सेंचुरी' पर्यत पोहोचलेल्या सर्वांच्या लाडक्या 'पेट्रोल' ला समर्पित 💐
( * मनोरंजन हा हेतू )
पाहिले न मी तुला, तरी भरून घेतले
न कळे कधी कसे, "मनी" सर्व संपले
नित्य वाढणारा 'दर' तुझा पाहुनी
'बॅनर' सडलेले,लाजले मनातूनी
चुपचाप हरी - तुषार, घरातच थांबले
न कळे कधी कसे, "मनी" सर्व संपले
का उगाच काढिशी, कार तू साजणी
सांगतो गुपित गोड, ठेव आज अंगणी
'मन की बात' ऐकीत, देहभान हरपले
न कळे कधी कसे, "मनी" सर्व संपले
मृदूसीट टोचते, स्वप्न भंगे लोचनी
पाहिले ते आकडे, पंपावरी त्या क्षणी
अच्छे दिन हे बघून, नयन हे सुखावले
न कळे कधी कसे, "मनी" सर्व संपले
पाहिले न मी तुला. 🙈
( डिझेल प्रेमी ) अमोल 🚗
३०/०१/२०२१
No comments:
Post a Comment