नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, February 1, 2021

तुम जियो हजारो साल.


 "तुम जियो हजारो साल , साल के..."


मंडळी नमस्कार ,


साधारण १९६० सालात , 'सुजाता' सिनेमातील  आशा ताईंनी गायलेले हे गाणे आज ध्रुव ता-याप्रमाणे अढळ स्थानी आहे.  जगात  दररोज हजारो 'जन'  जन्मास येतात. त्यांच्या प्रारब्ध/ कर्म / मेहनत / नशीबाने  ते  इतरांच्या दृष्टीने लोकप्रिय ज्याला आपण 'प्रसिद्ध' म्हणू असे बनतात . ही  प्रसिद्ध लोकं  जशी काही विशिष्ठ योगावर जन्मतात  ( काही  खास योग असतीलच ना त्यांच्या पत्रिकेत ) त्याप्रमाणे काही कलाकृती मग तो लेख असेल / गाणे असेल एका विशेष योगावर जन्म घेऊन येतात असं नेहमी मला वाटतं . त्यातलंच हे गाणं . 


ज्याचा वाढदिवस आहे त्याला/ तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हे गाणे अनेकांकडून वापरलं जाते. प्रॅक्टिकली कुणी हजारो वर्ष जगणार नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे पण आज मी हे  सांगू शकतो की  हे गाणे मात्र पुढील हजारो वर्षे  वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना  म्हणले जाईल. 


" *दुस-याचे चांगले चिंताल , तर आपल्याला ही तसेच मिळते "  याचे उत्तम उदाहरण म्हणजे  हे गाणे नाही का* ?


मंडळी,आजच्या स्तंभ लेखनाचा  विषय तुमच्या लक्षात आलाच असेल तो म्हणजे "वाढदिवस".  नवीन वर्षाची दिनर्शिका आली की या वर्षी आपला वाढदिवस केव्हा ? म्हणजे कुठल्या वारी आहे, त्यादिवसी  सुट्टी आलीय का , शनिवार/ रविवार आलाय का   हे पाहण्याची उत्सुकता मला तरी असते.  वाढदिवसाचे सेलिब्रेशन  हा  मन खूश करणारा प्रकार. 

"अजून एक वर्षाने म्हातारे झालो , यात काय सेलिब्रेशन करायचे?" असे म्हणणारे  मला अरसिक किंवा  भूतलावरचे  फार 'मोठे योगी' वाटतात.  शाळेत असताना वाढदिवसाला  वर्गात मित्र / मैत्रीणींना गोळी/ चॉकलेट देणे,  ते पुढे कॉलेज मध्ये काही खास मित्र- मैत्रिणींसमवेत केलेल्या पार्ट्या  कोणी विसरू शकेल का ?  लहान पणापासून आई -बाबा ,नातेवाईक,  पाहुणे आणि मोठे झाल्यावर  बायको , मुले  ( यात मित्र/ मैत्रिणी ???? )  यांच्या कडून वाढदिवसाला  मिळालेले ' गिफ़्ट ' उघडून केव्हा एकदा बघतोय ही उत्सुकता आज ही असतेच. आज सोशल मीडियावरची अनेक संकेतस्थळे सभासदत्व देताना तुमच्या वाढदिवसाच्या तारखेची नोंद करून त्यादिवशी  इतरांना  तुमचा वाढदिवस आहे  हे सांगतात. मग सगळीकडे शुभेच्छांचा( महा) पूर येतो . पण शाळेत असताना आणि कुणालाच माहीत नसताना गोळ्या चॉकलेट वाढदिवसाला देऊन आज माझा वाढदिवस आहे हे  सांगण्याची निरागसता  वेगळीच होती नाही  ????  आज  मोठे झाल्यावर  ती  निरागसता  दाखवतो का  आपण ??? 


तर मंडळी, " हम् आपको एक  बात कहना तो भूल ही गये " ( आठवा ती  पान - पराग  ची जहिरात ,  नही नही  हमे कुछ नही चाहीए )   तर आज मंगळवार , आमचा स्तंभ लेखनाचा दिवस ,तारीख २ फेब्रुवारी . तर आजच्याच दिवशी वयाची ४५ पार करून ४६ वर्षात पदार्पण करताना  आणि  म्हणूनच अनायसे  ३७ वा स्तंभ लेख म्हणून 

 " वाढदिवसावर  टवाळखोरी " करण्याची संधी घेताना मला खरोखरच आनंद होत आहे.  ३६५ दिवसापैकी मला आवडणारा  एक प्रमुख दिवस. प्रत्येक वाढदिवस ( कळण्याच्या वयापासून )   वेगवेगळ्या आठवणी  देऊन गेले . त्या सगळ्या आठवणी  इथे लिहून टवाळखोरीची व्याप्ती वाढवावी अशी अजिबात इच्छा  नाही.


 आपल्या वाढदिवसादिवशी  आणखी कुणा अर्थात प्रसिद्ध  व्यक्तिमत्वाचे  वाढदिवस असले तर  आणखी छान वाटते.  मी मध्यतंरी एकदा तसा प्रयत्न केलेला, २  फेब्रुवारीला कुणा कुणाचे वाढदिवस असतात  हे ' गुगल'ण्याचा . पण तशी अपरिचितच नावे अधिक  होती. 


 माझ्या मते  नियतीचीच ही योजना असेल की अजून काही वर्षानी  जेव्हा  एखादी  २ फेब्रुवारीला जन्मलेली व्यक्ती , आपल्या वाढदिवसादिवशी अजून कुणाचा वाढदिवस असतो  हे शोधेल तेव्हा त्यांना .. . . . . . . . . 


नाही हो तसे काही नाही  फक्त ह्या पोस्टची ब्लॉग लिंक '  सापडावी ही नियतीची  योजना. बाकी तसे काहीच म्हणणे नाही बरं!


तेव्हा या स्तंभ लेखनाचा शेवट ,स्तंभ  लेखकाकडून , स्वतःतील लेखकाला   या शुभेच्छा देऊन 


बार बार ये दिन आये, बार बार  ये दिल गाये

तुम ' लिखो ' 📝 हजारो साल,  ये ही  है आरजू 


" हॅपी टवाळखोरी टू ( ऑल ऑफ ) यू  "


" *कोण म्हणतंय रे ' ही तर हद्द झाली टवाळखोरीची*  '" 


(अजूनही तितकाच निरागस,बर्थ डे बॉय  )  अमोल केळकर

२ फेब्रुवारी २०२१


#मंगळवारची_टवाळखोरी ( shopizen.in)

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...