नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, February 9, 2021

फाॅर्वर्ड फक्त करु


 चॅलेंज /उचलेंज 🃏


लहानपणी चॅलेंज हा पत्त्याचा खेळ अनेक जण खेळले असतील. 


माझा एक एक्का, यावर माझे तीन, माझे दोन, माझा आणखी एक


' खोटे बोल पण रेटून बोल ' 😜  चे बाळकडू या खेळात मिळते. सध्या सोशल मिडीयावर असाच 'चॅलेंजचा'  'राजकीय'  खेळ अनेकांकडून खेळला जातोय.  फक्त हा खेळ संपवायचा म्हणजे 'शो' म्हणायचे नाही,  खेळत रहायचे. असा खेळ खेळणाऱ्यांना मी' #फाॅर्वर्डजीवी' म्हणेन.


 हा माझा एक मुद्दा, चल माझे दोन, माझे तीन आणि पुढे चालू.

बर यातील कुणालाही,( काही अपवाद वगळता ☺️) एखादी गोष्ट/शंका विचारली तर उत्तर कुठं देता येत?  ना विषयाचा अभ्यास, ना संपूर्ण माहिती, केवळ केवळ कुठलाही मेसेज ( राजकीय)  भक्तिभावाने पुढे ढकलण्याची गुलामगिरी. 


अशा सर्व बाजूच्या गुलामांना हे गदिमांचे गीत समर्पित:- 📝


राजकारणाच्या मुद्द्या संगे 

 युध्द आमुचे सुरु

'फाॅर्वर्ड' फक्त करु ⏩


देश आमुचा 'फाॅर्वर्डंचा'

काॅपी पेस्टच्या रणनितीचा

'स्क्रीन-शाॅट' ट्विट करु


फाॅर्वर्ड' फक्त करु⏩


फाॅर्वर्ड येता,फाॅर्वर्ड उत्तर

सोडू - न - देऊ , एक तसूभर

क्षणी पुन्हा अवतरु


फाॅर्वर्ड' फक्त करु⏩


हानी होवो कितीही भयंकर

सोशलमिडीया चा हा सागर

'फाॅर्वर्डजीवी ठरू


फाॅर्वर्ड' फक्त करु⏩


( स्वजीवी, स्वच्छंदी)  अमोल


टिप: अराजकीय, विनोद, माहितीपूर्ण  करमणूकप्रधान, टवाळखोरीयुक्त कुठलेही लेखनाचे " #फाॅर्वर्डजीवी" होण्यास लेखकाची ना नाही 😌

⏭️⏭️⏭️⏭️

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...