नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, February 11, 2021

तुला शिकवीन चांगलाच धडा


 

पुणे- मुंबई  मेगा हायवेवर  बेधडक , नियमांचं उल्लंघन करून गाडी चालवणा-यांना ' मंजुळाने 'दिलेला इशारा. ( *#विडंबनजीवी* कडून भक्ती ताईंना, स्मृतीदिनानिमित्य विनम्र श्रध्दांजली 🙏)


//

थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या *वेगाचा*  भरलाय घडा!

'मोटा गाडीवाला'  समजतो सोताला ड्रायव्हर ,वाईज लक्षात घे स्पीड ब्रेकरर्  .


तुजं क्लचपुरतंच आहे   ग्यान, तुज्या त्वाँडात घालीन शान.

तुजा  ब्रेक,  तुझा लेफ़्ट, तुझा राईट,  मारे पैजंचा घेतोय इडा !


*तुला शिकवीन चांगलाच धडा !  तुज्या वेगाचा  भरलाय घडा!* 


तुजा उतरीन समदा माज, जवा ठोकशील पुढच्याला आज  

डावीकडे एकटाच पडशील सुटं, मी म्हनन, काय आज इकडं कुठं?

हात पसरून मागशील भीक, मी म्हनन जरा हळू चालवायला  शीक.


मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल 'लाईनीत' मुकाट

उगं वळवळ करतोय किडा! 

तुला शिकवीन चांगलाच धडा!


तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,

ओ हो हो , आ हा हा, ओ हो हो , आ हा हा 

हाऊ स्वीट, हाऊ स्वीट,

'स्कोडा' , 'व्हिस्टा' , 'डिझायर'  समदे धरत्यात  मंजूचे पाय. 

नियमांचा  घोळवीत गोंडा, तरन्या गाडयांचा दारात लोंढा 


हाय मंजू, हाय  शिवनेरी ...

हाय मंजू, हाय अश्वमेध ..

मंजुबेन केम छो, हाऊ डू यु डू

कम कम, गो खंडाळा  गार्डन, आय बेग युवर पार्डन?


कुनी आनतील  वडयासंग पाव , कुनी देतील गायछाप पुडी 

कुनी घालतील तिथेही  राडा !

तेव्हा  शिकवीन  त्यांनाही  धडा!


जवा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला. 

धरशील पाय आन लोळ्शील कसा, 'अमृत -अंजन' लावशील फसाफसा  

तुझा ए, तुझा ओ, तुझा न तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन पुढं जाणं 

भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू 'टायरला' कायमचं टाळं


म्हाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन जाऊद्या, गरिबाला सोडा

तू   म्हनशील, मंजुदेवी  आलो मी 'वेगाला' शरन

मी म्हनन शरन आल्यावं देऊ नये मरन.  



तरीपण 


अधीमधी  तुला शिकवीन चांगलाच धडा, जेंव्हा तुज्या वेगाचा  भरतो  घडा!  


//


*आवरा वेगाला _ आठवा फुलराणीला*



( हायवे प्रेमी ) अमोल केळकर 📝

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...