आंतराष्ट्रीय ज्योतिष दिवस ( २० मार्च)
१२ ग्रह, १२ राशी आणि पत्रिकेतील १२ स्थाने यांच्यातील विविध संयोगा
![]() |
ने, अनेक प्रकारच्या वारंवारीता, पर्म्यूटेशन -काॅम्बीनेशन चे रसायन = व्यक्तीचे प्रारब्ध
व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा व्यक्ती तितकी रसायने ( पत्रिका). प्रत्येक रसायन युनिक म्हणूनच प्रत्येकाचं भाग्य/ प्रारब्ध वेगवेगळे. म्हणूनच की काय जुळ्या, तिळ्यांची वरवर दिसणारी पत्रिका जरी सारखी असली तरी अंतरंगात वेगळे रसायन त्यांचे असते.
दैवयोगाने , मला या "भविष्याच्या अंतरंगात" डोकावण्याची संधी प्राप्त झाली/ आवड निर्माण झाली हे माझे भाग्य. हे रसायन जमून येण्यासाठी काही व्यक्ती कँटेलिस्ट म्हणून आयुष्यात आल्या. यात प्रमुख उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे माझे गुरुजी ठाण्याचे श्री वरदविनायक खांबेटे, ज्यांच्या अनुदिनीमुळे ( धोंडोपंत उवाच ) या विषयाची गोडी लागली ते दादरचे श्री धोंडोपंत आपटे, आणि वेळोवेळी मी ज्यांच्याकडून हक्काने मार्गदर्शन घेतले ते संभाजीनगरचे श्री दिपक पिंपळे. . तसेच माझी आत्ये बहिण आणि तिचे यजमान बोरिवलीचे श्री विनायक आणि सुनिता दामले यांनी एकेदिवशी त्यांच्याकडची अनेक ज्योतिष पुस्तके मी अभ्यास करतो म्हणून आणून दिली. आजच्या ज्योतिष दिनानिमित्य या सर्वांचा मी ऋणी आहे🙏🙏
आजपर्यत अनेकांना यानिमित्ताने मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, अनेकांशी यानिमित्ताने ऋणानुबंध जुळले. हक्काने अनेकांनी अडचणी सांगितल्या, त्यांना शक्य होईल तसे मार्गदर्शन केले. भकिते बरोबर आली तशी चुकलीही. झालेल्या चुकीतून शिकण्याचा प्रयत्न केला, काही जणांनी परिक्षा घेण्याहेतू प्रश्ण विचारले, काहीजणांनी निव्वळ टिंगलटवाळी केली तर काहींनी अगदी मनापासून कसे फोकस व्हावे, डेटा अँनॅलिसिस, आणि मनाची पवित्रता राहण्यासाठी ( जी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे) काय करणे आवश्यक आहे याचा प्रँक्टिकल अँप्रोच दाखवला ☺️
या सर्वांचे अगदी मनापासून आभार.
"भविष्याच्या अंतरंगात" पत्रिकेच्या माध्यमातून डोकावण्याचा हा प्रवास अखंडीत चालू राहिल हे मात्र नक्की
मंडळी, वयाच्या जवळजवळ ३० वर्षापर्यंत माझा पत्रिका/ ज्योतिष याच्याशी संबंध आला नाही. लहानपणी कधीतरी आई-बाबांनी पत्रिका काढलेली होती. पण समजा त्यावेळी कुणा गुरुजींनी तू या विषयाचा अभ्यास करशील किंवा लेखन वगैरे करशील असे सांगितले असते तर मी यावर अजिबात विश्वास ठेवला नसता हे ही तितकेच खरे
मराठी गझलकार भाऊसाहेब पाटणकरांच्या या ओळी मला पटतात. या ओळींनीच हा लेख आवरता घेतो. धन्यवाद 🙏🏻
क्षणाक्षणाचे पडती फासे 🎲
जीव पहा हे रमलेले
पुर्वजन्मीचे संचित त्यांच्या 📝
भाळावरती सजलेले
जीवनातल्या या खेळात ♟
कुणी असते जिंकलेले 🏆
सगळं असत ठरलेले,
सगळं असतं ठरलेले 🎯
(ज्योतिषी अभ्यासक)अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
#आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन 📝
२०/०३/२१
No comments:
Post a Comment