https://youtu.be/QJKMTjVOddk
मागच्या आठवडाभर जी भयंकर जागतिक वाहतूक कोंडी झाली आणि आमच्या मनाची जी 'कालवाकालव झाली, ती अशी
( मुळ गाणे: गुंतता ह्दय हे .. लिंक मधे)
रुतता शीप हे, सुएझ कालव्याच्या पाशी
हा जलयमार्ग अडखळे,त्या जहाजाशी
रुतता शीप हे..... 🚢
या इथे साचला ढीग टन कच-याचा
प्राक्तनी आपुल्या योग इंधन वाढीचा
कंटेनर आमुचे सडले या वाटेशी
रुतता शीप हे..... 🚢
डाॅलर आपण दुरावलो या वेळी
शिपमेंट न पोचता, विसरा ऋण तेही
'कष्ट - मर ' करी इमेल, आँर्डर कँन्सलशी
हा जलयमार्ग अडखळे,त्या जहाजाशी
रुतता शीप हे..... 🚢
( एक्स्पर्ट/ एक्सपोर्ट मॅनेंजर) अमोल 🤪
३१/०३/२१
No comments:
Post a Comment