लंकेबरोबरचा कालचा पराभव आमच्या टुकार विडंबनेत आणखी एकाची भर टाकून गेला
( चाल : रम्य ही स्वर्गाहून लंका )
तिच्या खेळीच्या विराट लहरी उठविती शंका
धन्य ही भारताहून लंका
विजयमल्ल्या जरी या नगरी
हरून दाखविले निळ्या सागरी
या सामन्यावर पाऊस विसरला , करण्या अभिषेका
धन्य ही भारताहून लंका
पैसा लक्ष्मी बंधू भगिनी
उखळ पांढरे या सामन्यातुनी
या स्पर्धेचे चॅम्पियन पद तरी भारता घेशील का ?
धन्य ही भारताहून लंका
( टुकार ) संकल्पना : अमोल
०९/०६/१७
No comments:
Post a Comment