नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, November 27, 2014

शाकाहारी ओनर्स असोसिएशन


स्वप्नातले घर बघताना  
नको कुणाच्या आहारी … 
फक्त एकच लक्षात ठेवा 
तुम्ही पाहिजे  शाकाहारी…. 

मांसाहारी असाल तर 
बिल्डर दाखवतो लाल झंडी….
असाने कशी बनणार 
घरी आमच्या चिकन हंडी … 

अमोल केळकर 
२८/११/१४

Wednesday, November 26, 2014

हातच्या रेषा


एकवार भिंगामधूनी बघ माझा हात,
शेवटची आशा माझी तुझ्या भविष्यात 

Sunday, November 16, 2014

९० मिनीटाचा उपवास …


ए , " एलिझाबेथ म्हणजे काय रे ?"
ते एका राणीचे नाव आहे !
हो, पण अर्थ काय ?
एलिझाबेथ म्हणजे, टिकाऊ !
टिकाऊ ?
हो , ती खूप वर्ष टिकली ना !!
" दगड ! दगड ! दगड ! दगड ! "





एलिझाबेथ एकादशी या सिनेमातील हा संवाद. अशा अनेक संवादाने, लहान मुलांसहित सर्वांच्या उत्तम अभिनयाने नटलेला, सरळ,सोपा कौटुंबिक सिनेमा " एलिझाबेथ एकादशी" !
एकादशी म्हणले की आठवतात ते वर्षातल्या दोन महत्वाच्या एकादशा . अर्थात पंढरपुरचा विठूराया आणि एकादशीचे अतूट नाते. वर्षातील दोन महत्वाच्या एकादशीपैकी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचे कथानक गुंफले आहे







सिनिमाच्या सुरवातीची काही मिनिटे " श्रीहरीच्या " सकाळच्या पूजेच्या दृश्याने होते . यावेळेचे पंढरीच्या राजाचे जे दर्शन चित्रीत केले आहे ते केवळ अप्रतीम. अभ्यंग स्नान ते आरती फारतर २-४ मिनिटे पण त्या विठूरायाचे जे दर्शन मिळते ते खरोखरच सुरेख. संपुर्ण सिनेमाचे चित्रीकरण, विषय पंढरपूरशी संबंधीत असूनही हा देवळातील विठोबा सिनेमात दिसतो तो फक्त सुरवातीला. त्यानंतर अगदी शेवटी नेहमीप्रमाणे सिनेमाचा शेवट गोड होतो(चमत्कार होऊन)तो होण्यासाठी दिग्दर्शक परत या विठोबाकडे येत नाही ही मोठी जमेची बाजू . नाहीतर विठूरायाला साकडे घालून, मोठे मोठे संवाद म्हणून चित्रपटाची लांबी १० - १५ मिनिटाने तरी लांबवता येणे सहज शक्य होते . असो
एका गरीब कुटुंबातील आई, आजी, छोटा मुलगा ( ज्ञाना ) त्याची बहिण ( झेंडू उर्फ मुक्ता ) यांचे हे कथानक . घरातल्या घरात मशीनवर कपडे विणून चरितार्थ चालवणारी आई , तिचे हे मशीन कर्जाची परतफेड न केल्याने जप्त होते. पैसे भरण्याची अंतीम तारिख दिल्यानंतर , आणि किती पैसे भरल्यावर हे मशीन परत मिळेल हे सांगितल्यावर संपुर्ण कुटूंब कसा प्रयत्न करते याचे हे कथानक ..









ज्ञाना, झेंडू , गण्या आणी इतर मित्र यांचा सहजसुंदर अभिनय, प्रासंगिक विनोद , उत्तम संवादलेखन हा या सिनेमाचा आत्मा
हा सिनेमा मला एका दृष्टीने वेगळा वाटला ते म्हणजे श्रध्दा आणि शास्त्र यांचा घातलेला योग्य मेळ. पांडूरंगा बरोबरच संत न्यूटन यांचे विचार ही इथे दिले गेले आहेत. सिनेमात अवास्तावी धार्मिकता , अंधश्रध्दा दाखवणे सहज शक्य होते पण ते टाळण्यात यश आले आहे आणि ही मोठी जमेची बाजू . प्रामाणिक प्रयत्न,विश्वास आणि कृती तुम्हाला अपेक्षित यश देते हे इथे मुलाना समजून देण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे









" एलिझाबेथ एकादशी " च्या संपूर्ण टीम चे त्यासाठी अभिनंदन
मराठी सिनेमाला संजीवनी देण्यासाठी हा सिनेमा पहिला ' श्वास ' ठरो या शुभेच्छा 
आजकाल सिनेमा संपल्यानंतर एक ( प्रसिध्द ) गाणे दाखवणे ही हिंदी सिनेमाची पध्दत याही सिनेमात आहे . तेंव्हा पिक्चर संपला रे संपला की लगेच जाऊ नका. ज्ञाना , गण्या आणि झेंडु ने या गाण्यातही धमाल केली आहे ती बघूनच जावा ।







हा ९० मिनीटाचा एकादशीचा उपवास तुम्हाला नक्कीच २१ एकादशीचे पुण्य देईल ही आशा
आता परीक्षण म्हणले की १० पैकी या सिनेमाला किती गुण द्याल ? असा प्रश्ण आला
मी तरी १० पैकी ८ गुण देईन
२ मार्क का काटले? माहित नाही पण मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत ना भौ …।
परीक्षक ) अमोल केळकर
सी ५, ३३, ०:२, सेक्टर ५
सीबीडी बेलापूर , नवी मुंबई
९८१९८३०७७०
a.kelkar9@gmail.com

Tuesday, November 11, 2014

स्वच्छता अभियान


स्वच्छता  अभियानाला , आले नेते 
फटाक्याने करू स्वागत ...

तोच कचरा साफ करायला 
मग वेळ नाही लागत ...
अमोल केळकर
12/11/14 

Monday, November 10, 2014

शिक्षण


कुणी शिका मराठी , कुणी शिका उर्दू 

मात्र जो घेईल शिक्षण 
त्यालाच आम्ही वंदू 

अमोल केळकर 
११/११/१४

Sunday, November 9, 2014

तळ्यात - मळ्यात


खूप झालं आता 
तळ्यात - मळ्यात 
घाला लवकर हात 
एकमेकांच्या गळ्यात 

स्वाभिमाना बरोबरच 
सत्ताही आहे महत्वाची 
अशी नामी संधी 
परत नाही यायची 

अमोल केळकर
 १०/११/१४

Saturday, November 8, 2014

विरोधक



वाटलं तर सरळ सांगतो 
विरोधात बसा जाऊन 
बहुमत कसे मिळेल ते 
आम्ही घेऊ ना  पाहून 


अमोल केळकर 
८/११/१४

Wednesday, November 5, 2014

ओळखलत का साहेब मला?’


ओळखलत का साहेब  मला?’ परत  आला कोणी,
कपडे होते फाटलेले पण , मधाळ त्याची वाणी 


क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे  राहुन’.

कार्यकर्त्यांसह आम्हाला,  चार आश्वासने भेटली,
स्वबळावर सत्ता येता,  आमची वाट लावली .

पक्ष सोडला ,चूक झाली  , होते नव्हते ते गेले,
निवडणूक होईपर्यंत त्यांनी फक्त, राबवून घेतले 

कार्यकर्त्यांना  घेउन संगे ,  साहेब  आता लढतो आहे
राहिलेली कामे पुर्ण करून , मतदारसंघ घडवत आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पद  नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला.

आलेल्या   लाटेत खुर्ची गेली  तरी मोडला नाही कणा,
पक्षात परत घेउन तुम्ही,  फक्‍त लढ म्हणा

(लढाऊ ) अमोल केळकर 
६/११/१४

Happy New Year


त्याचा तो सिनेमा ना 
खूपच आहे सुमार !

कारण त्यात नाही 
माझा लाडला कुमार !!

अमोल केळकर 
६/११/१४

Tuesday, November 4, 2014

दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले



नारायण सुर्वे यांची क्षमा मागून

दोन दिवस मुंबईत  गेले, दोन दिल्लीत गेले
हिशोब करतो आहे आता,  किती पैसे भुरर्कन उडाले 

शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली
मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली

जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच  गहाण राहिले
कधी झेंडा  उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले

दरवेळी बंडखोर वळविले असे नाही; पण असेही क्षण आले
तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

भोळ्या जनतेचा  विचार हरघडी केला अन नेता झालो
पडणारी सीट , कशी जिंकून द्यावी , याच निवडणूकीत  शिकलो


झोपडपट्टीतील दादाने इलेक्शनचे धनुष्य  छान पेलले 
दोन दिवस मुंबईत  गेले, दोन दिल्लीत गेले


अमोल केळकर 
४/११/२०१४

Sunday, November 2, 2014

खातं



गृह, उर्जा,  सहकार, आणि अर्थ
कुणीच  नाही खूश , सगळं आहे व्यर्थ 



अमोल केळकर 
३/११/१४
Related Posts Plugin for WordPress, Blogger...