नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, July 31, 2023

दगडुशेठच्या भेटी


 ( काल्पनिक / प्रासंगिक * )

 विंदांची माफी मागून



दगडुशेठच्या भेटी,विश्वगुरु आला

तो जाहला सोहळा,(पुण्य) नगरीत

जाहली दोघांची, मंदिरात भेट

मन की बात , दोघांमध्ये


बाप्पा म्हणे,गुरु तुझे कर्म थोर

अवघेची पुरस्कार घेणे केले


विश्वगुरु म्हणे , एक ते राहिले

"स्व"राज्य न जाहले, महा-राष्ट्रावरी


बाप्पा म्हणे, बाबा ते ना बरे केले

त्याने तडे गेले पक्षा पक्षात

अंकल अट्टल, त्याची रीत न्यारी

बळकावुनी खाती, येऊनिया


विश्वगुरु म्हणे, तुझ्या आशीर्वादाने

तरून जाईल, भक्त माझा


बाप्पा म्हणे, गड्या वृथा शब्दपीट

प्रतेकाची वाट , वेगळाली 

वेगळीये वाटे, वेगळाले काटे

काट्यासंगे भेटे,पुन्हा तोच


ऐक ऐक वाजे

घंटा ही मंदिरी

असंतोषाचे जनक ,वाट पाहे


गुरु निघोनिया, गेले एक दिशा

कवतुक सदा-शिवी,आवरेना ! !


अमोल 📝

०१/०८/२३


Saturday, July 29, 2023

You are no longer admin


 You are no longer admin


सध्या आमच्या शाळेच्या व्हाटसप ग्रुप मधे आमचा एक मित्र हा खेळ खेळतोय. वयाच्या पन्नाशीला आलेला आमचा समूह. 

असं म्हणतात की' (  हे मीच म्हणतोय, "असं म्हणतात की वगैरे लिहिलं की जरा जोर येतो)


तर असं म्हणतात की,  ५० नंतरचा प्रवास ६०,७०,८० असा वयाने होत असला तरी मनाने आपण ४०,३०,२० करावा. आता आमचा मित्र एकदम वयाच्या १० व्या वर्षा पर्यत पोहोचलाय एकदम फास्ट. 


सुरवातीला त्याला कर्माची, संस्काराची,मैत्रीची, मानसिक स्थितीची भीती दाखवून झाली पण तरी काही उपयोग नाही झाला

( हा लेख हा आता शेवटचा उपाय 😝, बघू)

नंतर एकानं लक्षात आणून दिलं तो देवेंद्रजींचा अट्टल फँन आहे. मी परत येईन, मी परत येईन म्हणून ही ते अजूनही मुख्य Admin होईनात त्याचा राग तो आमच्या काहीजणांवर काढतोय. देवा भाऊना जे फिलींग येतंय तेच फिलींग तो आम्हाला You are no longer admin मधून देतोय.


बाबा रे!, उद्या देवाभाऊंच इकडं काय जमलं नाही तर दिल्लीला जातील रे,तेंव्हा डायरेक्ट समुहातून काढून वगैरे नको टाकूस 

एकवेळ सतरंजीवर बसू पण आमच्यासाठी शेवटपर्यत हीच गल्ली आहे 


#रविवारची_टवाळखोरी 📝

३०/०७/२३

poetrymazi.blogspot.com

Sunday, July 23, 2023

बार्बी


 बार्बी/ BAR- B



काल पोरांना हा सिनेमा दाखवायला थेटर वर सोडायला गेलेलो. सिनेमा बघायला आलेले सगळेचजण 'गुलाबी' ड्रेसमधे आलेले (  मुलंही याला अपवाद नव्हती)

मजा वाटली या जनरेशनची. पिक्चरच्या थिमला साजेसा पेहराव.

(काही महिन्यांपूर्वी आलेल्या "बाईपण भारी देवा" या सिनेमालाही बायकांचा ग्रुप साधारपणे सिनेमातील व्यक्तीरेखेच्या अनुषंगाने नटून जाताना बघितला)


नाही तर आम्ही.  अनेक सिनेमे तर शाळेच्या खाकी चड्डी,पांढरा शर्टवर पाहिलेत. 

त्यावेळेला असं काही नव्हतं नशीब नाहीतर 'शहेनशहा' बघायला हाताला प्लॅस्टर घालून जावं लागलं असतं अन 'टारझन' च्या वेळी पानं लावून. 

 

बार्बीचं गाणं तसं ऐकिवात आहे. त्यातील एकही इंग्रजी  शब्द कळत नाही. आज सहज गुगल वर त्याचे लिरिक्स वाचले. त्यातील एका कडव्यातील  शेवटचे वाक्य 👇🏻

 

I'm a Barbie girl, in the Barbie world

.......

...........

*Imagination, life is your creation*


आता या ओळीत जीवन जगण्याचे सार वगैरे दडलेले असेलही पण

 #माझी_टवाळखोरीच मर्म तरी दुसरं काय आहे? 


(माझ्या जवळच्या मित्रांना माहित आहे ती जास्त रंगते जेंव्हा आम्ही  A पेक्षा B साईडला बसतो. 

शाळेत ही 'ब' तुकडी भारी देवा असं उगाच नाही म्हणायचो आम्ही☺️)


२४/०७/२३

poetrymazi.blogspot.com 📝

Tuesday, July 18, 2023

कोण म्हणतं Lokशाहीस मान नाही?


 *कोण म्हणतं बेवड्यास मान नाही*


नावाचं एक गाणं सोशल मिडियावर मध्यंतरी  तुफान व्हायरलं झालेलं . श्री संदीप नावाच्या कोकणी माणसाने ते सादर ही तितकचं छान केलंलं

( इच्छुकांना ते युट्यूब वर बघायला मिळेल)


हे आठवायचं कारण म्हणजे घाटकोपरच्या एका समाजसेवकामुळे अशीच एक गोष्ट निदर्शनास आली. वरच्याच शब्दात सांगायची झाली तर


*कोण म्हणतं Lokशाहीस मान नाही?*


उगाच लोकं बोंब मारत होते, सगळीकडे हिटलरशाही आहे, हिटलरशाही आहे म्हणून


Lokशाही आहे,  आता तर त्याचा T.R.P ही वाढला आहे.

( असो,  याबाबत यूट्युबवर काहीही सर्च करु नये आम्ही सांगतोय ना Lokशाही अजून जिवंत आहे.झालं तर मग) 


#माझी_टवाळखोरी 📝

#कोण_म्हणतं_लोकशाहीस_मान_नाही

१८/०७/२३

www.poetrymazi.blogspot. com

Monday, July 17, 2023

अधिकमासस्य प्रथम दिवसे!


 मेघदूत बनला जावई

अधिकमासस्य प्रथम दिवसे!


हिंदमातेने मग  केले वाण

पटवून अंधेरी सब - वे ला

कसे बसे  ☔!!


#मुंबईचा_जावई

#जावई_माझा_भला

#अधिक_मास

#माझी_टवाळखोरी 📝


अधिक श्रावण प्रतिपदा

१८/०७/२०२३

Thursday, July 13, 2023

मुंबई स्पिरीट


 


Sunday, July 9, 2023

दो दिवाने शहर में


 दो दिवाने शहर में


मंडळी सध्या सोशल मिडियावर एका आजी-अजोबांचा 'रिम- झीम गिरे सावन ' या गाण्यावरचा एक व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे ( तो इतका  प्रसिध्द झाला आहे की यू ट्यूबवर हे गाणे सर्च केले असता मुळ गाण्याच्या आधी हा व्हिडिओ येतोय )


अफलातून क्रिएटीव्हिटी यांची.  गाण्यातील हिरो - हिराॅईन तसेच हे आजी- अजोबा.मुळ गाण्यातील ठिकाणे, अभिनय , बॅकग्राउंडला येणा-या टँक्सी, बेस्ट बसेस जसंच्या तसं घेण्याचा चांगला प्रयत्न केलाय. छान वाटतं बघून.  हे सगळं शूट करणाऱ्या टिमला आमच्याकडून पैकीच्या पैकी गुण.


या रिलची मोहिनी अनेकांना पडली आहे असे काल आमच्या लक्षात आले. खारघरला गोल्फ कोर्स च्या बाजूच्या डोंगरलाईन मधून रस्त्यावरून पडणाऱ्या धबधब्यांसह अनेक अमिताभ आणि स्मिता रस्त्यावर पडून 'आज रपट जाये तो हमें ना उ.ठा.ओ' म्हणत पोरांकडून रिल्स बनवून घेत होते. त्याचवेळी एका कपलने माझ्या कडून छत्री घेऊन,  दुस-या एका कपलची मुलं उसनी घेऊन राज- नर्गीस स्टाईलने "फिर भी रहेगी निशानीयाँ" यावर रिटेक वर रिटेक घेत रिल बनवणे चालू  ठेवले होते.


हे सगळं पाहून आपण का मागं रहायचं?  आपण पण असं काहीतरी मुंबईत जाऊन करु म्हणून आमच्या राणी ला बोललो.

अर्थात तत्काळ नकार देत म्हणाली तुम्हाला सांगितलयं ना मी की जुलै महिन्यात मी मुंबईत जाणार नाही. केंव्हा कुठे अडकू सांगता येणार नाही.


शेवटचा उपाय म्हणून मी  विचारलं?


"आती क्या खंडाळा?"


सध्या ती राणी मुखर्जी सारखं हसण्याचा सराव करतीय आणि मी काड्यापेटीचा बाॅक्स आणलाय 


चेतावणी: या रिल्सच्या शूटिंगमुळे येत्या शनि/ रविवारी लोणावळा/खंडाळ्यात ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. आपापल्या जबाबदारीवर येणे


#अरे_घुमेंगे_फिरेंगे_नाचेंगे_गाऐंगे

#ऐश_करेंगे_और_क्या?


( आणि अशारीतीने आम्हाला त्यापुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या शाळेतील मित्रांच्या गेट- टू -गेदरला घरून परवानगी मिळाली ☺️)


#माझी_(मान्सून)_टवाळखोरी 📝☔

Friday, July 7, 2023

बाहुलीचं( दुसरं) लगीन,


 *एक फुल 🌷, दो माळी*

( प्रासंगिक विडंबन,मनोरंजन हा हेतू)


बाहुलीचं( दुसरं) लगीन, झोक्यात लागलं

(पहिल्या) नवरोबानं,भांडण काढलं

बाहुलीबाई नटून मंडपात थांबली

'बाणेकरी ' येताच बोलणं ते वाढलं


आम्हा नाही स्पेस म्हणे पुढे येऊन सासरा

आम्ही तुमच्या 'घड्याळजींना' देऊ कसा आसरा

गोवा- गुवाहटीचा देऊ का हो दाखला

असं म्हणून मंडपात सगळ्यांना तो चावला


बाहुलीचं( दुसरं) लगीन, झोक्यात लागलं 🌷🪆

(पहिल्या) नवरोबानं,भांडण काढलं


इडीबिडी पदार्थ त्याच्या तोंडामधे कोंबले

स्वाहाकाराचे मुद्दे त्याल मग झोंबले

'त त त त तो-यात ' सेक्रेटरी धावला

कानानधे अध्यक्षांच्या काहीतरी बोलला


बाहुलीचं( दुसरं) लगीन, झोक्यात लागलं 🌷🪆

(पहिल्या) नवरोबानं,भांडण काढलं


थोडासा रूसवा, दिल्लीचा फतवा

मंडळी हसू लागली

गुरुजी आणून ,शपथा घेऊन

लग्न लावू लागली

थोरं आली, चिन्ह आणली

पक्षसारी दुभंगली 


बाहुलीचं लगीन झोकात लागलं

व-हाड सुखावलं


#माझी_टवाळखोरी 📝

Thursday, July 6, 2023

काहीपण देगा देवा


 " काहीपण देगा देवा '


ज्योतिष शास्त्रासंबंधीत ' व्यवसाय जातक'  नावाचे एक पुस्तक वाचनात आहे. यात 'सुखवस्तू' लोकांचे ग्रहयोग दिले आहेत. थोडक्यात खूप काही Ambitious नसलेले , आहे त्यात  समाधानी, फारशी रिस्क न घेणारे, परंपरेने आलेला व्यवसाय चालवणारे, मुळ गाव न सोडणारे इ इ लोक्स या वर्गीकरणात येतात. यांच्या पत्रिकेतील ग्रहांचे नाते एकमेकांशी गुण्या- गोविंदाचे असते. उगाच कोण वक्री नसतो, एकमेकांशी स्फोटक केमिस्ट्री नसते ,  शुभ ग्रह खूप चांगले नसतात, पापग्रह खूप त्रास देत नाहीत.दशा ही फारशा वाईट नसतात. जन्म, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, संतती, निवृत्ती, वृधत्व हे चक्र व्यवस्थित पार पडते.

अँडजेस्मेंट,फ्लेक्झिबलपणा त्यांच्या रक्तात असतो. पत्रिकेतील बहुसंख्य ग्रह द्विस्वभाव राशीं संबंधित असतात.

त्यामुळे त्यांचा विशेष काही आग्रह नसतो 

थोडक्यात जातकाला आणि ज्योतिषांनाही फारसा ताप न देणारी यांची पत्रिका असते.


" काहीपण " चालेल हे यांच्या जीवनाचे सूत्र. 

आज नाष्टयाला काय करायचे असे घरी विचारले गेले(च) तर   - "काहीपण" हेच उत्तर ब-याचदा त्यांच्याकडून येते

फिरायला कुठे जायचे - कुठेही, सिनेमा कुठला बघायचा - कुठलाही हीच वृत्ती ते कायम ठेवतात.



उद्या हे मंत्री झाले आणि खातेवाटपाच्या वेळीही फारशी किरकिर न करता  'काहीपण' चालेल (पण द्या )ही भूमिका ठेवतील.


अशा व्यक्तींसाठी तुकोबांची रचना वेगळ्या शब्दात


काहीपण देगा देवा

पोहे,मॅगी ,उपमा!


जया अंगी 'काही'पण

तया यातना कठीण !


महापूरे झाडेजाती

तेथे 'काहीपण' वाचती!


#काहीपण_देगा_देवा

#माझी_टवाळखोरी 📝

०७/०७/२३

Tuesday, July 4, 2023

पहाटे नंतर आज पाहिली


 वसंत बापटांची माफी मागून

( * मनोरंजन हा हेतू)

मुळ गाणे: शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट


पहाटे नंतर आज पाहिली दुपारची विल्हे-वाट 


पक्ष फुटले   , सदन गहिवरले

सत्तेसाठी नव गणित जमविले

'देवगिरीत' जे जाऊनि जमले,मंत्रीपद फटक्यात


आजवरीच्या अंधारात

अनंत झाले उल्कापात

एकवटोनी तेज फुटीचे तिमिर सरे घनदाट


फकिरांनी शत यज्ञ मांडिले

ईडीमध्ये तेच दाखले

त्या शक्तीची राष्ट्रावर ये 'अजीत' 'एक'च लाट


दीप पेटवूनी कार्यालयाचे

पूजन केले स्वातंत्र्याचे

त्या राड्याची ठेच लागुनी झाले आज विराट


पुरेत अश्रू दुबळे क्रंदन

भावपूर्ण करु विनम्र वंदन

नव समिकरणाचे होऊ आम्ही 'सिल्व्हर शाही' भाट


पहाटे नंतर आज पाहिली दुपारची विल्हे-वाट 


* माझी_टवाळखोरी 📝

५/०७/२३

www.poetrymazi.blogspot.com

Sunday, July 2, 2023

सावधान


 #सावधान 


आज डोंबिवलीत एका वधू-वर मेळाव्यास उपस्थित राहिलो. लेटेस्ट ट्रेन्ड काय चालला आहे हे बघायला मिळाले. पूर्वी वेस्टनच्या मुली सेंट्रल चा मुलगा पसंत करीत नसत.


 आज या विचाराचे अँप अपग्रेड झालेले बघितले


 चक्क डोंबिवली (पूर्व) च्या मुली डोंबिवली (पश्चिम) ला जात नाहीत असं एका मुलाची आई खेदाने सांगत होती.


नशीब हा ट्रेन्ड आत्ता सुरु झाला. आमच्याकाळात सांगलीत असा काही विचार नव्हता.  असता तर, 'नाही हं ! मला साखर कारखान्यावरचा मुलगा अजिबात नको,गुलमोहर काँलनीतलाच पाहिजे  फारतर विश्रामबाग परिसरातील चालेल असं सांगून आमची केस त्याचवेळी रिजेक्ट झाली असती. 

 एक गोष्ट जाणवली ती म्हणजे  मंगळ, एक- नाड, सगोत्र या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत किंवा तसा विचार सुरु झालाय

असो.


 मेळाव्याचे आयोजक माझे साडूच होते. त्यांच्यामुळे माझ्या कार्याची म्हणजे पत्रिका बघणे वगैरेची अनायसे जहिरात झाली.


आता त्यांचा पुढचा मेळावा १६ जुलैला पुण्यात आहे तर पुण्यातील ज्या मुलींना कोथरूड/बावधनहून सहकारनगरला जायचे नाही, विमाननगरहून पाषाणला यायचे नाही त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी पुण्यात आहे एवढेच सांगतो.😬


 शेवटी तमाम लग्नाळू वधू -वरांचे २,७ ( आणि साडू-साडूंचे ११वे स्थान)  अँक्टीवेट होऊन, "शुभ_मंगल"  होवो याच यानिमित्याने शुभेच्छा 

💐💐


#स्वप्नपुर्ती_विवाह_मंडळ_पुणे

#माझी_टवाळखोरी 📝

२/०७/२३

Related Posts Plugin for WordPress, Blogger...