नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, December 24, 2017

हायवेवर गाड्यांच्या अजुनी रांग बों(ब)ला




संयमाचा अंत होणे म्हणजे काय असते हे टुकार कविता वाचून नाही तर सलग सुट्टीच्या दिवशी  हायवेवर प्रवास करुनच कळते
मुंबई - पुणे मेगा हायवे एकंदर परिस्थिती

( चाल: तळव्यावर मेंदीचा अजूनी रंग ओला)

हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बों(ब)ला
माझी गाडी लेन घेते जिथे घोटाळा

दाबिलेस पायाने एक ब्रेक क्षणे
 बट हळवी रांगेतील वाजविती कर्णे
नकळत हळू हळू टोल नाका आला 
( हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बोला)

घाटातुनी शितलता दाटुनी आली
दोन गाड्यांची प्रेमभरे टक्कर झाली
आसमंत प्रदुषणे धुंद धुंद झाला
( हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बोला)

हा टुकार अडकला घाट खंडाळ्यात
मिटुनी काच लावून एसी शब्द सुचतात 
मागचा सहप्रवासी वाचून धन्य झाला

(हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बोला)

📝त्रासलेला टुकार प्रवासी
२४/१२/१७


मुळ गाणे:-
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा

गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे
बट हळवी वाऱ्यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला

पवनातुनी शीतलता दाटुनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे धुंद धुंद झाला

ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटुनी पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला


Thursday, December 14, 2017

आमचा ' एक्सिट पोल'


आमचा ' एक्सिट पोल' 📝


मंडळी सुप्रभात 🙏🏻

काल पासून आपण निवडणूक निकालाबाबत अनेक पोल वाचत आहोत. नाही नाही मी ही तुम्हाला माझा अंदाज वगैरे सांगणार नाही आहे. पण हा ' एक्सिट पोल' मला भूतकाळात घेऊन गेला आणी या एक्सिट पोलचे बीज आम्हाला आमच्या शाळेच्या प्रत्येक परीक्षेत दिसून येऊ लागले

येतय का लक्षात?

साधारण कुठल्याही इयत्तेची सहामाही, वार्षिक परिक्षा हा एक्सिट पोल साठी सुगीचा काळ
मराठी, इंग्रजी, गणित हे आमच्यासाठी कायमचे राखीव मतदार संघ. इथला पोल घ्यायच्या भानगडीत आम्ही कधीच पडलो नाही

इतिहास, भूगोल, शास्त्र हे आमचे पारंपारिक मतदारसंघ
रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा याची परिक्षा संपल्यानंतर ठराविक मित्र पँनेल कडून मिळणाऱ्या उत्तरावर आमचे मार्कांच्या अंदाजांचे पोल ठरले जायचे.

एखाद्या अवघड प्रश्णांच्या उत्तरासाठी कधी कधी एकदम हुशार तज्ञ मित्राशी विचारविनिमय ( expert panel)  केला जायचा. अर्थात माझ्यासाठी तसा प्रसंग क्वचित यायचा. नाही नाही मी हुषार म्हणून नव्हे तर असा प्रश्ण कायम आपला option लाच असायचा.

तर घरी जाऊन पुढच्या पेपराच्या अभ्यासा आधी ४-ते ५ वेळा तरी वेगवेगळ्या permutation, आणी combination ने या पेपरात आपल्याला किती मार्क मिळणार आहेत याचा अंदाज बांधणे हा आमच्यासाठी एक आनंददायी exit pol च होता
आणी ही सगळी तयारी असायची घरच्या, 'आई-बाबा चणाक्ष नातेवाईक' सर्वेला सामोरा जायच्या  आधीची. या सर्वेक्षण नुसार आम्ही कधीच विजयी उमेदवार ठरत नसायचो.

एक मात्र नक्की कितीही सर्वे आले गेले,   या सगळ्यात निवडणूक आयोगाने ( प्रती शाळेने) आमचे कधीच डिपाँझीट जप्त होऊ दिले नाही 😊

सर्व परीक्षा प्रेमी आणी त्यानंतरच्या होणाऱ्या ' एक्सिट पोलला' समर्पित 🙏🏻
📝 अमोल
१५/१२/१७

थंडी ही कुडकुडली


मुबंईत आज डिसेंबर मधील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली त्यात  बिचारी थंडी चुकून  माझ्या घरी आली .. आणि मग 

( चाल : ही चाल  तुरुतुरु , उडती केस भुरुभुरु )

ही आली हळूहळू , दात खिळी बसली जणू 
उघड्या फटीतून आत शिरली 
कशी पहाटेच्या वा-यात  डिसेंबरच्या महिन्यात 
थंडी ही  कुडकुडली 

इथं धुकं आसपास ना 
चादर पांघरून झोप ना ?
तू जरा मफलर घाल ना 
डोक्यावरचा पंखा बंद ना 
मी आफीसला निघता माग वळून पाहता 
थंडी पावलात अडखळली 
( कशी पहाटेच्या वा-यात   डिसेंबरच्या महिन्यात 
थंडी ही  कुडकुडली ) 

उगाच स्वेटर घालून  
चहाचा रतीब पाडून  
रुमाल घेऊन हातानं 
खोकला काढीशी बेतानं 
हा ढंग जीवघेणा उगा शेकोटीचा बहाणा
मग थंडीला ही  उब घावली 

( कशी पहाटेच्या वा-यात   डिसेंबरच्या महिन्यात 
थंडी ही  कुडकुडली ) 





Wednesday, December 6, 2017

उघडला पाऊस ' ओखी ' चा


काल सकाळी सूर्यनारायणाची प्रार्थना काय केली आणि लगेच ...... 🌤🙏🏻
(मूळ गाणे : उगवला चंद्र पुनवेचा )

उघडला पाऊस ' ओखी ' चा
'लाट' जाऊनी थाबंवला मारा पाण्याचा ....
( उघडला पाऊस ' ओखी ' चा ) 

होड्या नावा  कशा फसल्या
सगळीकडे किना-यात पोचल्या
आठवणी स्तुनामीच्या जाहल्या
अवकाळी मोहोर आंब्याचा निसटला स्वर्गीचा.

उपटला पाऊस ओखीचा

📝 माझे टुकार ईचार

७/१२/१७

मुळ गाणे:-
उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गिचा
*विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो*

Related Posts Plugin for WordPress, Blogger...