मुबंईत आज डिसेंबर मधील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली त्यात बिचारी थंडी चुकून माझ्या घरी आली .. आणि मग
( चाल : ही चाल तुरुतुरु , उडती केस भुरुभुरु )
ही आली हळूहळू , दात खिळी बसली जणू
उघड्या फटीतून आत शिरली
कशी पहाटेच्या वा-यात डिसेंबरच्या महिन्यात
थंडी ही कुडकुडली
इथं धुकं आसपास ना
चादर पांघरून झोप ना ?
तू जरा मफलर घाल ना
डोक्यावरचा पंखा बंद ना
मी आफीसला निघता माग वळून पाहता
थंडी पावलात अडखळली
( कशी पहाटेच्या वा-यात डिसेंबरच्या महिन्यात
थंडी ही कुडकुडली )
उगाच स्वेटर घालून
चहाचा रतीब पाडून
रुमाल घेऊन हातानं
खोकला काढीशी बेतानं
हा ढंग जीवघेणा उगा शेकोटीचा बहाणा
मग थंडीला ही उब घावली
( कशी पहाटेच्या वा-यात डिसेंबरच्या महिन्यात
थंडी ही कुडकुडली )
No comments:
Post a Comment