नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, March 31, 2021

रुतता शीप हे..


 https://youtu.be/QJKMTjVOddk


मागच्या आठवडाभर जी भयंकर जागतिक  वाहतूक कोंडी झाली आणि आमच्या मनाची जी 'कालवाकालव झाली, ती अशी

( मुळ गाणे: गुंतता ह्दय हे .. लिंक मधे) 


रुतता शीप हे, सुएझ कालव्याच्या पाशी 

हा जलयमार्ग अडखळे,त्या जहाजाशी

रुतता शीप हे..... 🚢


या इथे साचला ढीग टन कच-याचा

प्राक्तनी आपुल्या योग इंधन वाढीचा

कंटेनर आमुचे सडले या वाटेशी


रुतता शीप हे..... 🚢


डाॅलर आपण दुरावलो या वेळी

शिपमेंट न पोचता, विसरा ऋण तेही

'कष्ट - मर ' करी इमेल, आँर्डर कँन्सलशी


हा जलयमार्ग अडखळे,त्या जहाजाशी


रुतता शीप हे..... 🚢


( एक्स्पर्ट/ एक्सपोर्ट मॅनेंजर)  अमोल 🤪

३१/०३/२१

Monday, March 29, 2021

मोटा भाईंना भेटायच भेटायच


 https://youtu.be/XT8exj2BEw4


*धुडवड संपता संपता सामान्यांच्या डोळ्यात उडालेली 'धुळ*' 😑


ही वेडेवाकुडे शब्द माझे मान्य करूनि शेठजी  घेतील काय

आणि *गुरु दक्षिणा* म्हणुनी *कमळ* मस्तकी धरतील काय 🌷



हे तुझे भजन कसे करावे अरे ठाऊक मजला नाही

आणि तुझे भजन तूच करून घे अरे *'कळी'* वान मी नाही 🌷

कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय

आणि *राजकारणात* सर्व लेकुरे एक पिता एक माय


//          //



मोटा भाईंना भेटायचं  भेटायचं अन भेटायचं

आता लगेच काय?

लगेच लगेच


मोटा भाईंना भेटायचं  भेटायचं अन भेटायचं

आम्ही येणार

अरे पित्त पोटात माझ्या

कुठे दिल्ली ला?

अरे पित्त पोटात माझ्या

अहमदाबाद राहिलयं , हा तिकडच जाऊ या


अरे पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना


मोटा भाईंना भेटायचं  भेटायचं अन भेटायचं

अरे पित्त पोटात माझ्या मायेना,


गेलो अहमदापुरी थेट घेतली भाईंची भेट

या या सत्तेची भूक काही थांबेना, थांबेना

पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना


पद सावरु सुंदर गृहमंत्री मनो हर

नजरेस आणि काही येईना, येईना


पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना



कावेबाज अधिकारी शे शे कोटीतच दंग

पहाटेच्या शपथविधीची  हौस पुरी होईना होईना 🌷⏰

पित्त पोटात माझ्या मायेना, मायेना


मोटा भाईंना भेटायचं  भेटायचं अन भेटायचं

अरे पित्त पोटात माझ्या मायेना,


📝 अमोल केळकर

२९/०३/२१

नुसती धुळवड

Sunday, March 28, 2021

आज 'भांग' आणाया दोस्त


 https://youtu.be/aEM1xZZ_WB0


धुळवड- स्पेशल 🧉


आज 'भांग' आणाया दोस्त

पिटाळतोय जरी

तरी अजून बाळगायला, हवी सावधगिरी ....


अवचित असा कुठूनसा

सुगावा लागतो

आल्या आल्या संयम तुमची

परिक्षा ठेवतो

साठवून ठेवलेला चकणा काढतो

लाइव्ह गोष्ट नको, आता फेसबुकवरी

तरी अजून बाळगायला, हवी सावधगिरी.🥂


धुळवडीला सांग आज काय जाहले

'भांग' घेतल्याविना कुणा न सोडले

ज्यास त्यास व्हाटसपवर निरोप गेले

एकटाच घेतलीस काय तू जरी

तरी अजून बाळगायला, हवी सावधगिरी.🥂


 त्या तिथे अनंतनगरी खेळ रंगला

लाॅकडाऊनच्या भितीने स्टाॅक आणला

तो पहा

तो पहा जो तो तिथे रांगेत थांबला

हाय वाजली फिरून तीच 'थाळ'री


तरी अजून बाळगायला, हवी सावधगिरी.🥂


📝 अमोल केळकर 🔥

बेलापूर

Friday, March 26, 2021

खेळताना रंग बाई होळीचा


 https://youtu.be/piSYNyOs4Mw


#होळी_स्पेशल_विडंबन 🔫

-------------------------------------------

खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा

वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या'


घेतली खंडणी जरी

स्काँर्पिओ घराबाहेरी

लागली नजर सारी

पकडल्या सा-या कारी 🚗

घात झाला हा अशानं  टोळीचा,टोळीचा


वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या


जरा गाडीत आयुध ठेवलं आणि काळीज धडधडलं

काय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलं

दर आला बाहीर  'लुटीचा', 'लुटीचा'


वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या


मला काहि समजंना, मला काही उमजंना

त्याला कस कळलं, कुणाला तो ऐकंना

डेटा ठेवला त्याने सहा जीबीचा, जीबीचा 


वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या



खेळताना रंग बाई होळीचा, होळीचा

वाटण्या करा लवकर, 'शे -कोटीच्या


🔥💶🔥💷🔥💰🔥💸🔥💵



📝अमोल केळकर ©️


#poetrymazi.blogspot.com

#होळी_स्पेशल

Wednesday, March 24, 2021

माझे माहेर मुंबई


संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत (दिल्लीत ) काल मैथीली या गायिकेला पत्रकारांनी गाणे म्हण असे सांगितल्यावर तिने

 ' माझे माहेर पंढरी ' हे गाणे म्हणले, ते मला तरी असे ऐकू आले


माझे माहेर मुंबई

आहे समुद्राच्या तीरीं


बाप आणि आई

माझी 'मातोश्री' रखुमाई 

माझी 'मातोश्री' रखुमाई .।


माझे माहेर मुंबई

आहे समुद्राच्या तीरीं....


'सिल्व्हर ओक' आहे बंधू

त्याची 'ख्याती' काय सांगू ?

त्याची खाती काय सांगू...s s s


माझे माहेर मुंबई...


माझी बहिण 'मँडंमा'

करवितसे आम्हा जुम्मा

करवितसे आम्हा जुम्मा s s s


माझे माहेर मुंबई..


एका 'दणक्या'निशी शरण 🌷

झाली चुकीची आठवण

झाली चुकीची आठवण...🎼


माझे माहेर मुंबई

आहे समुद्राच्या तीरीं.....


📝अमोल

२५/०३/२१

मन - कर्णीका


 मनकर्णीकेतील कंगनाला पुरस्कार - भक्त खुश

छिछोरे - संपुर्ण सिनेमास राष्ट्रीय पुरस्कार - चमचे खुश 


#मास्टर_स्ट्रोक 😜


मन-कर्णिका सेटिंगने

मिळवून घे ई , पुरस्कारा

छिछोरीपणा, संवादे, ट्विटट्विट करताना 

मन-कर्णिका सेटिंगने

मिळवून घे ई , पुरस्कारा


कमळीच्या पाठिंब्याने सहज साध्य ते करे कुणी

कमळीच्या पाठिंब्याने सहज साध्य ते करे कुणी 🌹

परंप्रकाशी तू तारा, चिवचिवाट सारा

भर पक्षातून स्वप्न उद्याचे

झेप घे ग कर्णीका


मिळवून घे ई , पुरस्कारा


मन-कर्णिका

मन-कर्णिका

मन-कर्णिका


नी नी नी सासासा नी नी नी सासासा

नीनी सासा रेरेसासा नी धप

🎼🎼

ममप ममप ममप ममप मपनीधप मगरेमगरेसानीसा 🎼

नी़नी़सारेरे मपनीधप

नी़नी़सारेरे सा 🎼

🐴🐴


📝 अमोल

२४/०३/२०२१

Tuesday, March 23, 2021

डिवसू नको


 " ताई - भाई यांची वादावादी वाचली आणि हे गाणं सुचलं,  मुळ गाणे लिंक मधे " 


( * मनोरंजन हा हेतू)


डिवसू नको, भावड्या मला

मी माझ्या बँकेला, जीव वाहिला

भावा


किती खाती झाली, बँक अँक्सीस ती

परत नव्याने माझी ख्याती झाली

तेच टार्गेट झाले, घेऊनी, धावले

चूप भाई बसा 🤫

आता sss


डिवसू नको, भावड्या मला


कुणी नाही भोळा, सरळ मार्गी मी

तुझा 'हात' काळा, बँकेची सेविका मी

युगायुगांचे नाते ,आमुचे, बढती

मिळे रे मला

भाssवा

डिवसू नको, भावड्या मला


📝 अमोल *

२३/०३/२१

Sunday, March 21, 2021

मृदुल करांनी


 https://youtu.be/47W1fhqJa2U


मृदुल करांनी वसुली करा

मरतो हिरेन कमजोर तारा


पोलिस दलातुनी दिसल्या अंतरी

काम मन- सुख पाहता श्री हरी

हर्षभराने शत-कोटीवर पडती अमृतधारा

मृदुल करांनी वसुली करा


विकासाच्या तीघाड्या जरी

हृदयी दिसे नोट हसरी

उन्मादाच्या धुंदवनी तीरी, टार्गेट लक्ष करा

मृदुल करांनी वसुली करा


सालस भोळी, थोर मनाची

खाकी वर्दी पक्ष चरणाशी

दिसल्या नयनी मर्सिडीज अन स्काँर्पिओ सह स्कोडा


मृदुल करांनी वसुली करा

मरतो हिरेन कमजोर तारा


📝 अमोल

२२/०३/२१

Saturday, March 20, 2021

ग्रंथयात्रा भाग २२ - झेंडूची फुले




 कवितेमधल्या शा‍ब्दिक दोषांचे, कवितेसाठी निवडलेल्या विषयांचे आणि काव्यात प्रकट झालेल्या कवींच्या स्वभावांचे केशवकुमार उर्फ प्र के अत्रे यांनी आपल्या झेंडूची फुले या काव्यसंग्रहातील कवितातून विडंबन केले. आणि त्या ओघात काही स्वयंस्फूर्त विनोदी कविताही लिहिल्या. 

केशव कुमारांच्या या नर्म विनोदी कविता ऐकूया या व्हिडिओमध्ये. विडंबन या काव्य प्रकाराविषयी अधिक माहिती ऐकूया डॉ नीलिमा गुंडी यांच्याकडून.

आंतराष्ट्रीय ज्योतिष दिन


 आंतराष्ट्रीय ज्योतिष दिवस ( २० मार्च) 


१२ ग्रह, १२ राशी आणि पत्रिकेतील १२ स्थाने यांच्यातील विविध संयोगा


ने, अनेक प्रकारच्या वारंवारीता, पर्म्यूटेशन -काॅम्बीनेशन चे रसायन = व्यक्तीचे प्रारब्ध


व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा व्यक्ती तितकी रसायने ( पत्रिका). प्रत्येक रसायन युनिक म्हणूनच प्रत्येकाचं भाग्य/ प्रारब्ध वेगवेगळे. म्हणूनच की काय जुळ्या, तिळ्यांची वरवर दिसणारी पत्रिका जरी सारखी असली तरी अंतरंगात वेगळे रसायन त्यांचे असते.


दैवयोगाने , मला या  "भविष्याच्या अंतरंगात"  डोकावण्याची संधी प्राप्त झाली/ आवड निर्माण झाली हे माझे भाग्य. हे रसायन जमून येण्यासाठी काही व्यक्ती कँटेलिस्ट म्हणून आयुष्यात आल्या. यात प्रमुख उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे माझे गुरुजी ठाण्याचे श्री वरदविनायक खांबेटे,  ज्यांच्या अनुदिनीमुळे ( धोंडोपंत उवाच ) या विषयाची गोडी लागली ते  दादरचे  श्री धोंडोपंत आपटे, आणि वेळोवेळी मी ज्यांच्याकडून हक्काने मार्गदर्शन घेतले ते  संभाजीनगरचे श्री दिपक पिंपळे. . तसेच माझी आत्ये बहिण आणि तिचे यजमान बोरिवलीचे श्री विनायक आणि सुनिता दामले  यांनी एकेदिवशी त्यांच्याकडची अनेक ज्योतिष पुस्तके मी अभ्यास करतो म्हणून आणून दिली. आजच्या ज्योतिष दिनानिमित्य या सर्वांचा मी ऋणी आहे🙏🙏


आजपर्यत अनेकांना यानिमित्ताने मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, अनेकांशी यानिमित्ताने ऋणानुबंध जुळले. हक्काने अनेकांनी अडचणी सांगितल्या, त्यांना शक्य होईल तसे मार्गदर्शन केले. भकिते बरोबर आली तशी चुकलीही. झालेल्या चुकीतून शिकण्याचा प्रयत्न केला, काही जणांनी  परिक्षा घेण्याहेतू प्रश्ण विचारले,  काहीजणांनी निव्वळ टिंगलटवाळी केली तर काहींनी अगदी मनापासून कसे फोकस व्हावे, डेटा अँनॅलिसिस,  आणि मनाची पवित्रता राहण्यासाठी ( जी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे) काय करणे आवश्यक आहे याचा प्रँक्टिकल अँप्रोच दाखवला  ☺️

या सर्वांचे अगदी मनापासून आभार. 


"भविष्याच्या अंतरंगात" पत्रिकेच्या माध्यमातून डोकावण्याचा हा प्रवास अखंडीत चालू राहिल हे मात्र नक्की

 

मंडळी, वयाच्या जवळजवळ ३० वर्षापर्यंत माझा पत्रिका/ ज्योतिष याच्याशी संबंध आला नाही. लहानपणी कधीतरी आई-बाबांनी पत्रिका काढलेली होती. पण समजा त्यावेळी कुणा गुरुजींनी तू या विषयाचा अभ्यास करशील किंवा लेखन वगैरे करशील असे सांगितले असते  तर मी  यावर अजिबात विश्वास ठेवला नसता हे ही तितकेच खरे


  मराठी गझलकार  भाऊसाहेब पाटणकरांच्या या ओळी मला पटतात. या  ओळींनीच हा लेख आवरता घेतो. धन्यवाद 🙏🏻


क्षणाक्षणाचे पडती फासे 🎲

जीव पहा हे रमलेले 

पुर्वजन्मीचे संचित त्यांच्या 📝

भाळावरती सजलेले 


जीवनातल्या या खेळात ♟

कुणी असते जिंकलेले 🏆

सगळं असत ठरलेले,

सगळं असतं ठरलेले 🎯


(ज्योतिषी अभ्यासक)अमोल केळकर

a.kelkar9@gmail.com


#आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन 📝

२०/०३/२१

Friday, March 19, 2021

जागतिक निद्रा दिवस


 जागतिक अमुक तमुक दिवसांच्या मंदिआळीत  आज एका नव्या दिनाची भर पडली आहे  ( म्हणजे आमच्या ज्ञानात )


तर आज आहे ( १९ मार्च)  

#जागतिक_निद्रा_दिवस 🥱😴

( अधिक माहिती: हा दिवस मार्च मधे साजरा करतात,  तारीख पक्की नसते पण बहुतेक करुन शुक्रवारच असतो. आज २०२१ मधे आज १९ मार्चला हा दिवस साजरा होत आहे)


निद्रा देवी तशी आमच्यावर प्रसन्न आहेच पण खाली काही गोष्टीत ती जास्त वरदायी होते हे नक्की


१)  अभ्यासक्रमाची पुस्तक ( सध्या ज्योतिष विषयक)  वाचताना


२) अभ्यासाला उठण्यासाठी  लावलेला गजर वाजल्यावर तो बंद करुन दहा मिनीटे अधिक झोपू असा विचार केल्यावर


३) ठाणे बसमधे खिडकीची जागा मिळाली असता ( आणि उतरायचे ठिकाण १० मिनिटात येणार असताना)  कितीही डोकं बडवले खिडकीला तरी बेहत्तर ,आहाहा काय झोप लागते म्हणून सांगू

( हेच रात्रीचा बस/ रेल्वे प्रवास करुन उतरायचे ठिकाण जे पहाटे असते ,ते यायच्या आधी लागणारी झोप) 


४) कंपनीची काॅन्फरन्स रुम,  मिटींग रंगात आली असताना


५) SAP ट्रेनिंग


६) रात्रीचे जेवण झाले, Whatsapp- फेसबुक खेळून झाले  की रात्री १० ची मालिका लागायला वेळ आहे जरा पडू असं म्हणून पाठ टेकली की येणारी निद्रा.


७) आणि पहाटे ५ किमी फिरून आल्यावर केलेल्या शवासनात आलेली झोप


बसं, इतक्या विविध प्रकारे निद्रादेवी प्रसन्न असताना आणि  दिवसातून वेळोवेळी भेटत असताना,


"झोपेचे सोंग घेऊन" वेगळा नवस करायची काय गरज? 😎


बाकी , सनम मेरे सनम,  कसम तेरी कसम, मुझे है आज कल 'निंद' आती है कम ' यापासून वाचलेला 🙈


( स्वप्नाळू)  अमोल 📝

जागतिक_निद्रा_दिवस

१९ मार्च २०२१

poetrymazi.blogspot.com

Wednesday, March 17, 2021

संपायदान


 " संपायदान " 📝

( बँक कर्मचाऱ्यांना समर्पित)

आता मनामधे येणे, तेणे जोडूनी घ्यावे, हत्यार मग काढावे, संपायदान हे !


 ग्रा हकांची मुंडी आवळो, तया कारणी भिती वाढो, भिता परस्परे मिळो, सुट्टी चैनीची!  


एटीएमचे दर्शन होवो, कार्ड - पिन जुळुनी येवो , जो जे वांछील ते न मिळो, खळखळाट!


वर्षातून एकदा मंडळी, खाजगीकरणाची मंदियाळी, निषेधाची मग होळी , करु न चुकता !


चला कल्पनेचे भारुड, देशभरातील कुठेलेही गाव, सुत्रधार ते 'अर्णव' , टीव्हीवरचे !


'केंद्र'राचे अलांछन, तांडव हे ताप हीन, ते समजती सदा सज्जन, कोणता हेतु!


किंबहुना सदा त्रृटी,  पूर्ण होऊ दे ग्राहक दुखी , भक्तितो आधी-पक्षी अखंडीत!


आणि 'आरबिआ'  वीये, विशेषी लक्ष दिये, मर्जर-दृष्ट-विजये, हो आवेजी!


येथ म्हणे श्री कुबेरश्वरावो, हा होईल संप पचावो, येणे बरे 'ग्यान' देवो

संप हा झाला

संप हा झाला

संप हा झाला 


📝 ( त्रस्त ग्राहक)  अमोल केळकर

१८/३/२१

Tuesday, March 16, 2021

मी विडंबनकार कसा झालो


 नाट्य परिषद सांगली, आयोजित


#नाट्यपंढरी_वाचनकट्टा 


आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l


कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l


वाचक : श्री. अमोल केळकर


Wednesday, March 10, 2021

मी लस घेतली


 *मी लस घेतली*💉


( मुळ गाणे : मी रात टाकली, लिंक मधे)


मी लस घेतली, मी लस घेतली

मी उजव्या बाहुचीच बाई सेल्फी काढली

मी लस घेतली....💉


दुख-या दंडात, दुख-या दंडात सुजून मुंग्या या येती

भर उन्हातली नार, दंड उडवीत चालती.

दुख-या दंडात, दुख-या दंडात

दंडात गं।

मी लस घेतली....💉


या रोगावरती, ना भय पांघरती

मी मास्क घालुनी बाई, दवाखान्यात जाती

मी लस घेतली....💉

( दुख-या दंडात, दुख-या दंडात

दंडात गं।

मी लस घेतली....💉)


अंगात माझिया भिनलाय 'डोसी'या

मी फिरफिर फिरती त्याची गो कारण झाली

मी स्वानंदी मनमानी बाई,रस्त्यात आली



मी लस घेतली, मी लस घेतली

मी उजव्या बाहुचीच बाई सेल्फी काढली

मी लस घेतली....💉


📝अमोल केळकर

#महाशिवरात्री ११/०३/२१

#माझी_टवाळखोरी

#विडंबन_प्लीज 😝

Wednesday, March 3, 2021

चहाच्या मळ्यामदी कोण गं उभी


 विडंबन प्लीज 😝 चा मान ठेऊन आणि पहिली ओळ सुचवणा-याचे आभार मानून *

( * मनोरंजन हा हेतू )


चहाच्या मळ्यामदी कोण गं उभी

नाटक करते मी शेठजी

शेठजी, 'हात जरा राहू दे, देशात मिठा परी ✋🏻


औदाचं ग  वरीस बाई मी, आसाम गाठलं ग

झोळी घेतली खांद्याला, बाई पानं टाकली त्यात गं

काळीज माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी

शेठजी, हात जरा राहू दे, देशात मिठा परी


गो-या गालावरी ग माझ्या राग यायला सुरु गं

गंगेमध्ये नाहले माझं, पाप गेलं धुऊन गं

ब्रदर पडला डोक्यावरी, तसाच ठोंब्या बाल जरी

शेठजी, हात जरा राहू दे, देशात मिठा परी



चहाच्या मळ्यामदी कोण गं उभी

नाटक करते मी शेठजी

शेठजी, 'हात जरा राहू दे, देशात मिठा परी ✋🏻


📝 ( दादा प्रेमी)

०३/०३/२१

Related Posts Plugin for WordPress, Blogger...