नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, October 28, 2022

एक खोका.. एक खोका


 'चौकट राजा' मधील एक गाणे , सध्यासाठी *

मुळ गाणे: एक झोका, एक झोका


आमचे गाणे:- ( *मनोरंजन हा हेतू) 


एक खोका, एक खोका 🎁 

इथे सत्तेलाच धोका, एक मोका...


सुरतेकडे,गोव्याकडे 

डोंगरातल्या झाडीकडे

जरा स्वत:लाच फेका..


एक खोका... एक मोका .


नाही कुठे थांबायचे

मंत्रीपद मिळवायचे

हाच थरायचा ठेका.


एक खोका... एक खोका .


वादविवाद वाढवायचे

कोर्टकचेरीला जोडायचे

हलका झाला, माझा खोका



एक खोका... एक मोका .


अमोल 📝

२९/१०/२२

Tuesday, October 25, 2022

दिवाळी_अंक_राशी_भविष्य


 'मोहिनी' म्हणतीय, तू नक्की यंदा परदेशी जाणार तर 'हेमांगी'च उगाच काहीतरी म्हणे 'गूड न्यूज' मिळण्याची शक्यता

'सुवासिनी' स्वत: सारखीच घाबरट, मला ही म्हणाली 'काळजी घे रे तब्येतीची'


काय करावं आता?


साधना, विपुलश्री, पद्मगंधा यांचं ही मत विचारू का  राहू दे


काहीच कळेना


#दिवाळी_अंक_राशी_भविष्य


🎆📝

२५/१०/२२


Wednesday, October 19, 2022

दिवाळी खरेदीत मी काय शिकलो


 

या दिवाळी खरेदीत मी काय शिकलो


कुणाला ही कमी लेखू नका.


 फुटपाथवरच्या विक्रेत्याकडे मी खरेदी केलेल्या वस्तूचे बिल देताना ( दिवाळीची खरेदी फूटपाथवरुन?नक्की काय घेतले? वगैरे  प्रश्ण नकोत.  फूटपाथ, लोकल मधील खरेदीचे मोल मुंबई / ठाणे/ नवी मुंबईकरच जाणतात) दोन तीन दा मोबाईल वर कोड स्कॅन केला तरी कनेक्ट होत नव्हतं


काय भाऊ ( actually भय्या हा शब्द वापरला होता असे स्मरते)  problem दिसतोय तुमच्या कोड मधे


त्यावर आमच्या भावाने ( प्रति भैय्याने)  जे सांगितले त्याला तोड नाही


म्हणाला मोबाईल flight मोड वर टाका, नंतर परत flight मोड काढा

मग बघा,


लगेच कामं झालं


तात्पर्य, कुणाला कमी लेखू नका, प्रत्यक्ष विमान प्रवास न करणाऱ्याला ( क्षणभर गृहीत धरून ) flight मोडचा उपयोग कसा करावा हे जास्त चांगले समजते 😷


टिप:

मंडळी ,  तुमची खरेदी झाली असेल तर हे वर्क होतयं का हे बघायला गेला नाहीत तरी चालेल. अजून बरंच दिवाळं आपलं दिवाळ्या बघायच्या आहेत. पुढल्या वर्षी ( किंवा पुढच्या खरेदीला)  मात्र हे लक्षात ठेवा 😁


अमोल 📝

२०/१०/२२

poetrymazi.blogspot.com

कोण व्हायचय तुम्हाला?



 

Monday, October 17, 2022

आई मला पुण्याला जायचंय


 आई मला पुण्याला जायचंय


माॅम, can I go?


 नाही



प्लीज,  


नाही म्हणलं ना एकदा 


माॅम

मी सगळा अभ्यास केला ना गं

सरासरी पेक्षा किती तरी जास्त मार्क पाडलेत ना?


हं


 दरवेळेला काय तेच तेच हिंदमाता, अंधेरी सब वे, परळ तिथंच सारखं सारखं साचून   कंटाळा येतो गं, सारखं सारखं कुर्ला, सायन, दादर स्टेशनच पाहतो.

पुणे स्टेशन कसं आहे ग ,आई?


मला नाही माहीत, पण हे एकदम काय पुण्याचे खूळ डोक्यात?


आई, गणपतीत नाही का आपण गिरगावला गणपती बघायला गेलेलो तेंव्हा एक कथाकथन लावलेलं

" तुम्हाला कोण व्हायच आहे मुंबईकर,पुणेकर का  नागपूरकर?"

पुणे कुठं बघितलं मी अजून

आई, प्लीज


अरे देवा,  बरं जा

तू कुठं ऐकणार म्हणा

पण एक लक्षात ठेव

दादर -स्वारगेट बसनं जायचं नाही, चांदणी चौकात अडकशील

दादर- पुणे बसनं जा


हो आई


आपल्या प्रभादेवीच्या सिध्दीविनायकाचा भाऊ आहे दगडूशेठ, गेल्या गेल्या त्याच्या दर्शनाला जायचं

बरं 


आणि हो पुणेकरांशी जास्त बोलायला जाऊ नकोस. त्यांचे टोमणे जास्त लागतात

पावसाळ्याचे दिवस आहेत. पुण्यातील प्रसिद्ध  वडा,मिसळ कुठं कुठं मिळतात याची केलेली यादी फाडून टाक. तुझ्या चंद्रकांत मामाला मी बाकरवडी, अंबा बर्फी कुरिअर करायला सांगते


बरं आई


जास्त फिरू नको, पुण्यात दिवाळी आली की थंडी पडते अन लगेच आजारी पडतोस.


नाही गं आई


मास्क काढलास तर याद राख!

आणखी एक, बिबेवाडीला माझा मित्र आहे, सिंहगड रोडला मैत्रीण आहे करत फिरू नकोस. फार तर त्यांना दशभूजा गणपतीजवळ 'अमृततूल्य' प्यायला बोलव.

आणि हो, पैसे तूच दे


बरं,  निघू


निघ लवकर मी रात्री मुंबईत महालक्ष्मी पकडते तू पुण्यात चढ मग आपण चंद्रकांत मामाकडे कोल्हापूरला परतू


थँक्यू आई


( अँन्ड रेस्ट इस द हिस्ट्री)


भूर भूर भूर

दिल्ली आहे दूर

आई मला पुण्याला  जायचंय

जाऊ दे नवं ⛈️


📝 अमोल

१८/१०/२२

poetrymazi.blogspot.com

ग्रहप्रधान व्यक्ती आणि फटाके


रवि प्रधान व्यक्तींना ठरलेल्या मुहूर्तावरच , नेहमीचे ठरलेले फटाके उडवायला आवडतात. केंव्हाही फटाके उडवणार नाहीत 🌅


चंद्र प्रधान व्यक्ती  साध्या फुलबाज्या, केपा तर ✨

शुक्र प्रधान व्यक्ती रंंगीत फुलबाज्या, फॅन्सी फटाके उडवण्यात रमतात 🎆


बुध वाल्यांचा फटाक्याची वात ब-याचदा विझते, त्यांना फटाका लाव परत जावे लागते  😁🏃🏻‍♂️


शनी प्रधान व्यक्ती बराच वेळ झाला फटाका न उडल्याने पुढे बघायला जातात आणि नेमका फटाका उडून भाजून, तोंड काळ करुन घेतात 🥴


मंगळ प्रधान व्यक्तीना, बाँब,तोटे,मोठ्या माळा, मोठ्या आवाजाचे फटाके उडवण्यात रस असतो 💥


गुरु प्रधान व्यक्ती  आकाशी झेप घेणारे  जसे राॅकेट , बाण वगैरे उडवतात 🚀 🏹


फटाके उडवण्यासाठी शुभेच्छा 💐💫


( *- सर्वसाधारण निरीक्षण  ) 📝

१७/१०/२२

poetrymazi.blogspot.com

Saturday, October 15, 2022

परतीचा पाऊस


 https://youtu.be/8aTGUrolfBE



वेळ झाली यायची तो

(हे वाचून बहुतेक नक्की पळेल 🏃🏻‍♂️)


परतीच्या पावसा तुला, इनंती आम्हा करु दे

'आभाळागत' माया तुझी...

नको आता 'वाहू'  दे... 🙏


रोज भिजू संध्याकाळचं

शिव्या खाऊ बायकोचं

खोबरं व्हावं वाहतुकीचं

छत्री मातुर रोज देवा, माझ्याकडे राहू दे.. ☔


कोथरुडच्या रस्त्यातली

गाडी व्हावी वरखाली

खड्डे ब्रेक झाकले,झाली-

किरपा तुझी,नेहमीच्या बिल्डरवर

होऊ दे. . .👷🏼‍♂️


ऊन थोडं, वीज भारी ⛈️

हादरली गावं सारी

ढग वाजला ढगावरी

पळायला घराकडं, अंगी बळ येऊ दे..

🏃🏻‍♂️🏃🏻‍♂️


अमोल

१५/१०/२२ 📝

poetrymazi.blogspot.com

Sunday, October 2, 2022

अभियंत्या भेट रे तू पुढच्या चौकात


 हर्षदा सुंठणकर यांनी  थिम दिली ,मग पुढचा पूल उडवायला जास्त वेळ लागला नाही


चांदण्यात फिरताना का रे केलास घात?

अभियंत्या भेट रे तू पुढच्या चौकात


होता तो एकटाच

खंबीर असा हायवेवर

दूर तिथे 'कळ'दाबे

आपटले दातावर

हे इथले खड्डेपण, आता सारे जाणतात


(अभियंत्या भेट रे तू पुढच्या चौकात)


सांग कसा त्याच्याविना

पार करु पुनवपूर?

सुसाट वारा घोंगावतो

आले खेड-शिवापूर

ब्रेक आता 'मारुकंस' ! क्लच माझा पारआत!


अभियंत्या भेट रे तू पुढच्या चौकात


चांदण्यात फिरताना का रे केलास घात?

अभियंत्या भेट रे तू पुढच्या चौकात


( चौकातील ) अमोल 📝

०२/१०/२२

#माझी_टवाळखोरी

Saturday, October 1, 2022

चांदणी चौक पूल, श्रध्दांजली


 ✨चांदणी चौक पूल, श्रध्दांजली ✨


बावधनवासी दु:ख मानसी,वाहतूक साचे चोहीकडे

क्षणात दाबून ब्रेक पायीचा, कणात अंतर दूर पडे


वरती बघता बंजाराचा, हिल बाजूला दिसलासे

मंगल 'चांदणी पूल' पाहता, मस्तकी पारा चढा दिसे



दिसती खालती उतारावरती,अनंत सध्या रांग पहा

कोथरुडावरती होय रेखिले कुरुपतेचे रुप महा


तडफड करुन थकले अपुले पुण्य जन हे सावरती

पाषाणी हृदयाच्या मध्ये दारुगोळा साठवती


पूल पाडण्या आतुर जनता हर्ष माईना हायवेत 

तुमचा आमचा विकेंड सरु दे 

"चांदणी चौकाच्या ' गाण्यात


अमोल 📝

०१/१०/२२

#माझी_टवाळखोरी

Related Posts Plugin for WordPress, Blogger...