नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, December 31, 2013

शुभेच्छा


याने   काय  फरक पडतो
हिंदू  नववर्ष  वा  ख्रिस्ती
करणारा  करतोच
पाहिजे तशी मस्ती  :)

 १ जानेवारीच्या  शुभेच्छा


Sunday, December 8, 2013

( झोपी गेलेले, जागे झाले )



' झाडून ' सारे पक्ष , 
मते  जनतेची काढली
निवडणूकीच्या  लढाईत
मर्जी  ' आपली ' वाढली

अमोल केळकर, ९ डिसेंबर २०१३

Wednesday, October 30, 2013

स्वप्नात खजिना येईल का ?




स्वप्नात खजिना येईल का ?
हंड्यात नाणी ही निघतील का ?

मी कुदळ हाती घ्यावे, तू ढिगास बाजू करावे
दोघांनी ठरवून घ्यावे, ही वाटणी नकळत ठरतील का?
स्वप्नात खजिना येईल का ?

ही झुंड मुंग्यांची संग, गांडुळाला आली जाग
डासांनी फोडले अंग, झुडपात कोंबडी धरशील का ?
स्वप्नात खजिना येईल का ?

सोन्याचा प्रतिमा दिसता, जणू स्वर्गच येई हाता
हातभरुनी घेता घेता  गजर ऐकून तू उठलीस का ?
स्वप्नात खजिना येईल का ?

( संधीसाधू ) अमोल केळकर
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१३

दिपावलीच्या सर्वांना शुभेच्छा. 


Friday, October 18, 2013

३री गोष्ट


एका लग्नाच्याही आता

 गोष्टी होतात अनेक


टीआरपी वाढण्यासाठी
झी ची अचूक फेक


Friday, August 23, 2013

निषेध



मी  तयार ठेवलेत सर्वप्रकारचे
 निषेधाचे खलीते
 कारण सरकार आता उरलेय
 फक्त उपचारापुरते


अमोल केळकर
२४ ऑगस्ट २०१३

Monday, August 5, 2013

गटारी


 काय ठरला बेत ?  झाली का तयारी?
 अहो असं काय करता, आहे ना गटारी

यानंतर काही दिवस
विसरुन जा कालवण
बरोबर ओळखलंत
येणार आहे श्रावण........

Wednesday, July 31, 2013

To ' डे '












अमोल केळकर, १ ऑगस्ट २०१३

Thursday, July 25, 2013

२६ जुलै



कुणी विसरु शकेल
ती काळी रात्र  ?
जणू सागरच बनले होते
मिठी नदीचे पात्र

तरीही आमचे सुरु
शहरीकरणाचे सत्र
शिकलो नाही आपण
यातून काडी मात्र

२६ जुलैग्रस्त  मुंबईकर

Monday, July 22, 2013

* जर्दा आणि मावा *




 सरकारने घेतला निर्णय
 सर्वांनी करुया  वाहवा
 गुट्ख्या बरोबर आता
 बंद होणार आहे मावा

जर्दावरही आता म्हणे
येणार आहे बंदी
मागील दाराने देणा-यांची
होणार की हो चांदी

अमोल केळकर
जुलै २३, २०१३


Tuesday, July 16, 2013

छम- छम-छम


रोजगाराचे लेबल लावून
सुरु झाली छम छम
रोजच गार होणा-यांना
सोडणार  नाही यम

उघडपणे आता परत
घेतली जाईल रम
आबा तुमच्या इशा-यात
आता राहिला नाही दम

अमोल केळकर
१६ जुलै २०१३

Friday, July 12, 2013


निमित्य आहे पावसाळा
आस असे  भेटीची
बघा सुरु झाली लगेच
लगबग चार ओळींची
------------------------------------
अमोल केळकर, जुलै १२, २०१३

Wednesday, July 10, 2013

चार - ओळी


एकदिवस अचानक
भेटल्या  ओळी चार
मी मात्र शोधत राहिलो
त्यातील गहन विचार
---------------------------
अमोल केळकर, जुलै ११, २०१३

बुध्द




काय करताय तुम्ही
आहे का तुम्हाला शुध्द
रडतोय म्हणे तिथे आता
हसणारा तो बुध्द ......

अमोल केळकर, १० जुलै २०१३

Sunday, June 30, 2013

राज - मार्ग




Saturday, June 29, 2013

टोल ( वा ) टोल ( वी)



Wednesday, June 26, 2013

रुपया




जेष्ठ नागरिकांच्या पंक्तीत

जाऊन बसलाय रुपया

आराम करु दे त्याला

नका  देऊ त्रास कृपया

अमोल केळकर, २७ जून २०१३

Thursday, June 13, 2013

चांदी




     सोन्यासारख्या संहितेची
     करुन टाकली चांदी
     रस्त्यावर येणारच आडवी
     कधी म्हैस कधी फांदी

    पु.ल करुन कथेला
    दिला गेला नवा लूक
    मराठीच्या प्रेमापोटी
    माफ करु ती ही चूक
 


                                                               






अमोल केळकर
                                                              १४ जून २०१३

Sunday, May 19, 2013

** एका खेळाची गोष्ट **


  ** एका खेळाची गोष्ट **

येणारा पुढचा चेंडू
झाला होता फिक्स
फलंदाजाने मारली
घणघणाती सिक्स

तीन तासाच्या सिनेमाप्रमाणे
गोष्ट घडते खेळाची
किंमत ठरते ' शून्य ' मग
सामान्य जनतेच्या वेळेची

अमोल केळकर
मे २०, २०१३
( www.poetrymazi.blogspot.in)

Monday, May 13, 2013

विचारपूस ...



दरवर्षी गणपती बाप्पाला
मिळतात आंबे हापूस
करतील का कधी आंबेवाले बंधू
सामान्य माणसांची विचारपूस ...

अमोल केळकर
मे १४, २०१३
( विनायकी चतुर्थी , अंगारक योग ) 



Monday, April 29, 2013

ये है मुंबई मेरी जान !!!!!!!




ज्या शहराने दिले नाव
त्याचाच आला कंटाळा
खाल्या मिठाला जागून तरी
तोंडाला लावून घ्या टाळा

बदल असतो आवश्यक
त्याला आमची ना नाही
बदलापूरला लक्षात आले
मुंबई यांची राहिली नाही


( मुंबईकर )  अमोल केळकर
एप्रील ३०, २०१३


Friday, April 26, 2013

झाडाझडती


 काका मला वाचवा
 पुरे झाली झाडाझडती
आम्हा दोघांच्यातच आता
वाटून द्या सगळी खाती

अमोल केळकर
एप्रील २७,२०१३


Tuesday, April 23, 2013

' ' एक ' असत्य ' प्रयोग



वर्मावर बोट ठेवताच
असत्य आले बाहेर
रामू लक्षात ठेव आमचे
सगळीकडे आहेत हेर

माफीनाम्याचा खलिदा
ताबडतोब झाला प्रकाशीत
' आवाज कुणाचा ' प्रश्णाला
उत्तर मिळाले खणखणीत

अमोल केळकर
एप्रील २४, २०१३



Saturday, April 13, 2013

आयपील


टीआरपीच्या नावाखाली
माफ होतील यांच्या चूका
म्हणूनच हे विराट सामने
गंभीरपणे पाहू नका

आयपीलचे प्रतेक वर्ष
नवे वादळ येत असते
यावरच तर खेळाडूंचे
सर्व गणित ठरले जाते

अमोल केळकर
१३ एप्रील, २०१३


Monday, April 1, 2013

IPL


देशासाठी खेळताना
तूलाच होते हरवले
पैशासाठी मात्र लगेच
सर्व काही विसरले

अमोल केळकर


Wednesday, March 6, 2013

मी - माझे फेसबुक



सकाळचा चहा  माझा, लॉगीन शिवाय होत नाही
तरीही  फेसबुकवर मी  आजकाल जास्त येत नाही

लोकलमधे  उभे रहायला जागा मुळीच नसते
चवथ्या सीटच्या जागेसाठी आस कायम असते
उभ्याने खरं सांगतो मोबाईलही येत नाही सांभाळता
इथे येण्यासाठी म्हणूनच  घेतलाय पाय आखडता

सकाळी सकाळी  साहेबाला होते मिटिंग घ्यायची इच्छा
मग कशा देणार हो  मित्रांना वाढदिवसाच्या  शुभेच्छा
शिळ्या पोस्टना लाईक करण्यास अर्थ उरत नाही
म्हणूनच  फेसबुकवर मी  आजकाल जास्त येत नाही

व्हॉटस अप म्हणत शेजारचा मित्र मेसेज पाठवतो सारखे
म्हणून का मी व्हावे माझ्या फेसबुकला पारखे ?
अवघड जागीचे दुखणे असे यात काहीही नाही
तरीही  फेसबुकवर मी  आजकाल जास्त येत नाही

मैत्रीचा हात स्विकारायला कष्ट आहेत अनेक
कळत नाही यातील कोणते अकांट असेल फेक
कालचा मित्र आज लगेच ओळख दाखवत नाही
म्हणूनच  फेसबुकवर मी  आजकाल जास्त येत नाही

अमोल केळकर
मार्च ७, २०१३

Tuesday, February 12, 2013

मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही


            अल्बम - कॉपीपेस्ट वर बोलू काही
  
        मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही
        मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस घेतला नाही.....

        भवताली सतत चाले, ते इंटरनेट बघताना
        कुणी  धाग्यातून चिडताना, कुणी एकट्याने लढताना
        मी सदस्य होउनी बसलो, फेसबूकवरती जेंव्हा
        ते पहायला देखिल, मग कुणी राहिले नाही.....

        एकच ब्लॉग मी पाहे,   मूळ लेखन जिथल्या तेथे
        काढूनी प्रिंटही  त्याची   वेळीच टॅगली पाने
        पण झोपेतून एकदम, जागच आली नाही
        कुणी लाईकही केले नाही, कुणी लाईटली घेतले नाही......

        काढलेला एकच धागा, चाहत्यांची उलटी मुंडी
        जालावर अजुनी दिसती , डिलीट पोस्टच्या  नोंदी
        मी  सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो 
        मी मनाशी  सुध्दा माझ्या , कधी पंगा घेतला  नाही

        मज जन्म स्थळाचा मिळता, मी याहू झालो असतो
        वाढवायची असती यादी  तर हॉटमेल झालो असतो
        मज डिलीट करता कोणी  रडलो वा हसलो नाही
        मी फॉलो केले नाही अन करुन घेतले नाही 

     
      अमोल केळकर
     फेब्रुवारी १२, २०१३
 

Sunday, February 3, 2013

लिलाव



 इकडून तिकडे तिकडून इकडे
  संघ बनवले मालकांनी
  बँक खाती सर्वांचीच
  भरून वाहतील पैशांनी

 जून्या बरोबर नव्यांचाही
 दणक्यात झाला लिलाव
 ' सचिन दादा ' यंदा तरी
  बॅटला बॉल लाव

अमोल केळकर
फेब्रुवारी ०४, २०१३

Thursday, January 31, 2013

विश्वरुप दाखवा हो ...... !


 नशीब या कलीयुगात
अवतार घेतला नाही
भगवंताने !

विश्वरुप दर्शनासाठी त्यालाही
फटकारले असते
हायकोर्टाने !!

अमोल केळकर
फेब्रुवारी १, २०१३

Monday, January 28, 2013


कुणीच  नाही म्हणत
आम्ही आहोत विकाऊ
तरी सर्वाना पाहिजे
मिळणारा सोपा खाऊ

'आम' दाराने आलेलेही
'खास' दार हुडकतात
नेते मात्र विनाकारण
तोडघाशी पडतात

अमोल केळकर
जाने २९,२०१३ 

Saturday, January 26, 2013

जोशी Vs आपटे




जोशी आपटेंच्या वादात
मिडिया घालतीय फोडणी
यातूनच होणार आहे आता
अध्यक्षपदाची जुळणी.

अमोल केळकर
जाने २७,२०१३



 




Wednesday, January 23, 2013

अध्यक्ष - उपाध्यक्ष




कुणाचा बनतो अध्यक्ष
कुणाला उपाध्यक्षाची माळ
काय माहित कसा असेल
येणारा पुढचा काळ

सहा  - नऊ च्या गणितात
जनता झालीय त्रस्त
नेत्यांना मात्र रोज नवीन
चरायला कुरणे मस्त

अमोल  केळकर
दिनांक - २३/१/२०१३

Thursday, January 10, 2013

८६ व्या अ.भा मराठी साहित्य संमेलनास हार्दीक शुभेच्छा


८६ व्या अ.भा मराठी साहित्य संमेलनास हार्दीक शुभेच्छा


   हित साध्य करण्यासाठी
   घेतले जातात मेळावे
   अशी स्थिती असताना
    मागे का रहावे ?

  साहित्य संमेलनात उपस्थिती
  राजकीय नेत्यांची नवी रीत
  साहित्यीक मात्र जमू लागले
  मैदानात  भीत भीत

अमोल केळकर
जाने ११, २०१३

Wednesday, January 9, 2013

चार दिवस सुनेचे


' चार दिवस सुनेचे ' 

सासूच्या चार दिवसानंतर
सुनेचेही येतील दिवस चार
प्राईम टाईमच्या या खेळात

स्वतःच होऊ या तडीपार

अमोल केळकर
जाने. १०, २०१३





Tuesday, January 8, 2013

थंडी


थंडी

मुंबईतील घराघरात
बंद झालेत फॅन
आठवणीत राहील थंडीने
दोन हजार तेराचा जॅन


अमोल केळकर
जान ९,२०१३

Related Posts Plugin for WordPress, Blogger...