नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, September 28, 2022

यल्लोजी सनम हम आ गये


 आमची रोजची ठाणे लोकल सिवूड नंतर नेरुळ च्या आधी ट्रॅक बदलून हार्बर लाईन वरुन  ट्रान्स हार्बर मार्गावर येते


हा ट्रँक बदलायला मदत करणारा सिग्नल मधील रंग म्हणजे पिवळा.

लाल आणि हिरव्या पेक्षा थोडा दुर्लक्षित पण योग्य वेळी योग्य मार्ग दाखवणारा. संयमित मार्गक्रमण करण्यास मदत करणारा आणि क्षणार्धात लाल,हिरव्यात लुप्त होणारा


जीवन सुंदर आहे फक्त हे  हे 'यलो' सिग्नल पार करुन योग्य ट्रॅक पकडता आला पाहिजे 😊 


वरची हार्बर लाइनची लोकल सावकाश जेंव्हा ट्रान्स-हार्बरवर पूर्णपणे वळली की गार्ड ड्रायव्हरला विशिष्ठ हाॅर्न देऊन "आँल इज वेल" असे कळवतो


इकडे आपण आपलेच गार्ड आणि ड्रायव्हर . जेंव्हा एखादा नवीन विचार/ मार्ग/ दिनक्रमात बदल करताना योग्य नियोजन, अभ्यास करुन मार्गस्थ होताना आपणच   आपल्याला इंडिकेशन द्यायचे आणि गुणगुणायचे


कैसे जादुगर हैं बहार के ये दिन |

जान ही न ले ले खुमार के ये दिन |

जीने नहीं पाऊँगा,

 हाय मर जाऊँगा,

 ऐसे न मारो नज़ारा मुझे |


'येल्लो'जी सनम हम आ गये, आज फिर दिल ले के  💛


अमोल 📝

अश्विन शु. चतुर्थी

२९/०९/२२


Tuesday, September 20, 2022

पार्कात मेळावा होईल का


 सध्या दोनच ज्वलंत प्रश्ण आहेत


पार्कात मेळावा होईल का

चित्यांत दंग तू राहशील का?

होईल का?

( बाकी सगळं ओके) 


मी त्या गटातून यावे

तू इकडेच पडीक असावे 

दोघांना पर-डे मिळावे

ही 'किमया' नकळत करशील का?

करशील का?

(पार्कात मेळावा होईल का?)


ही धूंद प्रितीची बाग

'आवाजाला' आली जाग

नियमांचा झाला भंग

मिळताच 'पाववडा' घेशील का?

घेशील का? 

(पार्कात मेळावा होईल का?)


खिशातून 'गन' काढता

जणू 'टशन' होऊदे आता

मधु-इलेक्शन येता येता

राड्यातून हळूच तू पळशील का?

पळशील का?


पार्कात मेळावा होईल का

चित्यांत दंग तू राहशील का?

होईल का?


अमोल 📝 २१/०९/२२

#माझी_टवाळखोरी

Saturday, September 3, 2022

पुणेकरा, तू खरा झुंजार


 ' उडती बस '  ते ही पुण्यात ही संकल्पनाच इतकी आवडली की बस 😬


 'उडत्या बसी' मधूनी देशी

ट्रँफिकला आधार

पुणेकरा, तू खरा झुंजार


लाल हिरवा सिग्नल सारा

तुच मिसळशी सर्व पसारा

'आकाशच'  मग ये आकारा

तुझ्या मतांच्या खंबीरतेला नसे अंत ना पार


पुणेकरा, तू खरा झुंजार


पेठापेठांचे रुप आगळे

प्रत्येकाचे स्टाँप वेगळे

तुझ्याविना ते कोणा न कळे

कुणी जाई काळभोर-लोणी,कुणी उतरे शनीपार


पुणेकरा, तू खरा झुंजार


तुच घडविशी तुच फोडीशी

कुरवाळीशी तू, तुच तोडीशी

न कळे यातून कशी 'उड'विशी

देसी सेवा परी निर्मिल्या मेट्रोपुढे अंधार


पुणेकरा, तू खरा झुंजार


उडत्या बसी' मधूनी देशी

ट्रँफिकला आधार

पुणेकरा, तू खरा झुंजार


📝 ०४/०९/२२

poetrymazi.blogspot.com

Friday, September 2, 2022

उडती बस पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या


 आमचे अजोळ पुणे.. गडकरी साहेबांनी उडती बस पुण्यात आणायची म्हणल्यावर हे लहानपणीचे गाणे आता असे ऎकू यायला लागले आहे *



( मनोरंजन हा हेतू * 📝)


अगगग अगगग खड्यात गाडी

धुळींचे लोट हवेत सोडी

उडती बस पाहूया, 

मामाच्या गावाला जाऊ या


जाऊया मामाच्या गावाला जाऊ या


मामाचा गाव मोठा

रहदारीच्या पेढ्या

त्यातून सुटका करु या

मामाच्या गावाला जाऊ या


मामाची जागा पाषाsण

चांदणी चौकात गेले त्राण

उडती बस मग घेऊ या

मामाच्या गावाला जाऊ या


मामाचा गाव तालेवार

रिक्षा,दोनचाकी वाहते भार

मेट्रो विसरून जाऊ या

उडती बस पाहू या


अगगग अगगग खड्यात गाडी

धुळींचे लोट हवेत सोडी

 उडती बस पाहूया, मामाच्या गावाला जाऊ या


( प्रासंगिक)  अमोल

भाद्रपद शु. सप्तमी

०३/०९/२२

Related Posts Plugin for WordPress, Blogger...