नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, September 30, 2023

स्वच्छांजली


 स्वच्छांजली:- 📝

१/१०/२३ 


मुख्य पक्षाच्या कार्यालयाबाहेर मोठा कार्यक्रम ठरला होता. पक्षाचे सर्व  नेते ते सामान्य कार्यकर्ते यांना निरोप गेले.

कमळाच्या आकाराचा मोठ्ठा हौद बांधला होता. वाॅशिंग पावडर 'कमळा' ची गाणी होती, ठिक ठिकाणी जहिराती होत्या.


कार्यक्रमाची सुरवात प्रार्थनेने झाली. इतर पक्षातून नुकत्याच योग्य टायमवार आलेल्या एका समूहाने प्रार्थना म्हणली


*दे दी हमे आझादी, सारा बचाके काला माल*

*स्वच्छता के विश्वगुरु कर दिया कमाल*


असं म्हणून ते सारे हौदा कडे डुबकी मारायला जायला लागले  त्याचवेळी एक उद््घोषणा झाली.

मित्रो, हा हौद नव्या आलेल्या लोकांसाठी नाही. त्यांना तर आम्ही आधीच डुबवले आहे.

आज पक्षांतील सर्व जुन्या नेत्यां पासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत डुबकी मारुन स्वत:ला स्वयंसिद्ध करायचे आहे


डुबकी मारलेल्या सर्वांना

 'स्वच्छांजली ' प्रमाणपत्र घरपोच पोचवण्याची जबाबदारी इतर अराजकीय स्वयंसेवकांवर सोपवली आहे. ते तुमच्या घरी योग्य प्रकारे पोचतीलच


असे म्हणून तो आवाज 'डुबूक ' आवाज काढण्यासाठी हौदाकडे गेला आणि मागे समर्थकांची रांग लागली

🌷🌷🌷🌷🌷🌷


#स्वच्छांजली

poetrymazi.blogspot.com

Sunday, September 24, 2023

माझी टवाळखोरी


 


Wednesday, September 20, 2023

आमचे पप्पांनी विकास आणला


"आमचे पप्पांनी गणपती आणला" हे यंदाचे गणेशोत्सवातील प्रसिद्ध झालेले गाणे. 

या पासून स्फूर्ती घेऊन


 आमचे टवाळखोर _गाणे भक्तांच्या शब्दात 😎 *

( निव्वळ मनोरंजन हा हेतू *)


आमचे पप्पांनी विकास आणला

आमचे पप्पांनी विकास आणला


मुंबईची कराया शांघाई

डोस्कावर बसली महागाई

वटारून बघतोय चांगल

आमचे पप्पांनी विकास आणला

आमचे पप्पांनी विकास आणला


गळ्याला त्याच्या पक्ष लागला

इडीने पप्पांना इशारा केला

भ्रष्ट आचा-याला अभय दिला

आमचे पप्पांनी विकास आणला

आमचे पप्पांनी विकास आणला


ईश्वगुरुंना कामाचा व्याप

भुंगे आले बाप रे बाप

भिती कशाची कमळाला

आमचे पप्पांनी विकास आणला

आमचे पप्पांनी विकास आणला


( लाडका भक्त)  📝

२०/०९/२०२३

#ऋषीपंचमी

#माझी_टवाळखोरी 📝


https://youtu.be/trTaytD1eW4?si=CLFfZwqilihCfvWc

Tuesday, September 19, 2023

गणेश चतुर्थी


 आज भाद्रपद शु चतुर्थी दिवशी 'चंद्र ' बघू नये यावर ठाम असणाऱ्यांसाठी मोलाचा सल्ला :*-


ढगाळ हवामान आहे चंद्र दिसणं शक्यच नाही म्हणून बिंधास्त राहू नका कारण


 घरगुती किंवा सार्वजनिक मंडळात अनेकांनी चंद्रयानाचा देखावा  केला आहे. नेमकं तिथे दर्शन व्हायचे चंद्राचे.  


त्यापेक्षा घरीच रहा 😬


मोरया 🙏🌺

#माझी_टवाळखोरी📝

१९/०९/२३ 


( टिप: लेखनाचा उद्देश चंद्र दर्शन न करण्याबाबत आठवण करून देणे आहे भले काही ठिकाणी ढगांचे आच्छादन नसेल ही )

Sunday, September 17, 2023

नावात आणि नंबरात काय नाही


 संभाजी नगर मधे बछड्यांची नावे ठेवताना पहिल्या चिठ्ठीत 'विक्रम' नाव आले. दुसरे नाव कदाचित 'वेताळ' अपेक्षित असताना नेमकी 'आदित्य' नावाची चिठ्ठी आल्याने  राज्यकर्त्यांचा घोळ झाला बहुतेक 


परत एकदा आमच्या राज्यकर्त्यांनी शेकस्पिअरला खोटे पाडले.


ता.क : केवळ नावच नव्हे तर नंबराॅलाॅजीत ही  ( न्यूमराॅलाॅजी कदाचित बरोबर शब्द असेल पण आम्ही भारतीय आहोत,इंडियन नाही त्यामुळे आमच्यासाठी नंबरालाॅजीच लाॅजिकल शब्द आहे)  आम्ही  भारतीय मागे नाहीत


आजचंच बघा ना, आज ७३ नंबरचा दिवस होता यात शंका नाही


आज अंतीम सामन्यात  तळपलेला गोलंदाज  सिराज याच्या शर्टामागे नंबर होता ७३ आणि आजच आमच्या सन्मानीय पंतप्रधानांचा ७३ वा वाढदिवस होता

म्हणूनच आज आम्ही सहज विजय प्राप्त केला, अध्यक्ष महोदय !


#कोण_म्हणतं_नावात_काय_नाही?

#कोण_म्हणतं_नंबरात_काय_नाही?

#माझी_टवाळखोरी 📝


१७/०९/२३

www.poetrymazi.blogspot.com


Friday, September 15, 2023

संपता श्रावण


 संपत्या श्रावणावर आलेल्या शुक्रवारी म्हणजे काल अनेक मैफिली रंगल्या असे कळते. एके ठिकाणी तर नेहमीची आवर्तने झाल्यावर सगळे जायच्या तयारीत असताना एकजण म्हणाला कुठं चाललाय, बसा अजून


झालेली आवर्तने अधिक श्रावणाची होती.

 निज श्रावणाची आता सुरु करु


डोळे पाणावले भावाच्या बोलण्याने सगळ्यांचे


१६/०९/२३

माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.com

Thursday, September 14, 2023

लिहून मोकळं व्हायचं


 केमिकल इंजिनियरींग ला असताना प्रॅक्टिकल परीक्षेनंतर जी व्हायव्हा ( तोंडी परिक्षा ) असायची त्यावेळी आमचा ग्रुप जाम टेंशन मधे असायचा.


त्यावेळी मित्रांचे टेंशन कमी करण्यासाठी आम्हीही हेच सांगायचो जे काही दिवसांपूर्वी मा.मुख्यमंत्री बोलले


"आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं " 🏃🏻‍♂️🏃🏻‍♂️🚶🏻‍♂️


मित्र ही , " हो, यस्स म्हणून दुजोरा द्यायचे "


हा प्रसंग घडला त्यावेळी  शेजारी ' एक्स्टर्नल परीक्षक'  ऐकत  होता हे आम्हाला कळले नाही आणि जेंव्हा हे लक्षात आले तेंव्हा ही फारशी चिंता वाटली नाही कारण


साक्षात 'एचोडेश्वर'( HOD)  आमचे प्रोजेक्ट गाईड होते.

त्यामुळे मतांवर आपलं मार्कांवर जास्त परिणाम होणार नव्हता याची खात्री होती ( आणि तसंच झालं) 


हीच थेरी/ केमिस्ट्री / सूत्र  पुढे आमच्या अनेक मित्रांनी  नोकरी करताना साहेबाच्या केबिनमध्ये ही वापरून यश संपादन केले. अनेक जण आज ( आमच्यासह) चांगल्या पदावर आहेत ते याचमुळे 


असो. यानिमित्याने मी परत एकदा तमाम मित्र मंडळीना ही थेरी  प्रत्येक क्षेत्रात ( उदा. सोशल मिडियावर व्यक्त होताना वगैरे) उपयोगी आहे हे आवर्जून सांगेन.


विशेष टिप: या थेरीचा उपयोग स्वतःच्या घरात, स्वत:च्या बायकोसमोर मात्र आपापल्या जबाबदारी वर करावा. ' सूत्र ' फेल गेल्यास 'सूत्रधार जबाबादार नाही, 


 'भिंतीला ही माईक' असतात याची नोंद घ्यावी 😊


इंजिनियरींग दिनाच्या शुभेच्छा 🙏💐

( अमोल) 🧪


१५/०९/२३

#लिहून_मोकळं_व्हायचं

#इंजिनिअर्स_डे

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.com

Wednesday, September 13, 2023

अराजकीय गोष्ट


 ( अराजकीय 📝)


पहिला मित्र: 


आपण पिऊन मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं.


दुसरा : हो,Yes


आम्ही  :- निर्लज्यांनो मी ऐकतोय मागे उभारून तुमच्या.

 दरवेळेला काही झालं की बिल माझ्या नावावर 😠


#श्रावण_संपतोय

#माझी_टवाळखोरी


१३/०९/२३

poetrymazi.blogspot.com

Friday, September 8, 2023

राजकीय मिम्स


 


Thursday, September 7, 2023

नावात काय आहे


 अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणारे आज 'भारत' नावावर ठाम आहेत.


बदलायचं तर 'हिंदुस्थानच' करा की


( मुंबईत ९ डब्याच्या लोकल १२ डब्याच्या करताना १५ डब्याच्या कराव्यात हे लक्षात न आल्याने आता परत १२ च्या १५  करायचा खर्च करावा लागतोय 😊 ,असो)


भावा शेक्सपिअरा,


म्हणून गेलास तू

'व्हाट इस देअर इन नेम '

इकडं असतास तू  तर

झालाच असता तुझा गेम


अजिबात मान्य नाही म्हणलेले

नावात आहे काय?

नावात आणि नावे ठेवण्यात

असतं बर का खूप काय


०८/०९/२३ 📝

poetrymazi.blogspot.com


( आमच्या कडे जन्म तारखेवरुन नावाचे अद्याक्षर देण्यात येईल 😌 )

Related Posts Plugin for WordPress, Blogger...