केमिकल इंजिनियरींग ला असताना प्रॅक्टिकल परीक्षेनंतर जी व्हायव्हा ( तोंडी परिक्षा ) असायची त्यावेळी आमचा ग्रुप जाम टेंशन मधे असायचा.
त्यावेळी मित्रांचे टेंशन कमी करण्यासाठी आम्हीही हेच सांगायचो जे काही दिवसांपूर्वी मा.मुख्यमंत्री बोलले
"आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं " 🏃🏻♂️🏃🏻♂️🚶🏻♂️
मित्र ही , " हो, यस्स म्हणून दुजोरा द्यायचे "
हा प्रसंग घडला त्यावेळी शेजारी ' एक्स्टर्नल परीक्षक' ऐकत होता हे आम्हाला कळले नाही आणि जेंव्हा हे लक्षात आले तेंव्हा ही फारशी चिंता वाटली नाही कारण
साक्षात 'एचोडेश्वर'( HOD) आमचे प्रोजेक्ट गाईड होते.
त्यामुळे मतांवर आपलं मार्कांवर जास्त परिणाम होणार नव्हता याची खात्री होती ( आणि तसंच झालं)
हीच थेरी/ केमिस्ट्री / सूत्र पुढे आमच्या अनेक मित्रांनी नोकरी करताना साहेबाच्या केबिनमध्ये ही वापरून यश संपादन केले. अनेक जण आज ( आमच्यासह) चांगल्या पदावर आहेत ते याचमुळे
असो. यानिमित्याने मी परत एकदा तमाम मित्र मंडळीना ही थेरी प्रत्येक क्षेत्रात ( उदा. सोशल मिडियावर व्यक्त होताना वगैरे) उपयोगी आहे हे आवर्जून सांगेन.
विशेष टिप: या थेरीचा उपयोग स्वतःच्या घरात, स्वत:च्या बायकोसमोर मात्र आपापल्या जबाबदारी वर करावा. ' सूत्र ' फेल गेल्यास 'सूत्रधार जबाबादार नाही,
'भिंतीला ही माईक' असतात याची नोंद घ्यावी 😊
इंजिनियरींग दिनाच्या शुभेच्छा 🙏💐
( अमोल) 🧪
१५/०९/२३
#लिहून_मोकळं_व्हायचं
#इंजिनिअर्स_डे
#माझी_टवाळखोरी 📝
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment