नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, February 24, 2021

या मैदानाचे सुख


 संत एकनाथ महाराजांना स्मरून 🙏*


या मैदानाचे सुख, पाहता डोळा

दिसे तो जिव्हाळा, मितरांचा


देऊनिया नाम वेधले दर्शनी

आणिक पाहुनी खुशी झाली


जनार्दने द्विजा, भावे लोटांगणी

घाली ओवाळणी वर्चस्वाची


📝 અમોલ કેલકર

२५/०२/२०२१

गुरू-पुष्यांमृत

एकनाथ महाराज आत्मसमर्पण दिन ( तारखेने)


* नमोरंजन हा हेतू

रोजचं लिहायच भारीच सुख


 ऊन खिचडी साजूक तूप... 

वेगळं व्हायचं भारीच सुख’ . 


विसूभाऊ बापट यांची अशी एक कविता आहे, हीच कविता आमच्या शब्दात, नियमीत लेखन करणा-यांना समर्पित 

लेख चारोळी कविता खूप 

रोजचं  लिहायचं "भारीच" सुख 📝


एक नाही दोन नाही कडवी  बारा,

काव्य  कसलं मेलं ते, बाजारच सारा.

हा ग्रुप तो ग्रुप , जिकडे तिकडे तीर 

फेसबुक भिंत  रंगवायला परत फिर 

दिनविशेष ,जयंती सण नी वार 

शब्दरूप  कोटीने, जीव बेजार 

कधी एक दिवस  राहीलं  तर वाटते चूक     

रोजचं  लिहायचं "भारीच" सुख 🤗


सगळ्यांना वाटतं माझ लेखन टुकार 

टुकार टुकार  म्हटलं तरी वाक्य  येते जमू 

अन् एवढासा लेख  झाला तरी त्यातही रमू 

राजकीय  चारोळी चुगलीत हलकी,

वीतभर प्रसंगाला  हातभर लेखणी 

अण्णांची माया काय शेठजींना येते?😎

टीका केली म्हणून कोणी  दुःख का करते?

कविता अन्  विडंबन  यात अंतरच खुप,

रोजचं  लिहायचं "भारीच" सुख.   😌


दोघांचा लाईक  म्हणजे  दिवाळी दसरा,

दोघात तिसरा हा  लेखाचा नखरा.

कुणी मग  शिकवायचं  , छान छान ल्यायचं,

गुलुगुलु बोलायचं नी पुढे पुढे  ढकलायचं .

आठवड्याला स्तंभ लेख , त्यात एखादी खोडी

फिटतील साऱ्या  आवडी निवडी.

लेखनाची अशी ती  रेसिपीच काय?

राज-कारण ,कला, हीच आमची माय  ,

कधीतरी टिप्पणी करून बसायचं चूप 😷

रोजचं  लिहायचं "भारीच" सुख.   ☺️


रडले चीडले त्यानी अबोला धरला,🤨

तेव्हा कुठे वेगळा ब्लॉग  मांडला.

पण साला  अनुदिनीच  काही कळतच नाही,

महिन्याच टार्गेट  काही  पुर होत  नाही.

शब्द  आहे तर वाक्य   नाही ,

लेख  आहेत पण पहायला नाही.

संकेतस्थळाची तर  तऱ्हाच नवी,

घोटभर  लेख  द्यायला पण परवानगी  हवी

कुणी केकाटल  तर ते खपायचं नाही,

मिनीटभरही दुर्लक्ष  करायचं  नाही.

तरीही मत मांडायला मीच,

प्रतिक्रिया द्यायला  मीच.

शुभेच्छा द्यायला ही  मीच,

अन्  सगळ्यांची मर्जी पण राखायची मीच.😏

जिवाच्या पलीकडे काम झाल खुप,


"लेखन थाबवायचं ही, कळायला लागल सुख." 


( आश्वासक )अमोल केळकर 🤪

२४/०२/२१

Friday, February 19, 2021

रथसप्तमी, शिवजयंती


 १)

विधीवेध कर्मासि आधार कर्ता। स्वधाकार स्वाहाही सर्वत्र भोक्ता। असे अन्नदातां समस्तां जनांसीं। नमस्कार त्या सूर्यनाराणयासी !

(सूर्यस्तुती)


२) हिंदवी स्वराज्याचा आधार कर्ता !

भाग्यवंत रयतेचा राजा हा द्रष्टा! 

 असे अन्नदाता समस्तां जनांसी !

नमस्कार माझा 'शिवछत्रपतींशी! 🚩

( स्वरचीत)


अवकाशमंडळातील, भूतलावरील राजांना दंडवत 🙏🙏


#रथसप्तमी 🚩

#शिवजयंती 🚩


१९.०२.२०२१

Wednesday, February 17, 2021

काडी घालणे/ पीन मारणे


 भोसकणे/ काडी टाकणे ( किंवा पिन मारणे)


नित्य गणेश पुराण वाचताना काल वामन बटूची कथा वाचली. मुळ कथा सांगायची गरज नाही सगळ्यांना माहितच आहे. मात्र वरील शब्द जे आजच्या कलियुगात सर्रास वापरले जातात त्याचा उगम मला तिथे सापडला.


भगवान विष्णू बटू वामनाचा अवतार घेऊन दुष्ट बलीला  मारायला ( भोसकायला)  आले.

बटूने मागितलेला वर 'तीन' पाऊले जमीन,  अजिबात देऊ नका असे शुक्राचार्यांनी सांगितले. पण राजा तयार झाला नाही. तरीदेखील शेवटचा उपाय म्हणून शुक्राचार्य सुक्ष्म रुप घेऊन उदक सोडायच्या आधी झरीच्या छिद्राशी जाऊन लपले.


बटू वामनाच्या हे लक्षात आले. त्यांनी छिद्रातून 'काडी' घालून ( पिन टाकून) शुक्राचार्यांना भोसकले. त्यांचा एक डोळा फुटला. पुढची कथा तुम्हाला माहितच आहे.


थोडक्यात तात्पर्य : 


जहाल लोक : भोसकून

मवाळ लोक : काडी टोचून ( पिन मारून)

 

कलियुगातील अनेक 'शुक्राचार्यांना' आपापल्या पध्दतीने नामोहरण करतच आहेत. 


*यात "मिडीयारुपी विद्वान वामनांचा" वाटा किती हे सांगायला पाहिजे का?*  ☺️


( मवाळ बटू)  📝

मुंबईची लोकल निघाली


 श्री मोहन लिमये, माधवनगर यांनी सुचवलेल्या ओळीवरुन ,सध्याची मुंबईतील परिस्थिती 

(मुळ गाणे; बिलनची नागिन निघाली,नागोबा डुलाया लागला) 

//  //

मुंबईची लोकल निघाली

"विषाणू'' हसाया लागला 

मुंबईची लोकल निघाली,कोरोना वाढाया लागला


फलाटाच्या गर्दीमध्ये  कोरोना पटकन लपला 

माग माग चाकरमानींच्या अंगावर चटकन चढलाकल

परत पसरायला लागला


मुंबईची लोकल निघाली,

कोरोना वाढाया लागला 🐍


चायनाचा 'धनी' हा कसा लागलाय खेळण्या खेळ र!

मुंबईवरती येऊन ठेपलाय 'लाॅकडाऊन'चा फेर

इतक्यात 'आकडा ' वाढला


मुंबईची लोकल निघाली,

कोरोना वाढाया लागला 🐍


'गावात' खळबळ माजाया लागली

'सरकार'ला भिती वाटाया लागली

दादांचा 'इशारा' आला 😷


मुंबईची लोकल निघाली,

कोरोना वाढाया लागला 🐍


( परत एकदा धास्तावलेला मुंबईकर ) 📝

१७/०२/२१

Sunday, February 14, 2021

गेले ते डेज गेले


 १४ फेब्रुवारी झाली की 'डेज' ची मालिका संपते. अर्थात आमच्यासाठी विडंबन डे ( दे) ३६५ दिवस सुरु असतो हा भाग वेगळा.


 पण काल चक्क एका शाळेतील मैत्रिणीने 

' याला सुचतं कसं बघ ना' असं कौतुक केलं

मग तिचा आदर ठेवायला नको?😬


( मुळ गाणे: गेले ते दिन गेले)


      -/   गेले ते 'डेज' गेले  /-

🌹- 🤝🏻- 🐤- 🍫 - 👩‍❤️‍👨


वेगवेगळी 'टुम' उगवली, रचुनी त्यांचे मेळे !

'मार्केटिंग फंडे' उधळले ! 

गेले ते 'डेज' गेले! 


'वचन दिना'ला दाबून गळा, 'चाॅक -लेट' खाल्ले

परस्परांनी किती ढापले 🍫

गेले ते 'डेज' गेले! 


'मिठीत'घेऊनी, 'टेडी'कडेवरी शीतरसांचे प्याले 🍹

ओळखीच्यांनी  'कसे' पाह़ीले ( 'किस' पाडिले) 😷

गेले ते 'डेज' गेले! 


निर्मलभावे 'नित्य' लिहावे 📝,फोडूनी दोन्ही डोळे!

*तुम्ही म्हणूनी रोज सोसले*!

*गेले ते दिन गेले*!🙏😌


 अमोल केळकर

१५/०२/२०२१

तुषार १४/०२/२१



 

Friday, February 12, 2021

कुहू कुहू कुहू


 https://youtu.be/K8NL15r4M7o


आमच्या मॅम 😎 आता चिव चिवाट ( ट्विट) न करता कू हू कू हू ( Koo अँप) करणार म्हणल्यावर लागलो ना आम्ही पण कामाला 🤷‍♂️


कुहू कुहू कुहू येई साद

उधळीत जगी 'मन' तुषार

समजून अँप घेणे, डाऊनलोड आज झाला


कुहू कुहू कुहू येई साद


मिडीयाचे सर्व रंग हेतु- रंगीत झाले

मंदगीत अतिचंचल सोशली दरवळले

पारा  भरभर हा, तोडी बंध


कुहू कुहू कुहू येई साद



निरोपांचे अंतरंग मद-दंभिक झाले,

सत्ताशिल्प कलिकांच्या आधारावर थरथरले

सारे जीव-चर बघ होई धुंद


कुहू कुहू कुहू येई साद


( हू की चू न करता काव्य जिलब्या पाडणारा) टवाळखोर 😎📝


१३.०२.२०२१

Thursday, February 11, 2021

तुला शिकवीन चांगलाच धडा


 

पुणे- मुंबई  मेगा हायवेवर  बेधडक , नियमांचं उल्लंघन करून गाडी चालवणा-यांना ' मंजुळाने 'दिलेला इशारा. ( *#विडंबनजीवी* कडून भक्ती ताईंना, स्मृतीदिनानिमित्य विनम्र श्रध्दांजली 🙏)


//

थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या *वेगाचा*  भरलाय घडा!

'मोटा गाडीवाला'  समजतो सोताला ड्रायव्हर ,वाईज लक्षात घे स्पीड ब्रेकरर्  .


तुजं क्लचपुरतंच आहे   ग्यान, तुज्या त्वाँडात घालीन शान.

तुजा  ब्रेक,  तुझा लेफ़्ट, तुझा राईट,  मारे पैजंचा घेतोय इडा !


*तुला शिकवीन चांगलाच धडा !  तुज्या वेगाचा  भरलाय घडा!* 


तुजा उतरीन समदा माज, जवा ठोकशील पुढच्याला आज  

डावीकडे एकटाच पडशील सुटं, मी म्हनन, काय आज इकडं कुठं?

हात पसरून मागशील भीक, मी म्हनन जरा हळू चालवायला  शीक.


मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल 'लाईनीत' मुकाट

उगं वळवळ करतोय किडा! 

तुला शिकवीन चांगलाच धडा!


तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,

ओ हो हो , आ हा हा, ओ हो हो , आ हा हा 

हाऊ स्वीट, हाऊ स्वीट,

'स्कोडा' , 'व्हिस्टा' , 'डिझायर'  समदे धरत्यात  मंजूचे पाय. 

नियमांचा  घोळवीत गोंडा, तरन्या गाडयांचा दारात लोंढा 


हाय मंजू, हाय  शिवनेरी ...

हाय मंजू, हाय अश्वमेध ..

मंजुबेन केम छो, हाऊ डू यु डू

कम कम, गो खंडाळा  गार्डन, आय बेग युवर पार्डन?


कुनी आनतील  वडयासंग पाव , कुनी देतील गायछाप पुडी 

कुनी घालतील तिथेही  राडा !

तेव्हा  शिकवीन  त्यांनाही  धडा!


जवा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला. 

धरशील पाय आन लोळ्शील कसा, 'अमृत -अंजन' लावशील फसाफसा  

तुझा ए, तुझा ओ, तुझा न तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन पुढं जाणं 

भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू 'टायरला' कायमचं टाळं


म्हाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन जाऊद्या, गरिबाला सोडा

तू   म्हनशील, मंजुदेवी  आलो मी 'वेगाला' शरन

मी म्हनन शरन आल्यावं देऊ नये मरन.  



तरीपण 


अधीमधी  तुला शिकवीन चांगलाच धडा, जेंव्हा तुज्या वेगाचा  भरतो  घडा!  


//


*आवरा वेगाला _ आठवा फुलराणीला*



( हायवे प्रेमी ) अमोल केळकर 📝

Tuesday, February 9, 2021

फाॅर्वर्ड फक्त करु


 चॅलेंज /उचलेंज 🃏


लहानपणी चॅलेंज हा पत्त्याचा खेळ अनेक जण खेळले असतील. 


माझा एक एक्का, यावर माझे तीन, माझे दोन, माझा आणखी एक


' खोटे बोल पण रेटून बोल ' 😜  चे बाळकडू या खेळात मिळते. सध्या सोशल मिडीयावर असाच 'चॅलेंजचा'  'राजकीय'  खेळ अनेकांकडून खेळला जातोय.  फक्त हा खेळ संपवायचा म्हणजे 'शो' म्हणायचे नाही,  खेळत रहायचे. असा खेळ खेळणाऱ्यांना मी' #फाॅर्वर्डजीवी' म्हणेन.


 हा माझा एक मुद्दा, चल माझे दोन, माझे तीन आणि पुढे चालू.

बर यातील कुणालाही,( काही अपवाद वगळता ☺️) एखादी गोष्ट/शंका विचारली तर उत्तर कुठं देता येत?  ना विषयाचा अभ्यास, ना संपूर्ण माहिती, केवळ केवळ कुठलाही मेसेज ( राजकीय)  भक्तिभावाने पुढे ढकलण्याची गुलामगिरी. 


अशा सर्व बाजूच्या गुलामांना हे गदिमांचे गीत समर्पित:- 📝


राजकारणाच्या मुद्द्या संगे 

 युध्द आमुचे सुरु

'फाॅर्वर्ड' फक्त करु ⏩


देश आमुचा 'फाॅर्वर्डंचा'

काॅपी पेस्टच्या रणनितीचा

'स्क्रीन-शाॅट' ट्विट करु


फाॅर्वर्ड' फक्त करु⏩


फाॅर्वर्ड येता,फाॅर्वर्ड उत्तर

सोडू - न - देऊ , एक तसूभर

क्षणी पुन्हा अवतरु


फाॅर्वर्ड' फक्त करु⏩


हानी होवो कितीही भयंकर

सोशलमिडीया चा हा सागर

'फाॅर्वर्डजीवी ठरू


फाॅर्वर्ड' फक्त करु⏩


( स्वजीवी, स्वच्छंदी)  अमोल


टिप: अराजकीय, विनोद, माहितीपूर्ण  करमणूकप्रधान, टवाळखोरीयुक्त कुठलेही लेखनाचे " #फाॅर्वर्डजीवी" होण्यास लेखकाची ना नाही 😌

⏭️⏭️⏭️⏭️

Thursday, February 4, 2021

खिळे का लावी रस्त्यावरी


 गदिमांची माफी मागून

( मुळ गाणे: बहरला पारिजात दारी)


बहकले आंदोलक दारी

'खिळे' का लावी रस्त्यावरी?


शेतीवरती' ज्यांची प्रिती

'माय-भूमी' जन तिजसी म्हणती

दु:ख हे भरल्या संसारी


खिळे' का लावी रस्त्यावरी?


असेल का नाटक यांचे

आज जगाला फसवायाचे?

कपट का करिती 'नांगर'धारी?


खिळे' का लावी रस्त्यावरी?


का वारा ही जगासारखा

'ट्विटचा'  झाला पाठीराखा?

वाहतो दौलत तिज सारी


खिळे' का लावी रस्त्यावरी?


अमोल केळकर 📝

०५/०२/२०२१

Wednesday, February 3, 2021

दिल - जीत क्याहै


 #कंगना_vs_ दिलजीत 📝

( मनोरंना प्रित्यर्थ *)


" दिल- जीत" ,  क्या है आप मेरी 'ट्विट' देखीये

बस एक बार  'कं - गना' , मान लिजीये


इस ट्विट  को 'रि-ट्विट' करना है बार बार

'रि-हान' ए दर्द को गौर से, पहचान लीजिये


माना के दोस्तों को नही, 'कंगना' का अंदाज

लेकीन ये क्या के गैर (का) निर्माण कीजीये


कहिये तो बाॅलिवूड को ट्विटर पर उतार लाएं

मुश्किल नही है कुछ भी अगर 'लिख' लीजीये.


मुळ चीज :-

दिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये 

बस एक बार मेरा कहा, मान लीजिये 


इस अंजुमन में आपको आना है बार बार 

दीवार-ओ-दर को गौर से पहचान लीजिये 


माना के दोस्तों को नहीं दोस्ती का नाज़

 लेकिन ये क्या के गैर का अहसान लीजिये 


कहिये तो आसमान को ज़मीन पर उतार लाएं

 मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिये


अमोल केळकर 📝

Monday, February 1, 2021

तुम जियो हजारो साल.


 "तुम जियो हजारो साल , साल के..."


मंडळी नमस्कार ,


साधारण १९६० सालात , 'सुजाता' सिनेमातील  आशा ताईंनी गायलेले हे गाणे आज ध्रुव ता-याप्रमाणे अढळ स्थानी आहे.  जगात  दररोज हजारो 'जन'  जन्मास येतात. त्यांच्या प्रारब्ध/ कर्म / मेहनत / नशीबाने  ते  इतरांच्या दृष्टीने लोकप्रिय ज्याला आपण 'प्रसिद्ध' म्हणू असे बनतात . ही  प्रसिद्ध लोकं  जशी काही विशिष्ठ योगावर जन्मतात  ( काही  खास योग असतीलच ना त्यांच्या पत्रिकेत ) त्याप्रमाणे काही कलाकृती मग तो लेख असेल / गाणे असेल एका विशेष योगावर जन्म घेऊन येतात असं नेहमी मला वाटतं . त्यातलंच हे गाणं . 


ज्याचा वाढदिवस आहे त्याला/ तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हे गाणे अनेकांकडून वापरलं जाते. प्रॅक्टिकली कुणी हजारो वर्ष जगणार नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे पण आज मी हे  सांगू शकतो की  हे गाणे मात्र पुढील हजारो वर्षे  वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना  म्हणले जाईल. 


" *दुस-याचे चांगले चिंताल , तर आपल्याला ही तसेच मिळते "  याचे उत्तम उदाहरण म्हणजे  हे गाणे नाही का* ?


मंडळी,आजच्या स्तंभ लेखनाचा  विषय तुमच्या लक्षात आलाच असेल तो म्हणजे "वाढदिवस".  नवीन वर्षाची दिनर्शिका आली की या वर्षी आपला वाढदिवस केव्हा ? म्हणजे कुठल्या वारी आहे, त्यादिवसी  सुट्टी आलीय का , शनिवार/ रविवार आलाय का   हे पाहण्याची उत्सुकता मला तरी असते.  वाढदिवसाचे सेलिब्रेशन  हा  मन खूश करणारा प्रकार. 

"अजून एक वर्षाने म्हातारे झालो , यात काय सेलिब्रेशन करायचे?" असे म्हणणारे  मला अरसिक किंवा  भूतलावरचे  फार 'मोठे योगी' वाटतात.  शाळेत असताना वाढदिवसाला  वर्गात मित्र / मैत्रीणींना गोळी/ चॉकलेट देणे,  ते पुढे कॉलेज मध्ये काही खास मित्र- मैत्रिणींसमवेत केलेल्या पार्ट्या  कोणी विसरू शकेल का ?  लहान पणापासून आई -बाबा ,नातेवाईक,  पाहुणे आणि मोठे झाल्यावर  बायको , मुले  ( यात मित्र/ मैत्रिणी ???? )  यांच्या कडून वाढदिवसाला  मिळालेले ' गिफ़्ट ' उघडून केव्हा एकदा बघतोय ही उत्सुकता आज ही असतेच. आज सोशल मीडियावरची अनेक संकेतस्थळे सभासदत्व देताना तुमच्या वाढदिवसाच्या तारखेची नोंद करून त्यादिवशी  इतरांना  तुमचा वाढदिवस आहे  हे सांगतात. मग सगळीकडे शुभेच्छांचा( महा) पूर येतो . पण शाळेत असताना आणि कुणालाच माहीत नसताना गोळ्या चॉकलेट वाढदिवसाला देऊन आज माझा वाढदिवस आहे हे  सांगण्याची निरागसता  वेगळीच होती नाही  ????  आज  मोठे झाल्यावर  ती  निरागसता  दाखवतो का  आपण ??? 


तर मंडळी, " हम् आपको एक  बात कहना तो भूल ही गये " ( आठवा ती  पान - पराग  ची जहिरात ,  नही नही  हमे कुछ नही चाहीए )   तर आज मंगळवार , आमचा स्तंभ लेखनाचा दिवस ,तारीख २ फेब्रुवारी . तर आजच्याच दिवशी वयाची ४५ पार करून ४६ वर्षात पदार्पण करताना  आणि  म्हणूनच अनायसे  ३७ वा स्तंभ लेख म्हणून 

 " वाढदिवसावर  टवाळखोरी " करण्याची संधी घेताना मला खरोखरच आनंद होत आहे.  ३६५ दिवसापैकी मला आवडणारा  एक प्रमुख दिवस. प्रत्येक वाढदिवस ( कळण्याच्या वयापासून )   वेगवेगळ्या आठवणी  देऊन गेले . त्या सगळ्या आठवणी  इथे लिहून टवाळखोरीची व्याप्ती वाढवावी अशी अजिबात इच्छा  नाही.


 आपल्या वाढदिवसादिवशी  आणखी कुणा अर्थात प्रसिद्ध  व्यक्तिमत्वाचे  वाढदिवस असले तर  आणखी छान वाटते.  मी मध्यतंरी एकदा तसा प्रयत्न केलेला, २  फेब्रुवारीला कुणा कुणाचे वाढदिवस असतात  हे ' गुगल'ण्याचा . पण तशी अपरिचितच नावे अधिक  होती. 


 माझ्या मते  नियतीचीच ही योजना असेल की अजून काही वर्षानी  जेव्हा  एखादी  २ फेब्रुवारीला जन्मलेली व्यक्ती , आपल्या वाढदिवसादिवशी अजून कुणाचा वाढदिवस असतो  हे शोधेल तेव्हा त्यांना .. . . . . . . . . 


नाही हो तसे काही नाही  फक्त ह्या पोस्टची ब्लॉग लिंक '  सापडावी ही नियतीची  योजना. बाकी तसे काहीच म्हणणे नाही बरं!


तेव्हा या स्तंभ लेखनाचा शेवट ,स्तंभ  लेखकाकडून , स्वतःतील लेखकाला   या शुभेच्छा देऊन 


बार बार ये दिन आये, बार बार  ये दिल गाये

तुम ' लिखो ' 📝 हजारो साल,  ये ही  है आरजू 


" हॅपी टवाळखोरी टू ( ऑल ऑफ ) यू  "


" *कोण म्हणतंय रे ' ही तर हद्द झाली टवाळखोरीची*  '" 


(अजूनही तितकाच निरागस,बर्थ डे बॉय  )  अमोल केळकर

२ फेब्रुवारी २०२१


#मंगळवारची_टवाळखोरी ( shopizen.in)

Related Posts Plugin for WordPress, Blogger...