नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, November 27, 2017

केंव्हा तरी पहाटे


'केंव्हा तरी पहाटे' - अमोल केळकर 📝
(परिक्षेच्या दिवशी लवकर उठून अभ्यास करायला कधीच जमले नाही)

केव्हा तरी पहाटे
उठवून  माय गेली
मिटले तरी मी डोळे
हलवून   माय गेली 

कळले मला न  तेव्हा
वाटली न भीती जराशी
कळले मला मग जेव्हा
निसटून वर्षे गेली... 

पाहू  तरी  कसे मी
सोपे उत्तर प्रश्णांचे
घेऊन गाईड माझे
फसवून शांती गेली

ऐकतो  कानात  आता
आवाज थपडेचे
डस्टर मास्तरांनी
फेकून बात केली .. 

समरल्या मलाच तेव्हा
माझ्या टुकार पंक्ती
मग शाल अंगावरची
उडवून माय गेली.

-------------------------------------
*मूळ गाणे* : - 
केव्हातरी पहाटे
उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे
हरवून रात गेली

कळले मला न केव्हा
सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा
निसटून रात गेली

सांगू तरी कसे मी
वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा
फसवून रात गेली

उरले उरात काही
आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे
उचलून रात गेली

स्मरल्या मला न तेव्हा
माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची
सुचवून रात गेली

Wednesday, November 1, 2017

एका लग्नाची गोष्ट ( गाणे )


एका लग्नाची गोष्ट  ( गाणे ) 🌱🌿🎋
( चाल : बाहुलीचं लगीन झोकात लागलं , नवरोबांन भाडणं काढलं  )

तुळशीचं लगीन झोकात लागलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं  
तुळशीबाई नटून अंगणात थाबंली
सेक्रेटरी येताच बोलणं हे  वाढलं

तिला नाही स्पेस  म्हणे पुढे येऊन सासरा
आम्ही तुमच्या तुळशीला देऊ कसा आसरा
दोनशे रुपये मेन्टेन्सचा  देऊ का हो  दाखला
असं म्हणून मंडपात सगळ्यांना तो चावला 

तुळशीचं लगीन झोकात लागलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं  

फराळाचे पदार्थ त्याच्या तोंडामध्ये कोंबले
कच-याचे मुद्दे  त्याला का हो झोंबले
तरा तरा तो-या मध्ये अध्यक्ष ही  धावला
कानामध्ये सेक्रेटरीच्या काहींतरी बोलला  

तुळशीचं लगीन झोकात लागलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं  

थोडासा फसवा , सेक्रेटरीचा रुसवा
मंडळी हसू लागली
बाळ कृष्ण आणून , अक्षता घेऊन
लग्न लावू लागली
पोरं आली, माळ लावली
सोसायटी आनंदली 

तुळशीचं लगीन झोकात लागलं
व-हाड सुखावलं
📝विसंगती सदा मिळो , टुकार विडंबन कानी पडो
२/११/१७


Related Posts Plugin for WordPress, Blogger...