नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, May 30, 2012

लाज


विजया पतका केकेची
उत्सव घडवला ममतेने
वचन पुर्ती  करण्यासाठी
कपडे उतरवले पूनमने

स्वखुशीचा आहे मामला

'गंभीर'पणे नका घेऊ  !
तिने जरी सोडली तरी
आपण आपली लाज ठेऊ ! 



Thursday, May 17, 2012

नशा ..




स्वता:च्या गल्लीत कुत्र्यालाही !
आपणच  ' किंग'  असे वाटते !
हेच  दुसरीकडे गेले की !
शेपूट घालून चुपचाप बसते  !!

पैशाची मस्ती, विजयाची धून !

मी सांगेन ती पूर्व दिशा !
फसशील असा एक दिवस मग !
काढत बसशील उठाबशा  !!!


 

Wednesday, May 9, 2012

असत्य मेव जयते




राखीच्या ना- इन्साफीचे

नाटक लागलय कळू
अमिरच्या टिआरपीने
'दिल' लागलेय जळू

सत्तेचा मेवा खाणार्‍यांनी

सगळं साफ केलं आहे
सत्यमेव जयते आता
घोषवाक्य राहिलं आहे !

अमोल केळकर

१०/०५/२०१२





Monday, May 7, 2012

चार - ओळी


चार ओळी आजकाल
सतत लागल्यात जमायला
त्यांनाही लागलीय ओढ
सहज मला भेटायला

अनुदिनी




साध्या सरळ दिवसाचाही
कधीतरी अनुभव घ्यावा
एखादा दिवस अनुदिनीतला
तसाच मोकळा रहावा

' काक स्पर्श '



दहाव्याला तो तूझा स्पर्शच !
कायमची  देतो मुक्ती !
हे घडवून आणण्यासाठीही  !
माणसे वापरातात अनेक युक्ती !!




माझी ग्राफीटी



Saturday, May 5, 2012

सुपर मून


Friday, May 4, 2012

' क्लिन चीट '



Thursday, May 3, 2012

कवितेचे अंतरंग


  कवितेच्या अंतरंगातून
  एक विंनंती  कळाली
  सोडव शब्दांच्या  बेड्यातून
  घेऊ दे श्वास म्हणाली
 
 अमोल केळकर
 ०४/०५/२०१२

Wednesday, May 2, 2012

टोलवा - टोलवी



परदेशवारीवरून टोलवाटोलवी
छान  यांना जमते
नाक्या नाक्यावर टोल मात्र
आम जनताच भरते.

अमोल केळकर

०३/०५/२०१२

करामत



Tuesday, May 1, 2012

सोने आणि चांदी


चार ओळी


काल अचानक चार ओळी
रस्त्यामधे सापडल्या
कवीकडे सोडतो म्हणताच
इकडे तिकडे पळू लागल्या
Related Posts Plugin for WordPress, Blogger...