नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, October 30, 2023

ही घडी अशीच राहू दे


 नोकरीच्या ठिकाणी सरासरी तुम्ही कितीही काम करत असला तरी,एखाद्या दिवशी



अर्धा दिवस लवकर निघून, वानखेडेवर क्रकेट सामना बघायला जाणे


डाँट आँफीस सुटण्याच्या वेळेवर निघून एखाद्या दिवशी बायकोबरोबर 'आई कुठे काय करते' मालिका बघणे


'आज जरा तब्येत ठिक नाही, येईन असं वाटत नाही'  असा मेसेज सायबाला पाठवून गावाहून आलेल्या मित्रासंग मुंबई दर्शन करणे.


रात्रीचे उशीरा संपलेले नाटक/ मैफिलीच्या धुंदीत दुस-यादिवशी जरा १-२ तास उशीरा जाणे.


पावसाळ्यात अमुक ठिकाणी पाणी साठलंय/ लोकल बंद झालीय/ वेधशाळेचा इशारा,यावर सिझनला एकदा तरी 'बेनिफिट आँफ डाऊट' घेऊन संपुर्ण आँफीस लवकर सोडायला लावणे.


खंडेनवमीला दुपार नंतर काम-बंद आंदोलन उत्स्फूर्त करणे.


एखाद्या सहका-याचा संध्याकाळी असणाऱ्या  निरोप समारंभ कार्यक्रमाच्या तयारीसाठी  दिवसभर बाहेर राहून, आपली ही काही कामे करुन घेणे.


दोन सुट्यां मधे आलेल्या भाकड दिवशी मात्र अगदी वेळेवर उपस्थित राहून आपण किती महान हे मॅनेजमेंटला दाखवणे.


मात्र आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी बारा वाजले तरी चालेल टार्गेट पूर्ण करूनच जाणार ( भले यासाठी टवाळखोरी सकाळी उरकावी लागली तरी चालेल)  याची तयारी ठेवणे.


याला #जीवन_ऐसे_नाव

दोन घडीचा डाव


देवा, नारायणा ! 

' कार्यालयात ही घडी अशीच राहू दे  

 सत्तर तासावरी , उसंत लाभू दे ' 


( अमोल)

#नारायण_नारायण

#माझी_टवाळखोरी 📝

३१/१०/२३

Saturday, October 28, 2023

कोजागरी


 


Saturday, October 14, 2023

हार्दिक पंड्या आणि मी


 

काल हार्दिक पंड्याने विकेट घ्यायच्या आधी काय मंत्र म्हणला, नमस्कार केला (  काळी जादू केली असंही कुणी म्हणतय)  ,नक्की काय केलं हे त्यालाच माहीत पण तो चेंडू टाकण्याआधी तीव्र इच्छाशक्ती त्याच्या एकंदर कृतीतून एकवटलेली आणि त्यानंतरचं  फळ सा-यांनी पाहिले.


हे काल पाहिल्यावर मला लहानपणी आम्ही ५-३-२ किंवा ७-८ पत्यांचा डाव आठवला. पुढचा डाव सुरु करण्या आधी मागच्या डावाचे  'हात' कुणी कुणाचे १-२ ओढले असतील ( आम्ही हे असंच म्हणायचो)  तर ते सेटल व्हायचे. ब-याच दा आमचेच ओढले जायचे, क्वचित आम्हाला ओढायचा चान्स मिळायचा. अशावेळी आम्ही मनाला येईल तो पत्ता मागायचो जसे वरुन तिसरा, खालून चौथा, मधला. अशावेळी जे कार्ड यायचे तो त्याच्याकडचा चोथा असायचा आणि आम्हाला फारसं हाती काही लागायचं नाही.


याउलट आमचा एक मित्र असं काही कार्ड ओढायचा की एक्का, राजा, किंवा हुकुमाचा पत्ता काहीतरी महत्वाचं कार्डच यायचं.


आत्ता आठवतंय तो ही हार्दिक सारखं काहीतरी करायचा, सारखी आपल्या हातातली पाने बघायचा, आकडेमोड करायचा आणि समोरच्याचा खेळ खल्लास.

मी ब-याच दा त्याला विचारायचो अरे आम्हाला पण सांग काय करतोस? 

एकदा त्याने तो मंत्र सांगितला.आम्हीही दुस-याचा पत्ता खेचण्याआधी फूल इच्छा व्यक्त करुन, आकडेमोड वगैरे करून पाने मागायला लागलो

 अर्थात त्याने सांगूनही त्याच्यारखी पाने खेचायला आम्हाला जमली नाहीत.


खूप वर्षाच्या गॅपनंतर अचानक परवा तो मित्र भेटला. मला म्हणाला, अरे लहानपणी खेचायची ट्रिक सांगितलेली जमलीय की तुला, गुरूदक्षिणा केंव्हा देतोयस? मला काही कळेना. म्हणलं अरे ५-३-२ वगैरे मी केंव्हाच सोडलंय.


तो म्हणाला ते नाही रे, आजकाल तुझी टवाळखोरी वाचतो

 चांगलचं खेचायला शिकलायस की

अजूनी मी दिलेला मंत्र काम करतोय म्हण की 


अशारितीने आम्हाला जे काही यश मिळालंय त्याचे बीज लहानपणीच्या पत्यांच्या खेळातील इच्छाशक्ती चे आहे हे आत्ता कळाले.


या देवी सर्वभूतेषु, इच्छा रुपेण संस्थिता !


आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवोत, या सदिच्छा 🙏💐


#माझी_टवाळखोरी 📝

१५/१०/२३

poetrymazi.blogspot.com

Related Posts Plugin for WordPress, Blogger...