नोकरीच्या ठिकाणी सरासरी तुम्ही कितीही काम करत असला तरी,एखाद्या दिवशी
अर्धा दिवस लवकर निघून, वानखेडेवर क्रकेट सामना बघायला जाणे
डाँट आँफीस सुटण्याच्या वेळेवर निघून एखाद्या दिवशी बायकोबरोबर 'आई कुठे काय करते' मालिका बघणे
'आज जरा तब्येत ठिक नाही, येईन असं वाटत नाही' असा मेसेज सायबाला पाठवून गावाहून आलेल्या मित्रासंग मुंबई दर्शन करणे.
रात्रीचे उशीरा संपलेले नाटक/ मैफिलीच्या धुंदीत दुस-यादिवशी जरा १-२ तास उशीरा जाणे.
पावसाळ्यात अमुक ठिकाणी पाणी साठलंय/ लोकल बंद झालीय/ वेधशाळेचा इशारा,यावर सिझनला एकदा तरी 'बेनिफिट आँफ डाऊट' घेऊन संपुर्ण आँफीस लवकर सोडायला लावणे.
खंडेनवमीला दुपार नंतर काम-बंद आंदोलन उत्स्फूर्त करणे.
एखाद्या सहका-याचा संध्याकाळी असणाऱ्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या तयारीसाठी दिवसभर बाहेर राहून, आपली ही काही कामे करुन घेणे.
दोन सुट्यां मधे आलेल्या भाकड दिवशी मात्र अगदी वेळेवर उपस्थित राहून आपण किती महान हे मॅनेजमेंटला दाखवणे.
मात्र आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी बारा वाजले तरी चालेल टार्गेट पूर्ण करूनच जाणार ( भले यासाठी टवाळखोरी सकाळी उरकावी लागली तरी चालेल) याची तयारी ठेवणे.
याला #जीवन_ऐसे_नाव
दोन घडीचा डाव
देवा, नारायणा !
' कार्यालयात ही घडी अशीच राहू दे
सत्तर तासावरी , उसंत लाभू दे '
( अमोल)
#नारायण_नारायण
#माझी_टवाळखोरी 📝
३१/१०/२३
No comments:
Post a Comment