नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, December 28, 2018

शाळेतल्या मित्रांनी


३१ डिसेंबर निमित्य  ' विडंबनाची एक तरी  जिलबी पाडायचीच ' ही परंपरा यावर्षी ही मोडू  ईच्छीत नसल्याने  हे लिहावे लागले 😌

मूळ गाणे :
रेशमाच्या रेघांनी , लाल काळ्या धाग्यानी
कर्नाटकी  कशिदा मी काढीला, हात नगा लावू  माझ्या साडीला

मूळ  गाणे वरती ऐकू शकता 👆🏻
-------------------------------------------
शाळेतल्या मित्रांनी , चर्चा सर्व  करुनी
पारटीचा हुकूम जरी काढीला ,
बर्फ नको त्रास मला घशाला

नवी कोरी व्हिस्की लाख मोलाची
वाट पाहती मित्र मी येण्याची , मी येण्याची
म्हणती सारे थोर, वन्स मोर कवीला
बर्फ  नको त्रास मला घशाला

जात होतो वाटेनं मी पुण्यात , मी पुण्यात
अवचित आला पोलीस  पुढ्यात  जी पुढ्यात
त्याने माझ्या लेखणीला धरूनिया ओढीला
बर्फ  नको त्रास मला घशाला

भीड नाही आम्हा आमच्या कर्माची
मागितली माफी मी त्या हरीची
नका नावे ठेवू  आमच्या या खोडीला
बर्फ  नको त्रास मला घशाला

शाळेतल्या मित्रांनी , चर्चा सर्व  करुनी
पारटीचा हुकूम जरी काढीला ,
बर्फ नको त्रास मला घशाला

📝विसंगती सदा मिळो , टुकार विडंबन कानी पडो

Wednesday, December 26, 2018

पट पट पट पट मित्र गळती


सध्या अनेक ग्रुपची अवस्था पाहून  आम्हाला  हे बालगीत आठवले .  वय वर्ष ४० च्या  आसपासच्या  सर्व ग्रुपमधील बालगोपाळांना समर्पित

महत्वाची सूचना : - *मनोरंजन हाच हेतू , असा ग्रुप  कुठेही सापडणे शक्य नाही* (  ~म्हणूनच सापडला तर योगायोग समजावा या वाक्याला अर्थ नाही~)

(  चाल : टप टप टप टप थेंब वाजती , गाणे गातो वारा )
 -----------------------------------------
पट पट पट पट  मित्र गळती , स्तब्ध ग्रुप सारा
विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा 
लोच्या झाला हो लोच्या झाला.

नमो रागावर ना-ताळ्यावर झाली धुसफूस वाणी
कुरकुरती मागे बोलून  सगळी इथली शहाणी
अवती भवती मिटून  नाती, द्वेष भरला सारा

विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला पारा 
लोच्या झाला हो लोच्या झाला.

मुद्देसूद तत्वांना झाली कोसळण्याची घाई
तिखट एवढे बोल वाचुनी ग्रुप सोडतात ताई
आनंदे लिहीतच जाई  टुकार विसरून मारा

विसरा आता पर्व अनोखे , उगाच वाढला  पारा 
लोच्या झाला हो लोच्या झाला.

 📝२७/१२/१८
विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो . . ..
poetrymazi.blogspot.in

मुळ गाणे:-

 टप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा
विसरा आता पाटी-पुस्तक, मजेत झेला धारा
पाऊस आला, रे पाऊस आला

घरा-घरावर, कौलारावर, आले झिमझिम पाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवी-हिरवी गाणी
अवती-भवती भिजून माती, सुगंध भरला सारा

काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
आनंदे हंबरती गाई समोर विसरून चारा

Tuesday, December 25, 2018

आणि सावज सापडलं ( सत्य घटना)


📝आणि सावज सापडलं
( एक सत्य घटना)

रात्री चंद्रोदय झाला,  आरती झाली आणि उंदीर मामा बाप्पाला म्हणाले
बाप्पा,बाप्पा मी केक खाऊ?

येडा झाला काय रे उंदरा तू, बाप्पा म्हणाले

खाऊ दे नं
मी तुझ्या सगळ्या संकष्ट्या केल्या , ही पण केली
आणि चंद्रोदय पण झालाय.
बाप्पा बाप्पा प्लीज आज मोदक तूच खा.
 मला केक खाऊदे नवं

उंदराचा बालहट्ट पाहून बाप्पाला गहिवरून आलं. त्याची पण काय चूक म्हणा.  दिवसभर व्हाटसप वर पडून 'साबुदाण्याचा केक', 'केकचा मोदक ' असे चमचमीत पदार्थ पाहून त्याला मोह झाला तर नवल ते काय?
 पण अगदी रात्री ८:५० पर्यत पठ्ठ्याने हू का चू  केले नाही म्हणून कौतुक ही वाटले.
फक्त रात्रीच्या आरतीच्या वेळेला पुण्यातील थंडी सहन न झाल्याने ती 'लाल टोपी ' का काय घालून मामा आले. किती गोड दिसतंय ना उंदरु माझं असं वाटून बाप्पाला ही मग आरती झाल्यावर त्याच्याबरोबर ती 'सेल्फी ' का काय म्हणत्यात ते घ्यायचा मोह आवरला नाही.

इकडे उंदीर मामांचा बाप्पाकडे तगादा चालूच होता
बाप्पा मला केक खायचाय,  खाऊ दे नवं.
तिकडं माॅडर्न बेकरीत ठेवलेत
जाऊ दे नवं

तरी पण बाप्पा म्हणाले अरे आपल्या धर्माचा तरी विचार करशील की नाही.
उंदीर मामाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणला अगदी वाढदिवस घ्या, साखरपुडा घ्या, लग्न घ्या, रिसेप्शन घ्या, फार तर अगदी शाळेचे गेट टु गेदर घ्या, सगळीकडे केक कापण्यासाठी सगळेचजण केकावतात. आता मात्र उंदीरमामा हिरमुसले.
बाप्पांनाही त्याची दया आली म्हणले जा पण एक लक्षात ठेव रात्री १२ च्या आत ये.

इकडे पंचरत्न सोसायटीत तळमजल्यावर राहणाऱ्या एका गणेश भक्ताने आज संपूर्ण दिवस अगदी कडक उपवास केला होता. रात्र चंद्रोदय झाल्यावर आवर्तन करुन यथासांग आरती,  उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करुन ,घरात धुमाकूळ घालणाऱ्या उंदराचा बंदोबस्त करण्याची विनंती बाप्पांना केली आणि रात्री पिंजऱ्यात नेहमीच्या 'भजीच्या' ऐवज ' केक ' ठेवला.

भूर भूर भूर
दूर दूर दूर म्हणत

माॅडर्न बेकरीच्या केकवर ताव मारून मामा घरी परत आले. घरातल्या ब्लॅक फाॅरेस्ट केकच्या वासाने परत त्यांची भूक चाळवली. आणि मग  हावरटपणाने एक सावज अलगद पिंजऱ्यात सापडले.


ची ची ची चू चू चू आवाजाने जाग आलेल्या गणेशभक्ताने गणपती अंगारकीला पावला म्हणून आनंद व्यक्त केला. वाॅचमनला हाक मारून पिंजरा ताब्यात दिला.

 गणेशभक्त चिरंजीव चिंटू ने मात्र मी सांता अजोबांकडे घरातील 'माऊस कॅच ' व्हावा म्हणून
' विश '  केले होते ते पूर्ण झाले म्हणत 'हँपी' वाटून घेतले.

इति " नाताळ अंगारकिची" कहाणी टुकार  लेखी सफळ संपूर्ण

शिकवणूक:-
 १ . उंदिरमामा प्रमाणे हावरटपणाने फेसबुकवर लाईक मिळाले म्हणून लगेच व्हाटसप वर पोस्ट करु नये. तो एक सापळा असतो.
२. सदर कहाणी २-४ ग्रुपमधे पाठवल्यास ग्रुपमधे आपोआप पेस्ट कंट्रोल होऊन पुढच्या संकष्टी पर्यत एखादी खुशखबर मिळण्याची शक्यता

मोरया🙏🏻 नाताळ बाबा की जय 🌺

📝२६/१२/१८
poetrymazi.blogspot.in

Sunday, December 23, 2018

अंगारकी नाताळ


# "अंकारकी नाताळ "

चुकून लावाल बाप्पांनपुढे
एक मोठी मेणबत्ती
अन नाताळ बाबांना ओवाळाल
तूप निरांजनाची आरती

नक्की भिजवा साबुदाणा
आणा केकसाठी अंडी
बरोबर ओळखलंत मुंबईत
कमी झालीय थंडी

उकडीचा केक का चाँकलेटचा मोदक
प्रश्ण नको पडायला
काळजी घ्या रे भक्तांनो
उलट सुलट न घडायला

📝२४/१२/१८

Saturday, December 22, 2018

आमचा एक्झिट पोल


तुषार २३/१२/१८

Friday, December 21, 2018

कोटीच्या कोटी उड्डाणे




 भारत  वंशात  सर्वसाधारपणे ३३ कोटी देव आहेत असा समज आहे. यातील एखाद्या दिवशी  दिनविशेषा प्रमाणे  काही देव एकदम प्रकाशझोतात  येतात.

उदा. दत्त जयंती , श्री गुरुदेव दत्ताचा दिवस .

सारसबागेतील गणपती चर्चेत येतो जेव्हा पुण्यात थंडी पडली की त्याला स्वेटर घातला जातो.

भारत वंशात निवडणूक आली की  - प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांचे मंदिर इ इ इ

 बाकी इतर बारा महिने पोर्णीमा ,  प्रकट दिन, जत्रा , उत्सव   हे त्या त्या संदर्भातले देव / देवता आठवण्याचे कारण पुरेसे ठरते.

केल्या काही महिन्यापासून मात्र अचानक पणे  ' *महाबली हनुमानाचे'* नाव ब-याच  राजकीय नेत्यांच्या मुखी येऊ लागले आहे.

 इतके दिवस केवळ तीन राशींची जनता ज्यांना साडेसाती आहे,ते दर शनिवारी  साडेसातीवर उपाय म्हणून हमखास मारुतीच्या देवळात दिसायची. पण आता  राजकीय नेते , योगी, मुनी - मौलवी ही हनुमानाच्या मागे लागलेत असे वाटते .प्रत्येक जण हा आपल्या धर्माचा , आपल्या जातीचा , आपल्या प्रांताचा आहे असे सांगू लागले आहे. त्यासाठी उदाहरणेही देऊ लागले  आहेत.

 कुणी म्हणतो आमच्याकडे रहेमान, सुलेमान  हा  हनुमान  म्हणून तो आमचा.

कुणी म्हणतो मारुती स्तोत्रात सुरवातीलाच
'भीम ' रुपी  म्हणले आहे तो आमचा.

जितेंद्रियं बुध्दीमतां वरिष्ठं- आमचाच तो , एका धर्माचे म्हणणे.

 कोण सांगतो तो ' वनारी' अंजनी सुता आहे - म्हणून आमचा .

आता  याचप्रमाणे  अजून काही गोष्टी बाहेर येतात का हे बघायचे  जसे '
पुण्यवंता - केवळ पुण्याचा ,

'ब्रम्हांडे माउली नेणो' - ठाण्यातील ब्रह्मांड़ मधील

'धूर्त वैष्णव' - वैष्णवांचा  इ इ

अर्थात  सर्वाना तो आपला वाटत असेल तर चागंलेच आहे. राजकीय गोष्टींना बाजूला ठेऊन सर्वधर्म - जात - समभाव असलेले हे उदाहरण भारत खंडासाठी नक्कीच  आशादायी ठरो.

पुढे जाऊन तर असं म्हणावेसे वाटते की  या सीमा भारत भूमी पुरत्या संकुचित न ठेवता  हनुमानाचे सर्व- धर्म - सम - भाव  तत्व ' कोटीच्या कोटी उड्डाण करून  झेपावे उत्तरे कडे '  आणि भारत देशाची  ' *कीर्ती* '   *चीन* , भूतान, म्यानमार ' पदक्रांत करुन  *वाढता वाढता वाढून अखिल  मंडलाला  भेदून जावी* 🙏🏻🌷

श्री गुरुदेव दत्त
श्रीराम दूतं शरणं प्रपद्दे

📝poetrymazi.blogspot.in

Thursday, December 20, 2018

अंजनीच्या सुता तुला नेत्याचे वरदान


उद्या शनिवार,  'बजरंग बली' उर्फ 'मारुती कांबळे' उर्फ 'मनोज जैन' उर्फ 'वाब्दुल हनुमान' यांचे स्तुती गीत सर्व योगी- मुनी- महंत- मौलवी यांच्या कृपा आशीर्वादाने  'दादांच्या ' शब्दात 📝

अंजनीच्या सुता तुला नेत्याचे वरदान
जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

दिव्य त्यांची पक्ष भक्ती,  दिव्य त्यांची माया
इलेक्शन ला गेले सारे मत मागावया
आठवली मग देणी, पोकळ आश्वासन
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

कमळीला 🌷आली मूर्च्छा लागुनिया बाण🏹
राममंदिरासाठी मग उठविले रान
तळहाताने 🤚🏻 घेतला तिनेक राज्यात प्राण

अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

निवडणूक विजयाची मनामधे शंका
तिथे तुझ्यानामाचा रे पेटवीला डंका
स्वयं आले सेवक, देती आता दूषण

अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

आले किती गेले किती संपले भरारा
धर्म- जाती - पंथांचा परि अजूनी दरारा
सावध कर लवकरी, संपव सैतान

अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त बरळतात  असे  का रे देवा?
घे बोलावूनी आता, कंठाशी आले प्राण

अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान

📝२१/१२/१८
poetrymazi.blogspot.in

Saturday, December 15, 2018

शांती भेटली


तुषार पुरवणी १६/१२/१८

Wednesday, December 12, 2018

इति-हासिक निर्णय


उर्जितावस्था येण्यासाठी
इति-हासिक आदेश .
तलवार, भाले सरसावून
आरबीआयचा नवा आवेश

इतिहास विषय म्हणून
घेऊनका हसण्यावरी
मोहोर प्रत्येक नोटांवर
आता यांचीच असणार खरी


📝१३/१२/१८
#इतिहासतज्ञ गवर्नहर

Tuesday, December 11, 2018

निकालांचा खेळ रंगेल, राज्यांमधे भारी


( मुळ गाणे :- देवाजीचं नाव घ्याव सकाळच्या पारी,पांडुरंग हरी, वासुदेव हरी
🌺)
सर्व संबंधीतांची क्षमा मागून 🙏🏻
-------------------------------
रामाच्या ग मुद्दया मंदी
जीव भरतो नेता
भुलभुलैय्या जातींचा गल्लोगल्ली

निकालांचा खेळ रंगे, राज्यांमधे भारी
शिवराज हारी(?), वसुंधरा हारी

एक रात्र आली जाग योगी महा मुनींना
हंबरुन बोलावले जनता जनार्दनाला
पक्ष बदलू नेत्यांनाच उमेदवारी जारी

निकालांचा खेळ रंगे, राज्यांमधे भारी

फुलला भक्तीचा पारिजात
थांबली मतांची ती बरसात
मारुती गणला दलितात
' दिन अच्छे' दिसेना माझ्या दारी


शिवराज हारी(?), वसुंधरा हारी

निकालांचा खेळ रंगे, राज्यांमधे भारी

📝१२/१२/१८
poetrymazi.blogspot.in

https://youtu.be/eRO_wi3DlaQ

Thursday, December 6, 2018

मुद्दल, व्याज


मुद्दल देतो , व्याज विसरा
फार तर घ्या एक दिन - दर्शीका

येडा बनून पेढा खायला
किंग फिशर कडून जरा शिका..

📝७/१२/१८
poetrymazi.blogspot.in

Wednesday, December 5, 2018

धक धक होने लगा- लोकसभा निवडणूक २०१९


लोकसभा २०१९ - धकधक होने लगा

काल जेंव्हा ती बातमी ऐकली तेंव्हा पासून मी माझ्या गुरु-गणेश नगरला राहणाऱ्या मित्राच्या मागे लागलोय. काही तरी कर पण माझे नाव पुणे मतदार संघात येऊ दे. अगदी कोथरूड,  सिंहगड रोड फार फार तर बिबेवाडी मधून पण चालेल. हे ऐकायचं आहे एकदा प्रचारासाठी घरी आलेल्या नेने बाईंकडून 👇🏻

मी  माधुरी दिक्षीत - नेने, पुणे मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. मलाच विजयी कराल ना?

डाॅ नेनेंनी ना तुमच्यासाठी खास फाँर्म्यूला बनवलाय तुमच्या विकासासाठी. डाॅ दिक्षीत, दिवेकरांपेक्षा वेगळा आहे. माझ्या विजयी रॅलीत त्याची झलक मी दाखवेनच

आता या नेने बाईं उमेदवार म्हणल्यावर प्रचाराला मराठी कलाकार पाहिजेतच ना. ते ही सोबत घरी येणार.
आलेल्या कलाकारांच्या  प्रचाराची  अदा काहीशी अशी '-

सुमित : हिचा पहिला मराठी सिनेमा माझ्याचबरोबर . काय बरं नाव? आठवत नाही आहे. पण तिला जे हृदय बसवलं ते पुण्याचेच. तीच पुण्याचा विकास करेल.

स्वप्निल - माझा अनुभव मुंबई - पुणे- मुंबई इतकाच. पण माधुरी ताईंना पुणे- न्यूयॉर्क - पुणे इतका प्रचंड अनुभव आहे.

सुबोध - बास झाल मला पाहून, आता जरा ' तिला पहा ' . तीला इशाला,  साँरी माधुरीला , तीला मतदान करा.

नाना : कुणी मत देणार का मत?
आपल्या या मराठी मुलीला जी इतकी वर्ष अमेरिकेत राहिली पण विकास दिसलाच नाही म्हणून इथं विकास करायला आलीय.
तीला मत देणार ना मत?
अरे राम मंदिर नंतर झालं तरी चालेल पण विकासापोटी उपाशी राहिलेल्या एक मराठी मुलीला मत देणार ना मत?

मुक्ता : ही ही ही . मी पहिल्यांदा पुण्याला आले तेंव्हा मला १ ते ४ वेळेचा फाॅर्म्यूला कळतच नव्हता.  पण तिच्यासाठी तरी तुम्ही दुपारी १ ते ४ जागे रहा. नाहीतर आम्हाला सगळ्यांना मत मागायला हाॅटेलच्या लाईनीत यावं लागायचं अन तिथेही आम्ही वेटींग वरच
ही ही ही

देव करो अन ही बातमी खरी ठरो.
नुसत्या अफवेनेच लोकसभा २०१९ चा '  दिल धकधक होने लगा है '

📝६/१२/१८
अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in

Sunday, December 2, 2018

अन्नदाता सुखी भव


अन्नदाता सुखी भव. 🙏🏻🙏🏻

अचानक एक दिवस जेवणाच्या ताटातील कांदा, लसूण, मसाल्याचा पदार्थानी मागणी केली की प्रत्येक जेवणात आम्हाला डाव्या बाजूला ८ % आणि उजव्या बाजूला ८% आरक्षण मिळालेच पाहिजे

आपली मागणी त्यांनी मोदकाकडे लावून धरली. निवेदन दिले.

पुरणपोळी, बासुंदी , श्रीखंड यांनी गप्प बसून तमाशा बघणे पसंत केले.

लोणच्याचा तेलाचा तवंग,  मिठाशी गुफ्तगु करायला पळाला आणि आपण पण आरक्षणाची मागणी करु असे  त्यांनी ठरवले.

मोदकांनी तातडीने अन्नपुर्णा समिती नेमून अहवाल सादर करायचे फर्मान सोडले.👉🏼

डाळ तडक्याला बरोबर घेऊन अन्नपुर्णा समितीतील पापडाने मुलाखती घ्यायला सुरवात केली.

आरक्षण द्या पण नाॅन - व्हेज कोट्याला हात लावलात तर खबरदार. तांबड्या / पांढ-या रस्याने सुनावले.😡

सॅलेड ने आमचा पाठिंबा सगळ्यांना पण व्हेज, नाॅनव्हेज मधे आम्हाला समान वागणूक असावी अशी विनंती केली.

मठ्ठा अजूनही निर्णय घेऊ शकत नाहीये तर बरोबरच्या जिलबीचा तोंडाचा पट्टा थांबता थांबत नाही आहे.

गुलाबजाम जाम रुसलाय आणि काही अघटित घडलं तर लिंबू ला हाताशी धरून खेळी करायचा विचारात आहे.

शहाणे दाणे , फिशला बरोबर घेऊन विदेशातून मोर्चा लावण्याच्या तयारीत आहेत.

 मोदक राजा , अध्यक्ष महोदयांना विनंती करत आहेत. थोडा वेळ द्या अभ्यासाला पुढच्या अधिवेशनात अहवाल सादर करतो सगळ्यांची टेस्ट बघून

अहो, आलं का ग पार्सल हाॅटलातून, रविवारी उशीरच करतात.
  टुकार लेखन बास झालं फोन करा परत हाॅटेलवाल्याला.

हो हो. झालं, आवरतं घेतोय लेखन. 🙋🏻‍♂

📝अन्नदाता सुखी भव 🙏🏻
poetrymazi.blogspot.in

Saturday, November 24, 2018

वासुदेव


महासत्ता २५/११/१८

Tuesday, November 20, 2018

हेल्मेट सक्ती


#हेल्मेट सक्ती

सक्ती म्हणले की पुणेकरांची
दिसून येते भक्ती
विरोधासाठी एकत्र येऊन
मिळून ठरवतात नाना युक्ती

ज्यातून सुचतात हे विचार
तेच तर सांभाळायचंय डोकं
१ जानेवारी च्या आधी आणून
घरात तरी ठेवा शिरस्त्राणाचं खोकं

शिर सलामत तो मिरवायला
 पुणेरी पगडी पचास
पुण्यावरचा विनोद आहे तेंव्हा
कंपल्सरी एकदा तरी हास 😝

📝२१/११/१८
poetrymazi.blogspot.in

#पुणे तिथे हेल्मेट उणे
#हेल्मेट सक्ती @ पुणे, १ जानेवारी पासून

Monday, November 12, 2018

हाॅटेलचा हा तुला दंडवत


पुण्यनगरीतील बातमी वाचली अन म्हणावास वाटलं
हाॅटेल 'रूपाली, वैशाली' : 'गुड लक' टू यू

(चाल: अखेरचा हा तुला दंडवत)

हाॅटेलचा हा तुला 'दंड'वत
पुणेरी असे हे गाव
भटारखाना पाहून देवा, टेबल सोडून धाव

तिथे 'किनारी' सगळे भेटले
गल्लोगल्ली 'अमृत तुल्ये'
आता परि स्वच्छ न उरले, उणे झाले गाव

हाॅटेलचा हा तुला 'दंड'वत
पुणेरी असे हे गाव

बिल पाहूनी जाता जाता
मित्र ही म्हणतो 'गुडलक' आता
कुणी न उरला 'बाकी' आता, व्याडेश्वरा तुझाच डाव

हाॅटेलचा हा तुला 'दंड'वत
पुणेरी असे हे गाव

📝पुणे तिथे स्वच्छता उणे
१७/१०/१८
poetrymazi.blogspot.in

Friday, November 9, 2018

दिवाळी पहाट


दिवाळी पहाट 🎇

दापोलीपासून खोपोलीपर्यंत
दिवाळी पहाट रंगली
'केंव्हा  तरी(च) पहाटे ' म्हणत
कलाकार मंडळी जमली.

'स्वर ही आले दुरुनी'
जमला आठवणींचा मेळा
फटाक्यांना ही माहित होत्या
फुटण्याच्या त्यांच्या वेळा

' त्या तिथे पलिकडे ' वाहिनींवर
आलटून पालटून लावली गाणी
' भातुकलीच्या खेळामधली'
सोबत  आली राजा राणी

कसा काय कुणास ठाऊक
'केतकीच्या बनात, मोगरा फुलला'
दर्दी रसिकांच्या कौतुकाने मग
नवोदित कलाकाराचा चेहरा खुलला

'ये रे घना, ये रे घना'
बोलावणे केले घनाला
बोल लाविले आम्हीच तरीही
अवेळी का आलास रे सणाला?

' शुक्र तारा मंद जरी वारा '
' संथ वाहते कृष्णा माई'
'उष: काल होता होता'
जो तो तल्लीन होऊन जाई

' मर्म बंधातली ठेव ही '
गाणी काळजात घुसली
' घेई छंद मकरंद' करताना
करंजी तोंडातच फुटली.

' स्वर गंगेच्या काठावरती '
वचन दिले मी तूला
' धागा धागा अखंड विणूनी'
सादर करतो ही कला.

📝७/११/१८
#दिवाळी पहाट
poetrymazi.blogspot.in
a.kelkar9@gmail.com

डाॅ काशिनाथ घाणेकर पर्व


📝 आणि. आणि...आणि  काशिनाथ घाणेकर

मी प्रभाकर पणशीकर स्वत:
 आणि माझी नाट्यसंस्था
 काशिनाथ घाणेकरांच्या पाठीशी
 खंबीरपणे उभी असेल

      ते -

काश्या,   काय करतोय तू 😡

 हा जीवन पट म्हणजे *आणि डाॅ...*

 साधारण १९६०- ते १९८६. चा  कालावधी
 ' रायगडाला जेंव्हा जाग येतेचा' १०० वा भाग चालू असतो.
नाटक संपतं,  वडील म्हणतात,  कानेटकरांने चांगलं लिहिलय नाटक,
 आणखी भाग होणार आहेत का?
'होय बाबा'
'म्हणजे दवाखान्यावर तुळशीपत्रच ठेवायचे ठरवलेले दिसते'
 मी चिपळूण ला जातोय इति वडील.
हा पालकांशी झालेला शेवटचा संवाद आणि काशिनाथ घाणेकर पर्वाची सुरवात. मस्त जमलीय.

सुलोचना दिदीं, संभाजी ला घेऊन कोल्हापूरला भालजी पेंढारकर  यांच्यकडे येतात आणि शिवाजीची भूमिका द्या असे सांगतात. अर्थात भालजी नकार देताना म्हणतात संभाजी,  शिवाजी दोन्ही भूमिका एकच कलाकार करु शकणार नाही.
( त्यांची काहीच चूक नाही यात कारण त्यावेळेला डाँ अमोल कोल्हे त्यांनी पाहिले नव्हते 😉)

तर सिनेमातील अनेक प्रसंग उदा. मुघले आझम सिनेमा पहायला गेल्यावर सौ घाणेकर,  कांचनला सिनेमाची कथा सांगताना आणि इतर अनेक प्रसंगात 'तुला पाहते रे' ची आठवण येतेच.
कितीही प्रयत्न केले तरी डाॅ घाणेकर - कांचन यांची विक्रम सरंजामे- इशाशी तुलना सिनेमाभर होत राहते.

"अश्रूंची झाली फुले "चा लाल्या  मस्त जमलाय हाच सिनेमाचा प्राण म्हणता येईल.

एकंदर कलाकार मंडळींच्या निवडीत सुलोचना( सोनाली), डाॅ लागू ( राघवन) ही पात्रे शोभून दिसली नाहीत .

 कानेटकर, पणशीकर, भालजी मात्र एकदम परफेक्ट

लेखक - निर्माता- कलाकार यांच्यातील द्वंद्व
तसेच
लागू- घाणेकर जुगलबंदी रंगत आणते.

सुरवातीला ६० च्या दशकात 'ही' थेटरात वडा मिळायचा.
शिवाजी मंदीर च्या मागे मुंबईत गिरण्यांचे भोंगे दिसायचे हे पहायला मिळाले.
आणि पुढे सगळं सिनेमात बघण्यासारखं .।

तरीपण काही आवडलेलं
बायकोच्या क्लिनिक मधे आलेल्या पेशंट कडून घाणेकरांना ' तुम्हाला कुठे तरी बघितलंय ' ही मिळालेली पहिली प्रशंसा ते मराठी नाट्यक्षेत्रात पहिली शिट्टी मिळालेला, एन्ट्रीला टाळी घेतललेला मराठी सुपरस्टार हिरो
आणि नामावलीत *आणि* कसं आल हा इतिहास एकदा नक्कीच पाहण्यासारखा.

कलाकाराला मिळालेली पहिली टाळी हा सरस्वतीचा मिळालेला शाप असतो.👏🏻
 यशाच्या शिखरावर असताना विद्यार्थ्यांनी विचारलेले
'  तुमचे नाव काय? ' हा प्रश्ण यशाचा ' यू' टर्न कसा ठरतो हे उत्तम दाखवलयं

*बाकी २-३ वर्षापूर्वी  दिवाळीला भावेंची " कट्यार जशी काळजात घुसली " तसा यंदाचा "घाणेकर पेग "म्हणावा तसा क.ड.क झाला नाही*

समाधान म्हणजे आमच्या सांगलीच्या अनेक कलाकारांना सिनेमात पाहिले.  त्यांचासोबत बसून सांगलीत सिनेमा पहायचा योग आला हे आमचे भाग्यच.😊

सुबोध साहेब , आता भावेंसाठी अभिमान वाटेल असा ' विष्णुदास भावेंचा' प्रोजेक्ट घ्या. यासाठी शुभेच्छा 💐

📝९/११/१८
अमोल
poetrymazi.blogspot.in

Tuesday, July 31, 2018

बटन तुझे दाबता


नगरसेवक,  EVM मशिन्स, काॅमन मॅन  यांच्यातील नाते आजच्या काही शहरांच्या महानगरपालिका निवडणुकी निमित्ताने :-

( चाल: प्रथम तुजं पाहता )


बटण तुझे दाबता 'हात' वेडावला

समजुनी घेतले महा रथींनी तुला

स्पर्श होता तुझा भांभावलो आज मी

कुंद खोलीतला प्राशिला गंध मी
करूनी मत दान निघुनी का चालला

जाग झोपेतुनी मजसी ये जेधवा

जवळुनी सेवकासी पाहिले तेथवा
सावध वार्डपती तो क्षणभरी थांबला..

बटण तुझे दाबता...


📝 १/८/१८

poetrymazi.blogspot.in
विसंगती सदा मिळो
----------------------------------------------
मुळ गाणे :
प्रथम तुझ पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला

स्पर्श होता तुझा विसरलो भान मी

धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटुनी तू घेतला

जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा

कवळुनी तुजसी मी चुंबिले तेथवा
धावता रथपती पळ भरी थांबला

प्रथम तुझ पाहता

Friday, June 29, 2018

लाह्या लाह्या अखंड खाऊया!


*पाॅपक्राॅन* 🍿
( चाल: धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया)

लाह्या लाह्या अखंड खाऊया!
पिक्चर पिक्चर तिथे बघूया !!

साॅल्ट चिजचे,  टोमॅटोचे!
भलत्या किंमतीत घ्यावे लागे!
विविधढंगी पाॅपक्राॅनचे!
खोके घेऊनि पांडू रंगे!
कुटुंबवत्सल जो तो दिसला!
मध्यारंभी नित्य चराया!!

लाह्या लाह्या अखंड खाऊया!
पिक्चर पिक्चर तिथे बघूया !!

काॅंन्टरवरच्या रांगेभोवती!
मनामनातले हिशोब टाका!
देऊन कार्ड त्यांच्या हाती!
अर्धी उघडी लाज राखा "
खादाडीचा घेऊन चर खा!
मल्टीप्लेक्सचे गीत गाऊया!!


लाह्या लाह्या अखंड खाऊया!
पिक्चर पिक्चर तिथे बघूया !!

अशी प्लॅस्टिक बंदी आता न होणे


गदिमांनी बालगंधर्वांवरती लिहिलेली सुप्रसिध्द कविता
 असा बालगंधर्व आता न होणे...

 जसा जन्मतो तेज घेऊन तारा!
जसा मोर घेऊन येतो पिसारा!
तसा येई घेऊन कंठात गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!

 रतीसारखे जया रुपलावण्य लाभे!
 कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे!
 सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे!
 असा बालगंधर्व आता न होणे!

 यावरून सुचलं 📝
 *अशी प्लॅस्टिक बंदी आता न होणे*.

 जसा बसतो आज बाजार सारा!
 तसा रामू म्हणतो कायदा हमारा!
 मग करी येऊन नियमात उणे!
अशी प्लॅस्टिक बंदी आता न होणे!

 'विघटने' जया सहजसाध्य लाभे!
 पन्नास मायक्रा‌ॅन हातात शोभे!
रामदासी साद, वर्गीय होणे!
अशी प्लॅस्टिकबंदी आता न होणे!

Wednesday, June 6, 2018

रचिले 'अॅडमिनमुनींनी' त्यांचे ग्रुप अनंत


ई- डंबन📝-कृपया हलकेच घेणे

(चाल: रचिल्या ऋषीमुनींनी त्यांच्या ऋचा अनंत )

रचिले 'अॅडमिनमुनींनी' त्यांचे ग्रुप अनंत
डंका सभासदानों करा त्यांचा दिगंत

वरदायक अडोसा, ‌अॅडमीनवर भरोसा
का वेड लाविसी तू, दिसती अनेक जंत

येसी नेटातूनी तू, अॅडमीन सांगे हेतू
तरीही भ्रमात सारे योगी ,मनी नी पंत

ग्रुप मंदिरात येती, तेच आमचे भक्त
ते सर्व होतीसंत,  येताच पापवंत

रचिले 'अॅडमिनमुनींनी' त्यांचे ग्रुप अनंत
डंका सभासदानों करा त्यांचा दिगंत

📝७/६/१८
रवीचा मृग नक्षत्र प्रवेश
(कवीचा ई-डंबन नक्षत्रात प्रवेश)

विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो
poetrymazi.blogspot.in

मुळ गाणे :- इथे वाचता येईल👇🏻
https://www.aathavanitli-gani.com/Song/Rachilya_Rushi_Munini

Tuesday, June 5, 2018

भिती लागी जीवा


मातोश्री" वरची  ' ग्रेट भेट ' , शब्दातून थेट ..... .. . . 🌷🏹

( चाल : भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे  रात्रंदिवस  वाट तुझी  )


भीती लागी जीवा वाटली 'श हा' स ,  वाटे रात्रंदिवस व्हावी युती

पोर्णीमेच्या चंद्राचे ' अच्छे जीवन ' , तैसे माझे मन 'बाण' पाहे

इलेक्शनच्या मुळा  नेत्रे आसावली, जमुनिया सारी विरोधासी

जिकूनियां येऊ अति शोक ( न ) करी,  वाट पाहे ( मी ) तरी  मातोश्रीची

'शेठ' म्हणे मज उगानगो चूक, जिकूंनी परत देरे  देवा  !!

📝५/६/१८
poetrymazi.blogspot.in

मूळ गाणे:-

भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥

पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥

दिवाळीच्या मुळा नेत्री आसावली, पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥२॥

भुकेलिया बाळा अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची ॥३॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥

Tuesday, March 27, 2018

दोन बोक्यांनी आणला हो आणला


दोन बोक्यांनी आणला हो आणला धरुन प्रश्णांचा गोळा
उत्तरात झाला हो त्यांच्या परंतु सारा घोटाळा !

एक म्हणे, "म्याँव, म्याँव, जरा पुढे येऊ !" 🚂
दुसरा म्हणतो, "म्याँव, म्याँव, हात नको लावू !"🖐🏻
मतांसाठी होता हो होता, प्रश्णांवर दोघांचा डोळा !

( या दोन मांजरांचं संभाषण माकडानं झाडावरून ( चोरुनही नाही )पाहिलं,
म्हणून तो टुणकन्‌ उडी मारुन खाली आला आणि म्हणाला- )

"हुप्प, हुप्प, हुप्प, माझ्या शेपटीला तूप !
अरे, मतांसाठी मैत्रीला का लावता कुलूप ?
ऐका माझं, नका भांडू, रहा थोडे चूप."

बोके म्हणती, "माकड भाऊ, शकाल का हे भांडण मिटवू ?"

माकडदादा मान हलवूनी, एक टेंडर येई घेऊनी
एक लहान तर एक मोठा !
लहान-मोठे केले त्याने वाटे ठेवुनी मुंबई वर डोळा !

( पुढे तर माकडानी आणखीनच मज्जा केली बाबा !)

दोन बाजुला टाकून गोणी, माकड पाहू लागे तोलुनी.
एक पारडे खाली जाई, हळूच त्यातले काढून खाई.
म्हणती मांजरे, "तू का रे गोणी ऐसे घेसी बरे ?"
माकड म्हणालं, "दोन सारखे वाटे होण्या असेच करणे योग्य ठरे."

माकडाने ते घेऊनी सारी गोणी टुणकन्‌ पोबारा केला.

मज्जा झाली माकडाची, पुढे फजिती बोक्यांची !
दोघांमध्ये भांडण होता, होते चंगळ तिसर्‍याची.

त्या बोक्यांना आपल्या भांडणाचा, अस्सा धडा मिळाला !

📝 मांजर, बोके काल्पनिक. चालू घडामोडींशी चोरुनही संबंध नाही

२३/२/१८
विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो

मी ओळखून आहे सारी तुझी वहाने


लागून आलेल्या सुट्टीनंतर परतीच्या प्रवास करणाऱ्यांना अर्पण 🚗🚕🚙टपट
( चाल: लाजून हासणे अन हसून ते पहाणे, मी ओळखून आहे...)

बाजून धावणे अन हसून ते पहाणे
मी ओळखून आहे सारी तुझी वहाने

रस्त्त्यास वाहनांचा का सांग भार व्हावा?
सूटताच गाव माझा तो टोल ही दिसावा?
ही रांग जिवघेणी घुसती अती शहाणे
मी ओळखून आहे सारी तुझी वहाने

पाठी आराम ज्याच्या, त्याला कसे कळावे
पायात ब्रेक ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे
मागे उभा जो माझ्या,  त्याचे आम्ही दिवाणे
मी ओळखून आहे सारी तुझी वहाने

जाता ओलांडूनी तू, पसरे धूळ सारा
डोक्यामधे रागाचा, चढेल अजून पारा
गाडीत मिळता पाणी , सुचते टुकार गाणे

मी ओळखून आहे सारी तुझी वहाने

Happy return journey. 🚗🚙🚕

📝३/३/१८

*विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो*

साप शिडी


सापशिडी 🐍⬆

उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा लहानपणी  आपण  अवश्य सापशिडी खेळलो असू. आज मुलांनी रात्रीचे जेवण झाल्यावर हा खेळ खेळायला बसविले. खेळताना मजा आलीच पण या साप शिडीचा खेळाने काही *बिनडोक* विचार सुचले.

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात आली की पूर्वीच्या  सापशिडीत आणी आत्ताच्या सापशिडीत साप आणि शिडी यांच्या जागा काही ठीकाणी  बदल्यात.  आणि हा बदल मला तरी सध्याच्या परिस्थितीला अनुकूल वाटला.
आता थोडं तत्वज्ञान : हा खेळ म्हणजे  जणू प्रत्येकाचा जीवन पट. प्रत्येकाला १०० चा टप्पा गाठायचाय.  वाटेत वेगवेगळ्या टप्प्यात येणारे साप- शिडी म्हणजे जिवनात होणारे चढ उतार, अर्थात यश- अपयश.  यातूनच अपयशाने न खचता अनुकूल फासे पाडत, प्रसंगी मिळालेल्या योग्य संधीची शिडी चढत मुक्कामाला पोचणे हे जीवनाचे तत्वज्ञान हा खेळ शिकवतो ना?

आता हा चौकोनी पट १०× १० चा. जणू वयाचे १० , १० वर्षाचे टप्पेच. तर मला या नवीन सापशिडीत लक्षात आलेली पहिली गोष्ट ( जी बहुतेक आपल्या वेळेला नव्हती)  म्हणजे सुरवातीच्या पहिल्यांच रांगेत (९ नंबर वर) असलेला साप. साप काही फार मोठा नाही पण वयाच्या सुरवातीलाच जीवनाचा पहिला कडू घोट ( पहिले अपयश) पचवण्याची शक्ती लहानपणीच हा साप देतो असे माझे मत.
१० ते २० मधे सतरा ला खतरा या न्यायाने आणखी एक साप ( अल्लड वय??) सरळ दोन वर म्हणजे ये रे माझ्या मागल्या. सातत्य,  चिकाटी,  अभ्यास ( पक्का बेस) होण्यासाठी तर हा साप मदत करत नसेल?
बर योग्य संधी मिळाली तर १४ किंवा २० वर असणारी छोटीशी शिडी आयुष्यात खुप उपयोगी पडते.
साधारण वय वर्ष २० ते ३० हा धडपडीचा काळ. या काळात सकारात्मक पद्धतीने  जीवनाला सामोरे गेले तर काही त्रास होत नाही आणी यात एक ही साप न देता प्रसंगी तिथे असलेल्या ४ शिड्यांपैकी एकाचा तरी उपयोग करुन घ्यायला हा खेळ शिकवतो .३१ ते ४१ एकही शिडी किंवा साप न देता स्थिर स्थावर होण्यास मदत करणे हा या मागचा हेतू मला यातून दिसतो.
खरा खेळ उत्तरार्धातच रंगतो( ४० नंतर) कारण मोठे मोठे साप, तसेच मोठ्या शिड्या इथे मिळतात. रावाचा रंक होणे किंवा मिळालेल्या एका संधीने आपल्या मुक्कामाकडे झेप घेता येणे हे सगळे शक्य होते. ६०, ७० मधील साप हे शारीरिक स्वास्थाबद्दल जागृत राहण्याचा संदेश देतात असे  वाटते
यातील एक आवडलेली शिडी म्हणजे ६२ वरुन एकदम ८१. साधारण नोकरदार माणूस निवृत्त व्हायचा हा कालावधी पण त्यात ही व्यवस्थित रुटीन, छंद किवा इतर आवडीचे काम असेल तर सहस्त्रचंद्रदर्शन (८१) काही दूर नाही.
सापांची संख्या ७ आणी शिड्या ८ यावरून जीवनात अडचणींपेक्षा संधी जास्त मिळतात हे तर सुचवायचे नसेल?

काय आवडली का ही वैचारिक  सापशिडी? आता मुलांबरोबर/ मित्रांबरोबर/ सुहृदांबरोबर परत खेळान ना नव्या परिमाणासह

*जीवनातली( साप) शिडी अशीच राहू दे*

📝 अमोल
२१/३/१८
माझे टुकार ई-चार
poetrymazi.blogspot.in

बदाम ७


मंडळी , सापशिडीचा वैचारिक खेळ  आवडला असे अनेक जणांनी कळवले . मन:पुर्वक  धन्यवाद . या बैठ्या खेळाच्या मालिकेतील हा पुढचा लेख ( बहुदा शेवटचा. टुकार/ बिनडोक विचारावरही मर्यादा असतात )

तर मंडळी परत एकदा आपण आपल्या बालपणीच्या काळात जाऊ. परीक्षेचा सापळ्यातून नुकतीच सुटका झालेली असते. सुट्टीला आजोळी किंवा आत्याकडे वगैरे गेलेलो असतो. आत्या , मामा ,आजी , आजोबा ( यापैकी कुणीही ) नव्या को-या पत्याचा कॅट आणून देतात  आणि मग सर्व भावंडं  वडीलधारी  यांच्या सोबत सुरु होत पत्यांचे महायुद्ध.. . .

तर आपण लहानपणापासुन पत्यांचे अनेक खेळ खेळलेलो असू. शाळेची सुरवात जशी बालवाडीतून होते तशी  पत्यांच्या खेळाची सुरवात  भिकार - सावकार  या खेळातून बहुदा सगळ्यांची झालेली असते.मग हळू हळू  सात - आठ , चौघांचे लॅडीज , मेंढी कोट  ( सर्व दश्या एकत्र घेणे . या ही खेळात मोठा वैचारिक अर्थ आहे तो परत कधीतरी -(म्हणजे कधीच नाही 😉) ), मग थोडे हाय प्रोफाइल डाव , रमी , चॅलेंज, ब्रीज , तीन पत्ती??? . इ..  ( रमी खेळणारे जास्त लोकल प्रवास करतात का ? चॅलेंज  जास्त खेळणारे  पुढे राजकारणी झाले का  हेही एकदा मला अभ्यासयायचं ☺ असो. )

आता या सर्व वर्णन केलेल्या डावात एक सोपा डाव कसा राहून गेला असा विचार तुमच्या मनात आला असेल.  नाही नाही राहिला नाही . या वैचारिक मालिकेतील ज्या खेळाबद्दल मला लिहायचे आहे तोच  तर हा खेळ आहे .
बदाम सात चा खेळ ❤7⃣

अतिशय सोपा सरळ , तेवढीच उत्सुकता वाढवणारा आणि म्हणलं तर वैचारिक ही. चला पाहू यातील  वैचारिक पणा

*बदाम सात* .  आता खेळाची सुरवात  बदाम सत्ती  पासून करायची असते हे  सांगायलाच नको.  पण बदामसत्तीच का बघू  या

 ७ -  हे आठवड्याच्या सात दिवसाचे तर प्रतीक नसेल ?  आज सुरवात करताना तुम्हाला पुढचे सात दिवस तरी लक्षात घेऊन प्लॅन ( short term plan) करायचा आहे.  आणखी एक - एक्या पाासून राजा पर्यत १३ कार्डात ७ वे हे मधले कार्ड. कुठल्याही गो्ष्टीची सुरुवात ह्दयातून  ( बदाम? ?) होऊन त्याला नंतर मुर्त्य स्वरूप मिळते  ह्दय मध्यभागी  ( ७ नं)
म्हणून बदाम सात ने सुरुवात.

चला सुरवात तर चांगली झाली.

 मग हेच लाॅजिक वापरून  चौकट , इस्पिक, किलवर ७ नेच सुरवात करायची.

आता हे चार प्रकार काही काही वेळेला मला धर्म, अर्थ,  काम, मोक्ष ( इस्पिक, चौकट, बदाम, किलवर) याचे प्रतिक आहेत असे वाटते. Tarot card मधे ही wands, diamond,  cup, sword अशा साधारण याच पध्दतीने यांचे वर्गीकरण केले आहे.
आता एवढेही जास्त वैचारिक व्हायला नको खेळताना.

खेळ सुरु झाला आहे. आपल्या हातातील शुअर पत्ते सोडले तर बाकीचे पत्ते इतरांनी टाकलेल्या पत्यांवरही अवलंबून आहेत.( एकमेंकावर अवलंबून असणे) साधा विचार.

चालू रंगात खेळता येण्या सारखे पान नसेल आणी हातात दुसरी एखादी सत्ती असेल
तर ती (पास न म्हणता ) टाकावी लागते.यातून show must go on या रितीने थोडा वेगळा विचार करणे ( out of box thinking? ??)  अभिप्रेत असावे का?

काही वेळ अशी येते की हतबल व्हायला होते आयुष्यात . त्या कालावधीत पास ( संयम) म्हणण्या खेरीज गत्यंतरच नसते.  योग्य वेळेची प्रतिक्षा करुन गाडी नंतर रूळावर येऊ शकते.

आता काही  डाव ( वर्षे)   सरळ सोपे असतात. मग दुस-याची अडवणूक करावीशी वाटते. हातातली सत्ती न टाकता दुसरी पाने खेळून दुस-यांची मजा बघावीशी वाटते. पण जी सत्ती हातात आहे त्याचाच राजा किंवा राणी हातात असेल तर योग्य वेळी त्या सत्तीची उतारी करण्याचे   तारतम्य हा खेळ खेळून मिळत असेल का?

डाव ऐन रंगात आलेला असतो काही जणांना कडे ३ पाने राहिलेली असतात , three page sure चा आवाज त्याने दिलेला असतो. एखाद्याकडे एकच कार्ड पण not sure असते. आणी ब-याचदा not sure असणारी व्यक्ती डाव जिंकते. यातून जिवनातली अनियमितता, किंवा कुठल्याही परिस्थितीत आशावादी राहणे हे सुचवायचे असेल का?

मंडळी  हा लेख की तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो.
पण एक निरिक्षण म्हणून सांगतो खुपच जास्त वेळा इस्पिकची रांग सगळ्यात पहिला संपते भले बदाम ७ पासून खेळास सुरवात झाली असली तरी. म्हणजेच केवळ आरंभ शूर नको. शेवट पर्यत जा . खरे ना?

माझी इचलकरंजीची आत्या जिला पत्यांची भारी आवड होती,  जिच्याकडून आम्ही सुट्टीत पत्ते खेळायला शिकलो.तसेच माझे एक अजोबा ( आईचे मामा) जे दादरला हिंदू काॅलनीत रहायचे आणी ज्यांनी ब्रिजचा खेळ शिकवला त्यांना हे लेखन समर्पित 🙏🏻

📝 अमोल
२३/३/१८
माझे टुकार ई-चार
poetrymazi.blogspot.in

मंत्रालयातली गोष्ट ही


*मंत्रालयातली गोष्ट ही*
( चाल :  मर्मबंधातली ठेव ही )

मंत्रालयातली गोष्ट ही
मूषक मय
मारी टिपुनी गोळ्याने दुखवी जीव
*मंत्रालयातली गोष्ट ही*...

टेंडरुनी मग लाभार्थी हा
सरकारी मेवा लुटण्यासी आला
ठेवी बिळाला मोक्याच्या मनी

*मंत्रालयातली गोष्ट ही*
*मूषक मय*

🐭
आमचे मुंबईतील स्नेही श्री प्रमोद देव यांनी या विडंबनाला त्यांच्या अनुदिनीत स्थान देऊन चक्क ते  गाणं चालीत ही  म्हणले.

Happy feeling😊


http://abhivachan.blogspot.in/2018/03/blog-post.html?m=1

https://youtu.be/-McbU3OL9lw

📝२४/३/१८
*माझे टुकार ई-चार*
poetrymazi.blogspot.in

क्रिएटिव्हिटी रोज एक जरी असेल टुकार अन फेक 

डेटा मिळे झुक्याला


फेसबुक चा डेटा चोरिला गेला हे झुक्याने मान्य केले. पण चुकीला माफी नाही. शिक्षा द्यायलाच पाहिजे ना?

डेटा मिळे झुक्याला
( मुळ गाणे: काटा रुतेे कुणाला)

डेटा मिळे झुक्याला
वापरतात कोणी, मग चूक ही कळावी
हा फेबुयोग आहे
इथे कुणाचा, डेटा मिळे झुक्याला

सांगू कसे कुणाला कळ खोट्या अॅपची
माझेच पाहण्याचा मज शाप हाच आहे

फोटो जरी पहातो  रुजतो अनर्थ येते
माझे लाईकणेही विपरीत होत आहे

हा टँग अन फाँलो की  काहीच सोसवेना
फेसबुक डिलीटुनी मी व्हाटसपग्रस्त आहे

इथे कुणाचा ,डेटा मिळे झुक्याला

📝अमोल
रामनवमी , २५/३/१८

विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो
Related Posts Plugin for WordPress, Blogger...