सापशिडी 🐍⬆
उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा लहानपणी आपण अवश्य सापशिडी खेळलो असू. आज मुलांनी रात्रीचे जेवण झाल्यावर हा खेळ खेळायला बसविले. खेळताना मजा आलीच पण या साप शिडीचा खेळाने काही *बिनडोक* विचार सुचले.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात आली की पूर्वीच्या सापशिडीत आणी आत्ताच्या सापशिडीत साप आणि शिडी यांच्या जागा काही ठीकाणी बदल्यात. आणि हा बदल मला तरी सध्याच्या परिस्थितीला अनुकूल वाटला.
आता थोडं तत्वज्ञान : हा खेळ म्हणजे जणू प्रत्येकाचा जीवन पट. प्रत्येकाला १०० चा टप्पा गाठायचाय. वाटेत वेगवेगळ्या टप्प्यात येणारे साप- शिडी म्हणजे जिवनात होणारे चढ उतार, अर्थात यश- अपयश. यातूनच अपयशाने न खचता अनुकूल फासे पाडत, प्रसंगी मिळालेल्या योग्य संधीची शिडी चढत मुक्कामाला पोचणे हे जीवनाचे तत्वज्ञान हा खेळ शिकवतो ना?
आता हा चौकोनी पट १०× १० चा. जणू वयाचे १० , १० वर्षाचे टप्पेच. तर मला या नवीन सापशिडीत लक्षात आलेली पहिली गोष्ट ( जी बहुतेक आपल्या वेळेला नव्हती) म्हणजे सुरवातीच्या पहिल्यांच रांगेत (९ नंबर वर) असलेला साप. साप काही फार मोठा नाही पण वयाच्या सुरवातीलाच जीवनाचा पहिला कडू घोट ( पहिले अपयश) पचवण्याची शक्ती लहानपणीच हा साप देतो असे माझे मत.
१० ते २० मधे सतरा ला खतरा या न्यायाने आणखी एक साप ( अल्लड वय??) सरळ दोन वर म्हणजे ये रे माझ्या मागल्या. सातत्य, चिकाटी, अभ्यास ( पक्का बेस) होण्यासाठी तर हा साप मदत करत नसेल?
बर योग्य संधी मिळाली तर १४ किंवा २० वर असणारी छोटीशी शिडी आयुष्यात खुप उपयोगी पडते.
साधारण वय वर्ष २० ते ३० हा धडपडीचा काळ. या काळात सकारात्मक पद्धतीने जीवनाला सामोरे गेले तर काही त्रास होत नाही आणी यात एक ही साप न देता प्रसंगी तिथे असलेल्या ४ शिड्यांपैकी एकाचा तरी उपयोग करुन घ्यायला हा खेळ शिकवतो .३१ ते ४१ एकही शिडी किंवा साप न देता स्थिर स्थावर होण्यास मदत करणे हा या मागचा हेतू मला यातून दिसतो.
खरा खेळ उत्तरार्धातच रंगतो( ४० नंतर) कारण मोठे मोठे साप, तसेच मोठ्या शिड्या इथे मिळतात. रावाचा रंक होणे किंवा मिळालेल्या एका संधीने आपल्या मुक्कामाकडे झेप घेता येणे हे सगळे शक्य होते. ६०, ७० मधील साप हे शारीरिक स्वास्थाबद्दल जागृत राहण्याचा संदेश देतात असे वाटते
यातील एक आवडलेली शिडी म्हणजे ६२ वरुन एकदम ८१. साधारण नोकरदार माणूस निवृत्त व्हायचा हा कालावधी पण त्यात ही व्यवस्थित रुटीन, छंद किवा इतर आवडीचे काम असेल तर सहस्त्रचंद्रदर्शन (८१) काही दूर नाही.
सापांची संख्या ७ आणी शिड्या ८ यावरून जीवनात अडचणींपेक्षा संधी जास्त मिळतात हे तर सुचवायचे नसेल?
काय आवडली का ही वैचारिक सापशिडी? आता मुलांबरोबर/ मित्रांबरोबर/ सुहृदांबरोबर परत खेळान ना नव्या परिमाणासह
*जीवनातली( साप) शिडी अशीच राहू दे*
📝 अमोल
२१/३/१८
माझे टुकार ई-चार
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment