मंडळी , सापशिडीचा वैचारिक खेळ आवडला असे अनेक जणांनी कळवले . मन:पुर्वक धन्यवाद . या बैठ्या खेळाच्या मालिकेतील हा पुढचा लेख ( बहुदा शेवटचा. टुकार/ बिनडोक विचारावरही मर्यादा असतात )
तर मंडळी परत एकदा आपण आपल्या बालपणीच्या काळात जाऊ. परीक्षेचा सापळ्यातून नुकतीच सुटका झालेली असते. सुट्टीला आजोळी किंवा आत्याकडे वगैरे गेलेलो असतो. आत्या , मामा ,आजी , आजोबा ( यापैकी कुणीही ) नव्या को-या पत्याचा कॅट आणून देतात आणि मग सर्व भावंडं वडीलधारी यांच्या सोबत सुरु होत पत्यांचे महायुद्ध.. . .
तर आपण लहानपणापासुन पत्यांचे अनेक खेळ खेळलेलो असू. शाळेची सुरवात जशी बालवाडीतून होते तशी पत्यांच्या खेळाची सुरवात भिकार - सावकार या खेळातून बहुदा सगळ्यांची झालेली असते.मग हळू हळू सात - आठ , चौघांचे लॅडीज , मेंढी कोट ( सर्व दश्या एकत्र घेणे . या ही खेळात मोठा वैचारिक अर्थ आहे तो परत कधीतरी -(म्हणजे कधीच नाही 😉) ), मग थोडे हाय प्रोफाइल डाव , रमी , चॅलेंज, ब्रीज , तीन पत्ती??? . इ.. ( रमी खेळणारे जास्त लोकल प्रवास करतात का ? चॅलेंज जास्त खेळणारे पुढे राजकारणी झाले का हेही एकदा मला अभ्यासयायचं ☺ असो. )
आता या सर्व वर्णन केलेल्या डावात एक सोपा डाव कसा राहून गेला असा विचार तुमच्या मनात आला असेल. नाही नाही राहिला नाही . या वैचारिक मालिकेतील ज्या खेळाबद्दल मला लिहायचे आहे तोच तर हा खेळ आहे .
बदाम सात चा खेळ ❤7⃣
अतिशय सोपा सरळ , तेवढीच उत्सुकता वाढवणारा आणि म्हणलं तर वैचारिक ही. चला पाहू यातील वैचारिक पणा
*बदाम सात* . आता खेळाची सुरवात बदाम सत्ती पासून करायची असते हे सांगायलाच नको. पण बदामसत्तीच का बघू या
७ - हे आठवड्याच्या सात दिवसाचे तर प्रतीक नसेल ? आज सुरवात करताना तुम्हाला पुढचे सात दिवस तरी लक्षात घेऊन प्लॅन ( short term plan) करायचा आहे. आणखी एक - एक्या पाासून राजा पर्यत १३ कार्डात ७ वे हे मधले कार्ड. कुठल्याही गो्ष्टीची सुरुवात ह्दयातून ( बदाम? ?) होऊन त्याला नंतर मुर्त्य स्वरूप मिळते ह्दय मध्यभागी ( ७ नं)
म्हणून बदाम सात ने सुरुवात.
चला सुरवात तर चांगली झाली.
मग हेच लाॅजिक वापरून चौकट , इस्पिक, किलवर ७ नेच सुरवात करायची.
आता हे चार प्रकार काही काही वेळेला मला धर्म, अर्थ, काम, मोक्ष ( इस्पिक, चौकट, बदाम, किलवर) याचे प्रतिक आहेत असे वाटते. Tarot card मधे ही wands, diamond, cup, sword अशा साधारण याच पध्दतीने यांचे वर्गीकरण केले आहे.
आता एवढेही जास्त वैचारिक व्हायला नको खेळताना.
खेळ सुरु झाला आहे. आपल्या हातातील शुअर पत्ते सोडले तर बाकीचे पत्ते इतरांनी टाकलेल्या पत्यांवरही अवलंबून आहेत.( एकमेंकावर अवलंबून असणे) साधा विचार.
चालू रंगात खेळता येण्या सारखे पान नसेल आणी हातात दुसरी एखादी सत्ती असेल
तर ती (पास न म्हणता ) टाकावी लागते.यातून show must go on या रितीने थोडा वेगळा विचार करणे ( out of box thinking? ??) अभिप्रेत असावे का?
काही वेळ अशी येते की हतबल व्हायला होते आयुष्यात . त्या कालावधीत पास ( संयम) म्हणण्या खेरीज गत्यंतरच नसते. योग्य वेळेची प्रतिक्षा करुन गाडी नंतर रूळावर येऊ शकते.
आता काही डाव ( वर्षे) सरळ सोपे असतात. मग दुस-याची अडवणूक करावीशी वाटते. हातातली सत्ती न टाकता दुसरी पाने खेळून दुस-यांची मजा बघावीशी वाटते. पण जी सत्ती हातात आहे त्याचाच राजा किंवा राणी हातात असेल तर योग्य वेळी त्या सत्तीची उतारी करण्याचे तारतम्य हा खेळ खेळून मिळत असेल का?
डाव ऐन रंगात आलेला असतो काही जणांना कडे ३ पाने राहिलेली असतात , three page sure चा आवाज त्याने दिलेला असतो. एखाद्याकडे एकच कार्ड पण not sure असते. आणी ब-याचदा not sure असणारी व्यक्ती डाव जिंकते. यातून जिवनातली अनियमितता, किंवा कुठल्याही परिस्थितीत आशावादी राहणे हे सुचवायचे असेल का?
मंडळी हा लेख की तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो.
पण एक निरिक्षण म्हणून सांगतो खुपच जास्त वेळा इस्पिकची रांग सगळ्यात पहिला संपते भले बदाम ७ पासून खेळास सुरवात झाली असली तरी. म्हणजेच केवळ आरंभ शूर नको. शेवट पर्यत जा . खरे ना?
माझी इचलकरंजीची आत्या जिला पत्यांची भारी आवड होती, जिच्याकडून आम्ही सुट्टीत पत्ते खेळायला शिकलो.तसेच माझे एक अजोबा ( आईचे मामा) जे दादरला हिंदू काॅलनीत रहायचे आणी ज्यांनी ब्रिजचा खेळ शिकवला त्यांना हे लेखन समर्पित 🙏🏻
📝 अमोल
२३/३/१८
माझे टुकार ई-चार
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment