नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, September 13, 2017

खोटी खोटी रूपे तुझी


देशातील चौदा भोंदू  रत्नांची नावे जाहिर झाली आणी मग आम्हाला ही त्यांची आरती करायचा मोह आवरला नाही

खोटी खोटी रूपे तुझी
खोटे डेरे,  मठ सारे
कुठे कुठे ठोकू तुला
तुझे अघोरी कृत्य सारे

नीच गोष्ट ज्या ज्या काही
तिथे तुझा वास
तुझा आशिर्वाद देतो,
गुंडांना निवास
चराचरा गंडविशी,
संग तुझा कशा ला रे?

खरे रुप भोंदू बाबा
कोण ते कळेना
नको जामिनावरी तूच,
तुरूंगात रहाना
तुला अडकवाया घ्यावा, पिनल कोड कोणता रे? 

📋
खोटी खोटी रूपे तुझी..
📝 ११/९/१७

हिरव्या हिरव्या रंगाची


हिरव्या हिरव्या रंगाची
झाडी घनदाट
मालगाडी घसरून
लागली की हो वाट....

हिरव्या हिरव्या झाडीत
हिरवी हिरवी पानं
झुक झुक गाडीनं
आता नको जाणं
पुना-बाँम्बे ओसरली
आपुलकीची लाट


खंडाळ्याच्या घाटात
हवा थंडगार
रुळावरून घसरी डबे
का हो बार बार
महिन्याभरच्या अपघातांची, यादी तोंड पाठ

बोगद्यातून गाडी जाता
होई अंधार
अंघारात प्रीत घेता प्रितीचो आधार
इंजीनाच्या मागे पडती डबे आपोआप


हिरव्या हिरव्या ..
📝  ८/९/१७
🚂🚂

मोजीन किती रस्त्यात खड्डे बाई



मोजीन मोजीन मोजीन  किती रस्त्यात खड्डे बाई
हायवेवर ट्रँफीकचा अंत दिसत नाही

ब्रेकुनी पाय जोरात, खड्डा चुकविती
रखडत रखडत फसवुनी,क्लचबंध तोडिती

रस्त्याचा सुंदरसा  पँच गुंफिती
डांबर डांबर ओतुनी परि  तुटत तुटत जाई

कठिण कठिण कठिण किती

कावळा .....


मध्यतंरी  कावळ्यांनी खत व्यक्त केली की तुम्ही चिमण्यावर  गाणं लिहिलंत  आमच्यावर का नाही ? आता पितृ पंधरवड्यात  या  कावळ्यांना  खुश ठेवायलाच पाहिजे ना  .... 
( चाल गारवा : ) 
कावळा ..... 

घाटावर  भिर भिर भिर तो  रोज नवा 
जिथे.... ..   तिथे ही  हा कावळा  रोज  नवा 

पितृ च पक्षी  नाव तयांचे 
पिंड  लावले दही - भाताचे 
झाडावरून सर सर तो  कावळा रोज नवा 


आकाश सारे सोडून पहा रे 
आता पितर आलेत सारे 
पितरांना भर भर भर खुशवा 

जिथे.... ..   तिथे ही  हा कावळा  रोज  नवा..

अमोल

13/9/17

Sunday, September 3, 2017

रविवारची टुकारगिरी


रविवारची टुकारगिरी 📝
ठिकाण: लोणावळा
🚎🚌🚎🚌🚎🚌

अरे अजून कशी आली नाही ही  *स्वारगेट ' हिरकणी*' एव्हान यायला पाहिजे होती. माझी तर आता  निघायची वेळ झाली असे विचार *बोरिवली*
*शिवनेरीच्या* मनात येत असतानाच लोणावळा एक्सीट मधून अर्ध गोलाकार वळण घेत धापा टाकत. *ठाणे - स्वारगेट* *हिरकणी* अवतरली.
अग हो, हो,  जरा हळू,
उशीर झाला म्हणून एवढं जोरात यायचं, लागलं असतं की तुलाच.. शिवनेरी जरा काळजीच्या भावनेने म्हणाली..
ए शिवनेरी Sorry हं,  जरा उशीरच झाला मला, आता नेहमी सारख्या गप्पा नाही जमणार गडबड होईल इती - हिरकणी
' अगं असू दे ' गप्पा काय संध्याकाळी परत येताना करु,  तू आधी ३० रुपयाचा नाष्टा करुन ये. *उपमा* घे आज. मस्त आहे गरम
नको ग आज शिवनेरी
का ग?
काय सांगू , गणपती सुट्टीच्या  कोकणातील अतिरिक्त फे-यांनी मला जाम त्रास झालाय, पोट बिघडलंय माझं, मळमळतय नुसतं आणी आत्ताच घाट पण चढून आलीय ना.
' हो ना गं ' किती ते मोठे घाट असतात ना कोकणात . म्हणून मी फारशी त्या मार्गावर जातच नाही
आपला हा *पुणे-मुंबई* बोर घाटच बरा.
' हं ' मला तर बाई या आपल्या कोकणातल्या मैत्रिणींच नवल वाटत. कशा एकदम फीट ना . ती *अशोक लेल्यांची* सून माहित आहे ना.
हो ना, नाहीतर आपण. *अमृतांजन पाँईंट ला केंव्हा टाटा* करतो असं होऊन जातं आपल्याला.
 हिरकणी , तो बघ ' *अश्वमेध* ' येतोय, *दादर - पुणे स्टेशन*  , बोलायचं का त्याच्याशी 
" काही नको ग " , तो कुठं आपल्याशी  बोलतो *ग्रुप वर*. तो फक्त  पुणे - दादर - पुणे  शिवनेरींशींच  बोलतो. *आपला ग्रुप त्यानेच बनवून दिला* अन   एकंदरीत  पुणे - दादर -  पुणे ची मक्तेदारी   आपण सगळ्या  ग्रुप मध्ये आल्यामुळे  मोडली गेलीय ना , त्याचे  त्यांना  दुःख आहे ग , लक्ष देऊ नकोस तू . 
बरं बरं, ए आपली
' परळ -  सातारा 'ती नाही ग दिसली ब-याच दिवसात नेहमीच्या वेळेला इथे
अग  ७ दिवसाचा गणपती असतो ना तिच्याकडे  साता -याला. मला म्हणलेली  एक दिवस  पुणे - *सांगली* रूट  करून ये *दर्शनाला* . पण नाही ग जमलं . उद्या परत जॉईन होतीय ती  परळ डेपोत.
 तिने गणपती विसर्जनाचे फोटो पाठवलेले की . नाही पाहिलेस  ग्रुपवर ?
नाही ग , राहून गेलं . पण ही *परळ*खूप *सरळ* हो . किती दमते  बिचारी.   आपण पुण्यापर्यतच जातो ग बिचारीला साता-या पर्यत जाऊन रात्री उशीरा पर्यत परत परळला  यावे लागते. खूपच *हेक्टिक* काम आहे तिचे.
हो ना . कुणाला कधी नाही म्हणत नाही. ग्रुप मध्ये सगळ्यात जास्त *टोल पार्टी* देणारी म्हणून तिचे सगळेच कौतुक करतात . आता उद्या मुद्दाम जरा  जास्त थाबते लोणावळ्याला अन  कंदी पेढ्याचा प्रसाद. तिच्याकडून घेऊनच निघेन म्हणते 
शिवनेरी,  ती बघ ' *यशवंती* ' .हाक मारतीय आपल्याला 
यशवंती , ये  चहा घेऊन जा ..
अग नको  अजून चार चकरा मारायच्या आहेत  लोणावळा ते कार्ला आणि चहा प्यायला  आमचा ऑफीशल थांबा जुना बस स्टॉप , ये ते ग .. भेटू परत केंव्हातरी
कमाल आहे ना या मुलीची.  *केव्हा ही बघा ही आँन लाईन* असतेच. *जवळच्यांची खूप काळजी घेते*, मैत्रीण असावी तर हीच्या सारखी
खरंय ग
ए शिवनेरी , तो बघ तुझा *राजा हिंदुस्तानी* आला '
" *आले का सगळे का कोण राहिलय*"
या आवाजाने मला जाग आली तेंव्हा *ही शिवनेरी आणी समोरची हिरकणी माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसतायत असा भास मला झाला*
तरीही त्यांचा संवाद संपत नव्हता:-
हो हो , चल आज खूप वेळ झाला, आता बोरिवलीला केव्हा पोचणार देव जाणे 
नीट जा ग , सायन पासून पुढे बांद्रया पर्यत प्रत्येक  ९ मिटरवर खोल खडडे आहेत. कंबरडं मोडून जाईल 
हो हो  काळजी घेईन, थॅक्स हं
मोरया  🙏🏼
मोरया 🌺
-------------------------
आँन लाईन प्रतिक्रिया  इथे रिझर्व करा
a.kelkar9@gmail.com
एसटीचे महा *पर्व*  🚎🚌🚎🚌
लोणावळ्याला जमू *सर्व*

Related Posts Plugin for WordPress, Blogger...