नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, November 30, 2019

सूत्रधार


बातमीचा "सूत्रधार तो" ..
( रविवारची टुकारगिरी 📝)


मंडळी नमस्कार  🙏🏻
'मी परत येईन' नंतर गेले काही दिवस सगळ्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती प्रसिध्द झालेली होती  ती म्हणजे

बातमीचा "सूत्रधार" तो, इथे निरंतर न्यूज पाडतो

या सूत्रधाराने सांगितलेल्या किती गोपनीय बातम्या प्रत्यक्षात ख-या निघाल्या हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण यामुळे गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांचा टि.आर.पी  वाढण्यास आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे मनोरंजन होण्यात नक्कीच वाढ झाली हे आम्ही स्वतः या लेखाचे 'सूत्रधार' म्हणून अगदी खात्रीपुर्वक सांगतो 🤓

पण हाच सूत्रधार एकेकाळी अत्यंत विश्वासू असायचा. याचे नियोजन अनेक नाटकांतून दोन अंक जोडताना, भूतकाळात जाताना, कथानक पुढे नेताना, दोन - तीन वेगवेगळ्या घटना एकत्र गुंफताना दिग्दर्शक अगदी खुबीने करायचा.

आठवतीय 'हमलोग' मालिका. प्रत्येक दिवशी मालिका संपली की अशोक कुमार 'सूत्रधार' म्हणून येऊन बोलायचे

एखाद्या कार्यक्रमाचे 'निवेदक' हे 'दिसणारे सूत्रधार' . मात्र असे कार्यक्रम (इव्हेंट मॅनेजमेंट ) पुर्णत्वास नेणारे पडद्यामागचे असंख्य अदृश्य सूत्रधार ही महत्वाचे ठरतात, जे जास्त प्रसिध्द पावत नाहीत.  यात मी "सूत्र शिरोमणी" म्हणून पु.लं च्या 'नारायणाचा' आवर्जून उल्लेख करेन.

 जाता जाता विविध स्नेहसंमेलने, शाळेचे मैत्री मेळावे, कवि संमेलने आणि अशा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे 'सूत्र' संचलन करणा-या सर्व विभूतींची आठवण यानिमित्ताने करणे आवश्यक वाटते.

आरोपींना आम्ही पकडूच पण त्याच्या ' सूत्रधाराला' ही बेड्या ठोकू असे ही आपण वाचतो आणि नंतर विसरतो.

मंडळी , पण अजून एक सूत्रधार आहे बरं जो आपल्या सगळ्यांना कठपुतली बाहुल्यांन प्रमाणे नाचवत आहे. देव, नियती, प्रारब्ध,  कर्म अशी काही वेगळी नावे ही या सूत्रधारास आहेत

यावेळची "ब्रेकींग न्यूज" ( सगळ्यात मोठी बातमी)

आत्ताच आमच्या अंतर्गत सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की प्रस्तुत ( टुकार) लेखकाने जर सन १९९४- ते - १९९७. रासायनिक अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना " सूत्रांचा" योग्य पद्धतीने अभ्यास केला असता तर आज या लेखकावर असा लेख लिहिण्याची वेळ आली नसती 🤪

तरीपण

जीवनगाणे गातच रहावे, 'सूत्र ' धार ते समजून घ्यावे पुढे पुढे चालावे

 📝( सूत्रधार) अमोल
१/१२/१९
poetrymazi.blogspot.in

Thursday, November 28, 2019

लपंडाव


लपंडाव
( रूपकात्मक,  मनोरंजन हा हेतू)

स्वर्गातील इंद्रप्रस्थ तारांगणात कालनिर्णया प्रमाणे गुरु - चंद्रातील लपंडाव एकदाचा झाला.  एकदाचा झाला असं म्हणण्याचे कारण, काही दिवस स्वर्गलोकातील राजकारण शुल्लक कारणाने ढवळून निघाले होते. त्यामुळे हा कार्यक्रम बघायला कुणी जाईल  की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती.

'सिंहासन' माझेच, मलाच, मीच, असे सतत बोलणा-या देवांचा राजा अर्थात देवेंद्र याला छोटीशी अद्दल घडवायची योजना महा ( शिव) देवाने, ब्रह्मा बरोबर आघाडी करून ठरवली होती. त्यानुसार ब्रह्मदेवाने स्वर्गलोकात "पार्वतीपती" वट लागू केली ज्याने  इंद्रदेवांना आपले 'सिंहासन' सोडावे लागले. २७ नक्षत्रातील प्रत्येकी ४ सदस्य असे १०८ जण असताना केवळ १०५ जणच देवेंद्राबरोबर राहिले आणि राहिलेले ३ घे महा- देवांच्या सांगण्यानुसार अलिप्त राहिले.

याकामात महा-देवांचा जवळचा सहकारी 'नंदी' यांनी देवेंद्र यांना गाफील ठेवण्यात मोठी भूमिका बजावली .

तरिपण गुरु- चंद्राचा लपंडाव कार्यक्रम  'करुनच दाखवू' अशी प्रतिज्ञा इतर देवतांनी घेतल्याने नियोजित कार्यक्रम ठरला.

आता आपल्यातरी काय काम आहे म्हणून 'चंपारण्यातील' गणा सह 'अजीत' समजले जाणारे देवेंद्र कार्यक्रमास उपस्थित राहिले.

शरदाच्या चांदण्यात, सोनियाच्या दिनू या कार्यक्रमाचे आमंत्रण अनेक लोकाचे गण, राजे, देवता, दानव या समस्तांना अगदी ममतेने दिले गेले. क्षणभर विरंगुळा म्हणून सगळे जमले.

आणि तो खेळ सुरु झाला. संध्याकाळच्या वेळी रवीने आपली प्रखरता कमी करुन या खेळात रंग भरायला सुरवात केली. 

एकेकाळचा सर्वश्रेष्ठ , कुणाला न जुमानणारा, खंबीर आवाजाचा, ठाम,  निष्ठावान असा *'गुरु'* मनाचा कारक, मानसिकतेचा कारक, भावनांच्या कारक ग्रहाच्या *चंद्रा* मुळे झोकाळला गेला. अदृश्य झाला

रात्रीच्या पुर्वसंध्येला पश्चिम क्षितीजावर रंगलेल्या या खेळाची मजा सर्वांनी अनुभवली

नियोजित वेळेत गुरु बाहेर आला. तारंगणातील ते दृश्य म्हणजे  अलौकिक होते. द्वितीयेच्या चंद्राची कोर आणि खालच्या बाजूस छोटा गुरु.
यातही देवेंद्राच्या भक्तांना हा शत्रूराष्ट्राचा झेंडा फडकवल्याचा भास झाला आणि त्यांनी तात्काळ निषेध व्यक्त करुन गुरु- चंद्रावर 'स्वर्गलोक-द्रोहाचा' आरोप केला.

काही धार्मिक लोकांना धनप्राप्तीचा उपाय म्हणून द्वितियेचा चंद्र बघितल्यावर हिरवा रंग बघायचे असते हे लगेच लक्षात आले.  तिथे हिरवा रंग दिसला नाही म्हणून त्यांनीही निषेध नोंदवला

कार्यक्रम संपला

पण खरा लपंडाव आता सुरु होईल

अर्थात विष्णूलोकातून भगवान विष्णू आणि नारदमुनी सर्व घडामोडींवर बारिक लक्ष ठेऊन आहेत

📝  २९/११/१९
poetrymazi.blogspot.in

Friday, November 22, 2019

बारा मतीत ..मातीत


( चाल: काळ्या मातीत मातीत, तिफन चालते)

बारा मतीत मतीत, तुफान चालते
तुफान चालते,  तुफान चालते
जन थय थय करते, वाघ डोक बडवितो
डोक बडवितो,वाघ डोक बडवितो 🐯🤦🏼‍♂

मोटा भाई हाकारतो,नंदीबैलाच्या जोडीला
संग पाॅवsर चाले जाते बारा मतीला
संधीवर संधी येती, नाते नकोsते होते
मंत्रीपदाच्या इच्छेने, भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते, वाट वाघाची लागते
वाघ लिला पहातो, कमळी सुखाने नांदते

बारा मतीत मतीत, तुफान चालते
तुफान चालते,  तुफान चालते

🌷⏰✌🏻

✋🏻🏹🤦🏼‍♂

📝 अमोल
२३/११/१९
poetrymazi.blogspot.in

Thursday, November 21, 2019

मी परत लिहीन, मी परत लिहीन


' मी परत येईन ' ( एक अराजकीय स्फुटक) 📝

मंडळी नमस्कार 🙏🏻

गेले काही दिवस महाराष्ट्रातील एकंदर सामाजिक स्वास्थ्य ज्या एका वाक्याभोवती फिरत आहे ते वाक्य म्हणजे

मी परत येईन, मी परत येईन, मी परत येईन

हे राजकीय घडामोडी संबंधित वाक्य आहे. पण या वाक्याचा संदर्भ घेऊन काही नेहमीच्या जिवनात नकळत आपण हे वाक्य ( अगदी असंच नव्हे)  कसे वापरतो ते पाहू

मला वाटते याचे बाळकडू आपल्याला अगदी घरातच मिळालेले असते. काही कामानिमित्त आपण बाहेर,दुस-या गावी निघालो आणि 'निघतोय मी', 'जातोय मी ' असं म्हणलं गेलं तर वडिलधा-यांकडून लगेच आदेश येतो  ' मी येतो ' असे म्हणं ( मी परत येतोय)

दुसरे एक वक्री उदाहरण द्यायचे झाल्यास शाळेत मास्तरांकडून दिला जाणारा 'घरचा अभ्यास'/ सुट्टीतील अभ्यास.
 इथे महत्वाचे म्हणजे तुम्हाला जरी  इच्छा नसली तरी तमाम मास्तरांना ( गुरुजी शब्द मला घरचा अभ्यास देणाऱ्यांसाठी वापरायला आवडत नाही , ते मास्तरच 😏) तुम्ही परत येणार आहात याची खात्री असते आणि म्हणूनच ते तुम्हाला घरचा अभ्यास देतात.

टेलिव्हिजनच्या दररोजच्या रटाळ मालिका ही नकळत 'मी परत येईन' असंच सुचवत नाहीत का?
पूर्वी काही खास कार्यक्रम उदा. रंगोली, सुरभी, साप्ताहिकी इ.इ. 'केंव्हा परत येतील' असे वाटायचे.

सिनेमाचा एक भाग पुर्ण करुन ( सिनेमा चाललाच तर) पुढील अनेक भागांची  जुळणी करुन ठेवणे हा ही मला ' मी परत येईन ' चाच भाग वाटतो.

२४ * ७ मनोरंजनात कुठेही कमी न पडणा-या वृत्तवाहिन्या, भेटूया एका विश्रांती नंतर असं जेंव्हा म्हणतात तेंव्हा पुढचे 'मी परत येईन' हे शब्द मला सायलेंट ( अनुच्चारित)  वाटतात.

कबड्डीत आऊट झालेला खेळाडू,  कसोटी सामन्यात पहिला डाव झाल्यानंतर दुस-या डाव खेळण्यासाठी आतूर असणारा खेळाडू,  काही कारणाने संघाच्या बाहेर राहिलेला खेळाडू यांच्या मनात 'मी परत येईन ' असा सुप्त विचार नक्कीच असेल ना?

भांडण झाल्यावर वडीलधारी मंडळी भांडण तात्पुरते सोडवतात त्यावेळी भांडलेल्या व्यक्तींच्या मनातील भाव, आत्ता सोडतोय पण थांब बघतोच तूला😠 ( मी परत येईन)  असाच दिसतो ना?
( Whatsapp वरील वैचारिक कुस्तीत ही हे दिसून येते.  आत्ता उत्तर द्यायला वेळ नाही मला,  मी परत येईन, परत भांडेन )

काही थोडक्यात उदाहरणे,  घरात लग्न कार्य असते काही १-२ गाड्याच असतात त्यावेळी वाहन चालक सांगतो, थांबा तुम्ही इथे, यांना सोडून तुम्हाला घ्यायला 'मी परत येईन ' .

शाळेतील ब-याच दिवसांनी भेटलेली मित्र -मंडळी परत नक्की भेटायचं हा ..! यंदा लोणावळा बरं का !असे ठरवतात तेंव्हा एका प्रकारे ' मी परत येईन ' असेच ना?🤗

अशा अनेक गोष्टी घडत असतात. अगदी दर ३० वर्षांनी शनी महाराज ही न चुकता तुमच्या राशीला १२ वे येतात. जणू ३० वर्षापूर्वी साडेसाती संपल्याच्या आनंदात ' मी परत येईन ' हे त्यांचे वाक्य आपणास ऐकू गेलेले नसते.

अडचणीत सापडल्यावर देव आठवतो. नवस केले जातात आणि ते करताना माझे अमुक तमुक काम झाले तर मी येऊन नवस फेडेन ( म्हणजेच मी परत येईन)  अशी लाच ही दिली जाते.

मंडळी , लेख आवरता घेतो. तुम्हाला आवडला, नाही आवडला,अवश्य प्रतिक्रिया द्या.टिका सुचनांचे स्वागतच.

तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनावर
मी पुन्हा लिहीन, मी पुन्हा लिहीन, मी पुन्हा लिहीन 🙏🏻😌

अवांतर:-
मी परत येईन - असे न म्हणणाऱ्यांसाठी

लहान मुले ( अगदी पक्षांचीही) एकदा बाहेर गेली खेळायला, की परत यायचे नाव काढत नाहीत. मग त्यांची अशी समजुत काढावी लागते

या चिमण्यांनो परत फिरा रे. ..

📝 अमोल
poetrymazi.blogspot.com
२२/११/१९

Wednesday, November 20, 2019

महा राष्ट्राs ची घडी परत लागू दे


मुळ गाणे: जीवनात ही घडी अशीच राहू दे

मुळ विडंबन: शांता लागू, पणजी
 ईश्वराची ही कृपा अशीच राहू दे, येणारी नवी सखू नीट नांदू दे

विडंबनाचे विडंबन अर्थात
आमचा राजकीय झब्बू 😬 🃏
( निव्वळ मनोरंजनासाठी )

हे देवेंद्रा,

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे
येणारी वसंत-सेना
सुखाने भांडू दे

काल गेली पाहुनिया 'वर्षा' बंगला
तो(च) बदला काढितसे मस्त चांगला🌷
बहुमताच्या आकड्याची
हौस भागू दे ।

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे

'शहा'ण्यास वठणीवरी तीच आणू दे
'मी परत येई न ' चे 'वाक्य स्मरु दे
आयत्या बिळा वरीच 🐍
रोटी लाभू दे ।✋🏻

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे

मुंबईत येतील गं खूप पाहुणे
मौजमजा खानपान फक्त बोलणे
अतिथींची सरबराई
दहात होऊ दे 😋

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे

दुस-या पार्टीत जाण्या सोस आगळा
लढुनिया हरतो मी, आज मोकळा
थकुनिया येता मम
"नमो " म्हणू दे 🙏🏻

म्हाडाची लाॅटरी हवी, सिडकोचे काम
सामन्यातून शिकवू आम्ही साम,दंड,धाम
इटलीच माझ्यावरी
पाळत ठेवू दे ...! 🧐

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे
येणारी वसंत-सेना
सुखाने भांडू दे

📝 २१/११/१९

Saturday, November 16, 2019

जरा युतीचे, जरा आघाडीवर बोलू काही


संदीप ची ( खरंच) माफी मागून

जरा युतीचे, जरा आघाडीवर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत मंत्री तोवर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

'सामना' पाहून टिव्हीवर कुरकुरला पो-या
मिटले नाहीत 'वाद' तोवर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

हवेहवेसे मंत्रीपद जर हवेच आहे
नकोनकोसे गुप्त संभाषण बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

उद्या उद्याची किती काळजी मंत्रालयातून
सत्ता आहे विरोधा नंतर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

(अ)पक्ष असू दे हाता मध्ये काठी म्हणूनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

जरा युतीचे, जरा आघाडीवर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

📝१६/११/१९

Tuesday, November 12, 2019

ब्लँक काॅल


*संदीप खरेंची* एक खूप छान कविता
 'ब्लँक काॅल '  सध्दयाच्या
 *राजकीय पार्श्वभूमीवर* थोडी बदलून 📝😌
------------------------------------------
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही कुणी *समानते* वाणी
*पदा* एवजी रहातं फक्त डोळ्यामधे पाणी

कळताच मलाही मग थोडंस काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
*युतीच्या वाटेतून* शांतता वहाते
खूप खूष वाटून अजून काही सांगते

पूर नि शेतं नि वा-याची गिरकी
निसर्गाने सा-यांची घेतलेली फिरकी
*कमळीवर* काढलेली *बाणाची* चित्रं
" *तुझ्यापुढे मी खोडलेला मित्र*"

*पत्रकार परिषदा* रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून *शहा* ण्यासारखे वाग
*कमवायचे* ढीगभर लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून

*पार्कातले* झाड आणि *मातोश्रीचा* पार
थंडीमधे *मुंबईत* उन्हाची धार
काॅफी घेऊन *नागपूरला* बोलायचे कडू
*भाषणात* पहायचे येते का रडू

माणूस आहेस "गलत" पण मागतोस "सही"
पावसात भिजलेले *नेते*  व ही
पुन्हा नीट नव्याने लिहित का नाहीस?
काय. ..  रे *वेळेवर* आठवतय का नाही?
शब्दसुध्दा नाही तरी कळे असे काही
हातामधला *हात* सुध्दा इतकं बोलत नाही

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठी खोल दुखलेलं रक्त
*वेळजाते* निघून थरथरतो *हात*
*राष्ट्रपती राजवटीची क्षणांवर मात*

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण

📝 अमोल
१३/११/१९
poetrymazi.blogspot.in

Wednesday, November 6, 2019

पाळणा हलला, पाळणा हलला


ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून मातोश्री चरणी अर्पण 🙏🏻

( चाल : *मोगरा फुलला*)
हेतू: अर्थातच येणारी *गोड बातमी* (मनोरंजन)
🏹🌷

पाळणा हलला, पाळणा हलला
सत्ता बघता जवळी कमळीचा झाला

इवलेसे पोर जिंकियले द्वारी
त्याचा वेलु गेला वर्षाsवरी
पाळणा हलला, पाळणा हलला
सत्ता बघता जवळी कमळीचा झाला

आकड्यांच्या गुंती,मनगुटीवर शेला
बाप बारामतीवरी मातोश्री अडला.

पाळणा हलला, पाळणा हलला
सत्ता बघता जवळी कमळीचा झाला

📝७/११/१९
#गोड बातमी लवकरच

Monday, November 4, 2019

युती आघाडी , मौज त्यांना वाटे भारी


🏹🌷 खेळ मांडला ✋🏻⏰

मुळ गाणे : पडू आजारी, मौज हीच वाटे भारी
( विडंबन हेतू: निव्वळ मनोरंजन)

युती आघाडी , मौज त्यांना वाटे भारी

टांगत ठेवणे मग सत्येला
मुख्य - मंत्री यांचाच नटला
म्याॅऊ, म्याॅऊ प्राणी गुरगुरायला
चैनच सारी॥ मौज हीच ठरणार भारी

मिळेल थाळी, दहाला अण्णा
पाच घेऊन आला श हाणा
संत्री, साखर, लिंबू आणा
जा बाजारी! मौज आमची होणार भारी

भवती रिपोर्टरचा मेळा
दंगा थोडा जरी कुणी केला
मी कावुनी सांगेन तयाला
जा बाहेरी 👉🏼
मुख्य मंत्री आमचाच भारी

आमची 'आघाडी' पण गोड
अजून कण्हती का नेते शूर?😉
कशाला गोष्टी आजी - माजी
म्हणून विचारी !!

संधी हिच वाटे भारी ✌🏻

युती आघाडी , मौज त्यांना वाटे भारी

📝५/११/१९
poetrymazi.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...