नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, September 7, 2026

आवाज हा, आवाज हा


 


Tuesday, September 1, 2026

Dj vs बापट


 


Monday, August 3, 2026

माझी_फुसकुंडी 📝



 

Saturday, August 1, 2026

शिव्या


 *शिव्या*🗣️


पु. ल नी आपल्या अनेक व्यक्तिमत्वाच्या तोंडी टिपिकल शिव्या दिल्या होत्या.  


अरे xxxx 

अरे xxx 


अनेकांनी त्या गोड मानून घेतल्या. विनोद निर्मिती बरोबरच त्याकाळातील लोकांचे खरे व्यक्तिचित्र त्यांनी उभे केले होते 



आज ही आमचा पुण्याचा सुसंकृत मित्र आम्हाला भेटला की सुरवात 

अमल्या xxxx, xxx ने करतो 😝

( फक्त ते सार्वजनिक नसतं/होत नाही )


शिव्या दिल्या जायच्या, देत आहेत, दिल्या जाणार 


आमची  X जनरेशन आता  Z पर्यत अपग्रेड झाली आहे

( *यातला सायलेंट Y फक्त X वाले ओळखू शकतात* 😬)  काळाच्या ओघात अपग्रेड होता होता या शिव्यांचे, शब्दांचे 

*बाजारीकरण* या Z वाल्यानी प्रमाणबाहेर केले आहे. 

(कदाचित ही त्यांच्या काळाची गरज असेल???)


त्यांचे व्यक्तिमत्व काहीस असे झाले आहे :-

*शिव्या द्याव्यात, शिव्या सारख्या* 

*नकोत नुसत्या फुल्ल्ली* (xx)

*याच विचाराने पुढे जातायत*

*जनरेशन 'Z' च्या मुल्ली* 


मी शिव्या दिल्या नाहीत, मी शिव्या खाणार नाही असा 'टिळक' बाणा असलेली व्यक्ती सध्या भेटणे जरा दुर्मिळच नै.


( आयुष्यभर 'X' गृहीत धरून त्याच पिढीचे प्रतिनिधित्व करणारा, आणि सगळीकडून शिव्या खाणारा ) 

अमोल 📝



शनिवार 

1/08/26


टीप : लेखक स्वतः Z जनरेशन चा नसल्याने चित्रात AI ने ब -याच सोबर शिव्या लिहिल्यात 🤪

Monday, July 27, 2026

जेन झी


 संत तुकारामांची माफी मागून 🙏


जेथे जातो तेथे 'जेन झी' दिसती 

घालवसी मंत्री महोदया !


'विरो- धका ' आहे  तुझाची आधार!

घेतलासी भार सर्व त्यांचा!!


बोलो आता 'झुरळ ' करिसी ते "नीट"!

गेली लाज थेट, सर कारा!!


अवघे ते जन, आठवले लोकपाळ!

सोईरे जंतर - मंतरलेले!!


फुसक्या म्हणे आता पाहतो कौतुके!

इथे- नॉल इंधने अंतर्बाही !!🔥


माझी_फुसकुंडी 📝

27/07/26

Thursday, April 30, 2026

मिसींग लिंक


 



Tuesday, April 28, 2026

मिसिंग लिंक


 


Sunday, January 25, 2026

फुसकुंडॊ


 


Friday, January 23, 2026

एक 'सायकल' द्या मज आणूनी


 

पुण्यात झालेली जागतिक सायकल स्पर्धा आणि त्याचे पुणेकरांनी केलेले गोड ( चितळे अंबा बर्फी पेक्षा गोड) कौतुक पाहून / वाचून आम्ही भारावून गेलो आणि म्हणावेसे वाटले


एक 'सायकल' द्या मज आणूनी

चालविन मी जी स्व-पायाने

पालथी घालून सगळी पेठे

दीर्घ जिच्या त्या घंटीने

अशी सायकल द्या मजलागुनी


चमत्कार पुण्य नगरीतुनी

सुंदर सोज्वळ रस्ते मोठे

पलिकडले ते सगळे खोटे

म्हणती धरूनी ढेरी पोटे

घेऊन सायकल येतो फिरुनी


गतीचे वाजवूनी अवडंबर

स्पिडगनाचे असती अडथळे

विसरुनिया जे जातात खुळे

न-वले पूल जेथे न टळेल

कर्म होतसे तेथेच स्थिर


प्राप्तकाल हा विशाल धूसर

सुंदर रस्ते तयात खोदा

नियमाने त्यावरती नोंदा

पोल्यूशनचा चेंदामेंदा

विक्रम काही करा चला तर


एक 'सायकल' द्या मज आणूनी


( सायकलसूत)  अमोल 

#माझी_फुसकुंडी 📝

२४/०१/२६

Related Posts Plugin for WordPress, Blogger...