नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, June 27, 2016

गोल हुकला ग सखी गोल हुकला


प्रभूश्रीराम , गदिमा  आणि तमाम फूटबॉल  प्रेमींची  माफी मागून












( चाल : राम जन्माला ग सखे , राम जन्माला ) 
संकल्पना : अमोल केळकर 

जेष्ठ मास त्यात कृष्ण सप्तमी ही तिथी 
वर्षायुक्त  तरीही आज घाम हा किती 
आज पहाटे का ग मेसी असा वागला 
गोल हुकला ग सखी गोल हुकला 

पेनल्टीसाठी जणू  पुढेच धावणे 
निघून जाता  चेंडू मग खेळ संपणे 
अर्जेंटिना संघ  मग खेळ हारला 
गोल हुकला ग सखी गोल हुकला 

वार्ता ही दुखद आधी पोचली जनी 
खेळातून त्या निवृत्ती घेतली मनी 
चिलीचा संघ आज खुश जाहला 
गोल हुकला ग सखी गोल हुकला 

---------------------------------------------------------
मूळ गाणे : - 

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !
दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?
राम जन्मला ग सखी राम जन्मला


कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला

Saturday, June 25, 2016

तिथे युतीची वाट लागते


आज पहिल्यांदाच एवढे  SMART   विडंबन सुचले 
( चाल : जिथे सागरा धरणी मिळते , तिथे तुझी मी वाट पहाते )

संकल्पना : अमोल केळकर 
-------------------------------------------------
जिथे भाजपाला सेना भीडते 
तिथे युतीची वाट लागते 

भांडण दोघात नित्यच  घडते 
धावून येतील जोशी सर ते 
विवेकी -सामना करुनी यांचे हीत सदैव कुरकुरते 
तिथे युतीची वाट लागते 
सामना पाहून सर्व दमले 
मत दान ते कशाला  केले 
गर्वाचा उल्हास  अंगात येउनी मनोगत तिथे दिसू लागते 
तिथे युतीची वाट लागते 

बघुनी सत्तेची खुर्ची ती 
परत युतीत गर्मि दिसती 
हेवेदाव्यांची जेथे  सारखी राजकारणा घोर लागते 
तिथे युतीची वाट लागते 


---------------------------------------------
मूळ गाणे 

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहते

डोंगर-दरिचे सोडून घर ते
पल्लव-पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे प्रीत नदीची एकरुपते

वेचित वाळूत शंख-शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते

बघुनी नभींची कोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते


Tuesday, June 21, 2016

एका पावसात सर्वानी अडकायचं


आज सकाळपासून  आमची जीवन वाहिनी अडकली आणि आम्ही या गाण्यात  कसे अडकलो कळलंच नाही  


मध्य पश्चिम हार्बरने जायायच 
एका पावसात सर्वानी अडकायचं 

तशी दिसेना लोकल केंव्हा  पासून 
गर्दी जाहली ठाण्याला तेंव्हापासून 
आता तिकीट कशाला काढायचं 
एका पावसात सर्वानी अडकायचं 

वाशी लोकल लागेल स्टेशनाला 
तेंव्हा  शोधूया जागा शिरायला 
हात सोडून तसेच सावरायचं 
एका पावसात सर्वानी अडकायचं 

गाडी हळूहळू व्हीटीला जाईल निघून 
माझ्यानोकरीच ठिकाण येईल दिसून 
टाइम टेबल नवीन करायचं 
एका पावसात सर्वानी अडकायचं 


अमोल केळकर 

मूळ गाणे 


गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं

तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगांत सांकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं

खुळा पाऊस डसेल सर्वांगाला
आता नको किनारा आवेगाला
धुंद धारांच्या रानात घुसायचं


गाणं मनातलं पावसात येईल फुलून
तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून
बीज नवीन गाण्याचं पेरायचं

Thursday, June 16, 2016

काजवा. .


सध्या  Whatsapp  वर सगळ्या ग्रुप मध्ये लखलखाट वाढल्याचे दिसत आहे.  याला कारण ठरत आहेत   भंडारद-या जवळ चमकणारे तारे  आणि त्यांचे सतत येणारे फोटो 
मग काय  आमच्या मनाने डोक्याला  सांगितले  जरा खा(का)जवा की …। 
अन लख्ख काजवा  चमकला 
 
( चाल : गारवा  )
------------------------------------------------------------------

काजवा. . दरीखो-यातून  ग्रुप वर येत असे रोज नवा 
जिथे….   तिथेही  काजवा  जुना  नवा 
ग्रुपवर फोटो येतील तयांचे
रोजचे दर्शन भरून घ्यायचे 
डाऊनलोड भर भर करा काजवा पुन्हा नवा 
जिथे…   तिथेही  काजवा  जुना  नवा 

घरात सारे मिळूनी पहारे 
मेमरी सारी विसरून जारे 
मोबाईल वर वर खाली  दाखवा  पुन्हा नवा 

जिथे…   तिथेही  काजवा  जुना  नवा 

अमोल 
--------------------------------------------------
मुळ गाणे :
गारवा वार्‍यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा
प्रिये….  नभांत ही चांदवा नवा नवा

गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सर सर सर काजवा नवा नवा

प्रिये…. मनातही ताजवा नवा नवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा

Sunday, June 5, 2016

छाता दिसे कुणाला


७ जून म्हणजे रवीचा ' मृग' नक्षत्र प्रवेश ठरलेला,

 त्याचा आधी आमची लगबग नेहमीचीच
( चाल: काटा रुते कुणाला)


छाता दिसे कुणाला शोधीत आज कोणी
मज छिद्र ही दिसावे हा वर्षायोग आहे

पाहू तरी कळेना कळ आतल्या दांड्याची
गंजलेल्या ता-यांचा मज शाप आज आहे

तरी उघडू पहातो निघतोच विंचू तेथे
माझे उघडणेही विपरीत होत आहे!

हा घोळ, संपेना की छत्रीही उघडेना
टाकुनी दारामागे मी  भिजणार मस्त आहे

©अमोल केळकर
-----------------------------------------
मुळ गाणे:  -

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे !

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !

हा स्‍नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !

*******************************
Related Posts Plugin for WordPress, Blogger...