नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, December 22, 2015

शेपटीवाल्या प्राण्यांची


तुम्हाला माहितच आहे खुप पूर्वी जंगलात  शेपटीवाल्या प्राण्यांची सभा  भरली होती.
आता सध्याच्या आधुनिक जंगलात ही परत सभा झाली, काय झालं त्या सभेत ऎकायचंय?
ऎका

शेपटीवाल्या प्राण्यांची परत भरली सभा,
पोपट झाला अँडमीन अन मधोमध उभा.
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो,
देवाघरची लूट, देवाघरची लूट !
तुम्हां-आम्हां सर्वांना " व्हाट्स अपचा ग्रुप"
या ' ग्रुपचे 'कराल काय ?"

गाय म्हणाली, "अश्शा, तश्या मेसेजने मी वाढवीन आशा."

घोडा म्हणाला, "ध्यानात ठेवीनन, ध्यानात ठेवीन
मीही माझ्या मेसेजने, असेच करीन, असेच करीन,"

कुत्रा म्हणाला, "खुशीत येईन तेव्हा, स्माईली पाठवीत जाईन"

मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेव्हा ग्रुपच सोडीन, ग्रुपवर सोडीन"

खार म्हणाली, "मिळेल संधी तेव्हा माझ्या मेसेजची मलाच बंडी."

माकड म्हणाले, "कधी फाँर्वड, कधी एडीट, मेसेजची मी उडवीन खिल्ली"

मासा म्हणाला, "मेसेज म्हणजे जीव की प्राण , जीव की प्राण
वाचत  राहीन प्रवासात, वाचत राहीन प्रवासात."☺

कांगारू म्हणाले, "माझे काय ?"
"तुझे काय ? हा हा हा !
" मेसेज" म्हणजे कळतंच नाय."

मोर म्हणाला, "एक एक मेसेज धरीन, मी धरीन
उपदेशाचे डोस छान मी देईन."

पोपट म्हणाला, "छान छान छान !
देवाच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या ' ग्रुपचा 'उपयोग करा."

"नाही तर काय होईल ?"

"दोन पायाच्या माणसांगत, प्राण्यांचा ग्रुप भांडत राहील."

"जंगलातील मैत्रीचे अनोखे पर्व, सोबतीला प्राणी सर्व "

काल्पनिक
संकल्पना : अमोल केळकर 

Thursday, December 17, 2015

बाजी


झाली असेल तुमची जर
असहीष्णूवरची  काव काव
लक्ष द्या दिलवाले  इकडे
 बाजी आम्हीच जिंकणार राव

अमोल केळकर
१८/१२/१५

Monday, November 23, 2015

पिंगा


(काल्पनिक )
कुठे तो महाभारतातला संजय ज्याने आपल्या दूरदृष्टीने  रणांगणावरची इत्यंभूत माहिती धुतराष्ट्राला दिली आणि कुठे हा कलीयुगातला संजय जो अगदी लीलया इतिहास बदलून रुपेरी पडद्यावर दाखवण्याचा अट्टहास करत आहे.. . 
आज जर  विश्रामपूरचे राजे असते ( बरोबर कट्यार वाले …. )  आणि म्हणाले असते , 
उठा कविराज अमोल , ही घ्या लेखणी ,  एक चारोळी  माफ तुम्हाला . होऊन जाउद्या , अशी  चारोळी  करा की काळजात घुसली पाहिजे :)

होय सरकार …ही घ्या…। 

काशीबाई म्हणाली मस्तानीला 
वाड्यात घालू दोघीजणी  पिंगा  
नाहीतर बाजीराव मागत बसतील 
त्यांच्या आवडत्या भाजक्या शेंगा  

वाट बघत काशीबाईंची 
मस्तानी राहिली बसून 
संजय भन्सालीच्या  पिंगाने 
लोकांनी घेतले हसून

:) :) :) :) 

Saturday, October 24, 2015

बाई अन राम


जीवनात ज्यांना काही 
उरले नाही काम 
त्यांचा मुखी नित्य 
शांताबाई अन शांताराम 

अमोल
२४/१०/१५

Tuesday, October 20, 2015

चला हवा येऊ द्या


 " चला हवा येऊ द्या "मधे , आले होते कवी 
चार ओळी मागे लागल्या , तुलाही  यायला हवी 

सगळ्यांना बरोबर घेऊन मी  पाहिले रंगबिरंगी कोट 
बघूया आता याने तरी  भरेल का आपले पोट 


( शिकावू  कवी )  अमोल  केळकर 
२१/१०/२०१५


Saturday, May 30, 2015

तनू वेड्स मनू



तनू वेड्स मनू . . 

सगळा भारत . . 

आनंदलाय

जणू . 

Sunday, May 24, 2015

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो माझा ....सिनेमा कुणी पाहिला....


आज मी एक सिनेमा पाहिला
" अगं बाई! "
अरे यात 'अगं बाई 'करण्यासारखे काय आहे, हो आणी मराठी सिनेमा होता तो .
"अरेच्या "!
अरे, म्हणजे काय? मराठी माणूस आहे, मराठी सिनेमा पाहणारच की
आणी आता त्यावर माझे परिक्षण लिहितो आहे
"२ रे "
हुश: ! झालं एकदाच टायटल तयार
"अगं बाई! अरेच्या २ "
एकदमच कसही करुन जुळवून आल्यासारखं झालयं ना, सिनेमाचंही अगदी तसंच झालय, विशेषत : केधार शिंदे आणि पहिला सिनेमा यांची पार्श्वभूमी असताना.
साधारण पणे कुठल्याही सिनेमाचा भाग -२ म्हणजे भाग -१ चा काहीतरी उल्लेख, रेफरन्स असतोच, अपवाद हा सिनेमा. त्यामुळे या सिनेमाचा भाग -२ असे नाव न ठेवता काही वेगळे नाव दिले असते तर ते जास्त संयुक्तीक ठरले असते. भरपूर विनोद, गावाकडली माती, मन उधाण वा-याचे हे बाहेर ठेऊनच सिनेमा पाहणे
लहानपणी आपण ऎकलेली गोष्ट एक राजा असतो आणी तो ज्या गोष्टीला हात लावेल ते सोने होतं असत, या सिनेमाची ही अशाच प्रकारची कथा

प्रेम. - स्पर्श - अपघात
मुख्य नायिका शुभांगी (सोनाली कुलकर्णी)
लहानपणापासून (हो अगदी शि - शू वर्गात असल्यापासून) अगदी लग्नाच्या दाखवण्याच्या कार्यक्रमांपर्यंत, ज्यांच्या प्रेमात पडते आणी त्यांना स्पर्श करताच ते( प्रेमवीर) २४ तासाच्या आत डोक्यावर पडतात ( त्यांना अपघात होतो) .
मग ती लग्न न करायचे ठरवते
(आता परत इथे मंगळ, शनी, गुरु, अष्टम स्थान, शांती करुन ही लग्न जमत नाही असे दाखवून जोतिष शास्त्राला बदनाम केले आहे, अरे त्या शुभांगिनेच ठरवले होते की लग्न करायचे नाही म्हणून, मग कशाला रे आमच्या मागे लागायचे, असो)
मग तिच्या आयुष्यात एक लेखक येतो ( चला लेखकाला तरी बरे दिवस येवोत ...)
आणी मग उत्तरार्धात परत
"प्रेम - स्पर्श - अपघात- आनंद"
आजकालच्या सिनिमात आवश्यक असणा-या सर्व गोष्टी आहेत जसे उकळणारा चहा (हो तो आवश्यक्ता झालाय) , प्रेम गीत, पाहुणे कलाकार आणि हो आजकाल मराठी सिनेमात भेटणारी माऊली, माऊली , माऊली म्हणजे पंढरीचा राजा
असो, अगं बाई अरेच्चा १ या सिनेमाने प्रेरीत होऊन हा सिनेमा पहायला जाणार असाल तर तुमची मर्जी........
बाकी सोनालीताईंविषयी आम्ही पामराने काय बोलावे, छानदिसल्यात त्याहीपेक्षा छान अभिनय केलाय, फक्त सिनेमातील एका प्रसंगात शॅंपेन पिऊन ताईंनी केलेला अभिनय फारसा रुचला नाही.
यातील मला एक गाणे खूप आवडले (माझ्या अनुदिनीत ऎकू शकालwww.kelkaramol.blogspot.in)
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो माझा
देव कुणी पाहिला
सावळी, विठाई, कान्हाई, कृष्णाई
काही दिवसानी केधार शिंदे साहेबांनी हे गाणे म्हणले नाही म्हणजे मिळवले
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो माझा
सिनेमा कुणी पाहिला....
शुभेच्छा

डोक्यावर न पडण्यासाठी
आणि सिनेमाही न पडण्यासाठी

Wednesday, March 18, 2015

शायरी


राम राम पाव्हनं !
राम राम , राम राम 

लेखणी, " शब्द "  घेऊन ये पाव्हण्यासनी 

नगं ..........

अवं , जोतिषाने  भविष्य सांगायला अन कवी ने कवितेला नग म्हणू नये । 

व्हय पण आम्ही  फक्त चारोळीच घेतो 

अन आम्ही काय 'शायरी ' वगैरे  घेतो होय , आम्ही  बी आमच्या आबा आज्जा पासनं   चारोळीच घेतो  …। 
असं म्हणता व्हय,  मग होऊन जाऊ द्या 
-----------------------------------------------
चार ओळी म्हणाल्या येता येता 
तू ही कर एका छान शायरी 

( शब्द म्हणाले मुळीच नको …. )

वेडा होऊन  जाण्या पेक्षा 
बरी आहे त्याची आहे ती पायरी …… 

तरीही म्हणाल्या चार ओळी 
भाषांतर कर शायरींचे 
गगनाला भिडणार आहेत  भाव 
यावेळी हापूस - पायरीचे 

( नि:शब्द )  अमोल 

Thursday, March 12, 2015

गुढीपाडवा २१ ला आहे, २२ ला नाही


अरे या गुगल बाबाला  सांगा रे कुणी तरी , गुढीपाडवा  २१ ला आहे, २२ ला नाही 

Tuesday, February 10, 2015

स्वच्छ दिल्ली


कालच्या  लाटेपेक्षा 
मोठी आली त्सुनामी 
विरोधकांना बोलायला 
मिळाली संधी नामी 

' झाडू 'न केले अभियान 
स्वच्छ  केली  दिल्ली 
संधी मिळाली सर्वांना 
आयती उडवण्या खिल्ली 


आपला  आम आदमी 
अमोल केळकर 

१०/०२/२०१५

Monday, February 9, 2015

आम आदमी पार्टी


सुकलेल्या कमळांना 
झाडूने केले साफ 


दिल्लीमध्ये जिंकून 
आले आहे आप 

अमोल केळकर 
१०/२/१५

Wednesday, January 7, 2015

मंगळयान आणि पृथ्वी


मंगळयान आणि पृथ्वी मध्ये 
आला आहे रवी 
चार ओळींना घेऊन लगेच 
सरसावला हा कवी 

स्वयंभू झाले मंगळयान 
हाती आला कंट्रोल 
नशीब अजून अवकाशात 
भरावा लागत नाही टोल 

(कवी) अमोल केळकर 
८/१/२०१५

Tuesday, January 6, 2015

टोल मुक्ती


विसरून गेले सगळे 
करायची टोल  मुक्ती 
निवडणूक जिंकण्यापुरती
होती ती एक युक्ती 


अमोल केळकर 
६/१/२०१५
Related Posts Plugin for WordPress, Blogger...