नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, August 27, 2022

सादर करितो कला गजमुखा ( भाग २)


 सादर करितो कला गजमुखा ( भाग २)


मंडळी, मोरया 🙏


तुला जे येतयं त्यापेक्षा वेगळं काय करायला आवडेल असं कुणी विचारलं तर मी सांगेन की मला संधी मिळाल्यास गणपतीची मुर्ती स्वतः बनवून तीची भाद्रपद शु. चतुर्थीला विधिवत प्रतिष्ठापना करायला आवडेल.


आजकाल अनेक जण स्वहस्ते श्री गणेश साकारतात. काय छान बनवतात सगळे जण बाप्पांना. प्रत्येकाच्या मनातील बाप्पांचा छान आविष्कार त्यांच्या कलाकृतीत उमटतोच. ही एक अनोखी देणगी त्यांच्याकडे आहे याबद्दल मला त्यांचा खरोखरच हेवा वाटतो. ही मुर्ती बनवताना त्यांचे अनेक तास/ दिवस जात असणार. हा प्रत्येक क्षण ते कसे अनुभवत असतील? कलेतून  परमेश्वराची सेवा करण्याची  ही एक मोठ्ठी संधी आहे असे मला वाटते


चित्रकला आणि हस्तकलेशी ( शिल्पकला तर फार लांबची गोष्ट)  तसा आमचा संबंध दुरचाच. शाळेत असतानाही या गोष्टींचा कंटाळा. म्हणूनच  रांगोळी, इतर हस्त कला किंवा चित्राद्वारे गणेशरुप सादर करणारे आमच्यासाठी अवलियाच.


अनेक समूहातुन, सोशल मिडियावर आता अशा अनेकांच्या बाप्पांचे दर्शन घेण्यास आम्ही उत्सुक आहोत यात शंका नाही.


शुभारंभीया

 करितो तुजला

वंदन हे 

गजवरा 🙏🌸


अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

Wednesday, August 24, 2022

अरे खोक्यामधी खोका


 आमच्या बहिणाबाईंनी 'खोपा' अजरामर केला

आणि महाराष्ट्रातील आमदारांनी 'खोका'🎁


बहिणाबाईंची क्षमा मागून *

( *मनोरंजन हा हेतू)


अरे खोक्यामधी खोका

कमळीणीचा चांगला

सत्ता बदलासाठी तिनं

खोका आसामी ठेवला


बंड घातले खोक्यात

'ओक्के ' म्हणूनी चांगला

एक एकासाठी तिनं

खोका जपूनी ठेवला


कमळी ग कमळी ग

कशी माझी ग चतुर

तिले जुम्ल्याचा सांगती

मिये गण्या गंप्या नर


खोका घेतला घेतला

पायरीवरती ठोसा

आम-दारी कारागिरी

आज देख रे माणसा


दर वेळेची ही गोष्ट

तोच नेता, तोच वाॅर्ड

पुढील वर्षी जोमानं

फोफावेल हीच किड


अमोल 📝

२४/०८/२२

Saturday, August 6, 2022

दिवस पुढे हे ढकलायचे


 https://youtu.be/jvBAie-X3OA


कमळी आणि तिच्या नवीन मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा *

( * राजकीय- मनोरंजन हा हेतू)


 मुळ चाल - दिवस तुझे हे फुलायचे,झोपाळ्यावाचून झुलायचे


दिवस पुढे  हे ढकलायचे 

तारखा पाहून झुलायचे


दिल्लीला रात्रीत जाणे

तिथेच भेटती 'शहा'णे

पदांना मोकळे ठेवायचे

( तारखा पाहून झुलायचे)


बघून नेत्यांची झोळी

धाडावी 'इडी'स भोळी

बाणाला धनुष्य लावायचे

( तारखा पाहून झुलायचे )


बघावे डोंगुर फार

सोसेना झाडांचा भार

शब्दांनी जखमी करायचे

( तारखा पाहून झुलायचे )


देणे न घेणे कशाशी

 घेऊ दे शपथ जराशी

कमळीला पाहून भुलायचे 🪷


दिवस पुढे  हे ढकलायचे 

तारखा पाहून झुलायचे


अमोल केळकर 📝

poetrymazi.blogspot.com

Related Posts Plugin for WordPress, Blogger...