सादर करितो कला गजमुखा ( भाग २)
मंडळी, मोरया 🙏
तुला जे येतयं त्यापेक्षा वेगळं काय करायला आवडेल असं कुणी विचारलं तर मी सांगेन की मला संधी मिळाल्यास गणपतीची मुर्ती स्वतः बनवून तीची भाद्रपद शु. चतुर्थीला विधिवत प्रतिष्ठापना करायला आवडेल.
आजकाल अनेक जण स्वहस्ते श्री गणेश साकारतात. काय छान बनवतात सगळे जण बाप्पांना. प्रत्येकाच्या मनातील बाप्पांचा छान आविष्कार त्यांच्या कलाकृतीत उमटतोच. ही एक अनोखी देणगी त्यांच्याकडे आहे याबद्दल मला त्यांचा खरोखरच हेवा वाटतो. ही मुर्ती बनवताना त्यांचे अनेक तास/ दिवस जात असणार. हा प्रत्येक क्षण ते कसे अनुभवत असतील? कलेतून परमेश्वराची सेवा करण्याची ही एक मोठ्ठी संधी आहे असे मला वाटते
चित्रकला आणि हस्तकलेशी ( शिल्पकला तर फार लांबची गोष्ट) तसा आमचा संबंध दुरचाच. शाळेत असतानाही या गोष्टींचा कंटाळा. म्हणूनच रांगोळी, इतर हस्त कला किंवा चित्राद्वारे गणेशरुप सादर करणारे आमच्यासाठी अवलियाच.
अनेक समूहातुन, सोशल मिडियावर आता अशा अनेकांच्या बाप्पांचे दर्शन घेण्यास आम्ही उत्सुक आहोत यात शंका नाही.
शुभारंभीया
करितो तुजला
वंदन हे
गजवरा 🙏🌸
अमोल 📝
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment