नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, July 26, 2017

SAP डे


SAP डे 🐍💐
आज सकाळी ७ वाजता राक्षस नगरीत पोचताच तडक आम्ही मोहजालरुपी संगणक दालना पाशी पोचलो.
'परवलीच्या शब्दाची पुंगी बरोबर' वाजली तरच आत सोडू असा सज्जड दम मिळाल्यावर एकदाचा कळफळकाचा पियानो बरोबर वाजवून आत नगरीत प्रवेशलो.

असंख्य SAP च्या खिडक्यांपैकी नेहमीचा आमचा contract असणारी खिडकी VA41 वाजवली.
लगेच आमचा दोस्त फणा काढून उभा. त्याला SAP डे च्या शुभेच्छा देऊन नेवैद्य दाखवण्यासाठी दूध, लाह्या यांचा FG item code,  quantity, rate, valid from to valid till आणी इतर हळद, कुंकू, फुले यांचा सोपस्कार पार पाडला आणी तथास्तु *सेव्ह रहा* असा आशीर्वाद मिळवून आमचा SAP 🐍 प्रणालीचा  आजचा पहिला contract तयार झाला.

नगरीच्या राजाने ताबडतोब contract वर शिक्का मारुन जनतेत प्रसाद वाटायची अनुमती दिली.
आजच्या SAP पंचमिनिमित्य किमान ३२ contract करून मगच घराकडे शिरा(ळा) यचे असा पण SAP 🐍चरणी अर्पण करतो आणि डसा डसा कामाला लागतो

📝 २७/७/१७
S A P प्रेमी 🐍🐍💐💐

नागपंचमीच्या शुभेच्छा
फेकलेलेसापळे SAP टिम


भाजी मंडई



( चाल: गाडी सुटली, रुमाल हलले)
गद्य:-
भाजी रुसली, वांग सुकले
क्षणात ओले कांदे आले
भाजी रुसली, पडले चेहरे
भूक भागाया नमते झाले
भाजी रुसली, हाता मधूनी
नेहमीचा तो तराजू सुटेना
वजनातली खोटी माया तुटुदे म्हणता तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही भाजी सुकते
पोळ्यांदेखत पोटात जाते
आठवणींचा ठिपका होते.
भाजी सुकली, मंडईतील माठांचा कचरा झाला
भाजी गेली ताटामधल्या
चमच्यांचा तोलच सुटला.

पद्य-
हे भलते अवघड असते. हे भलते अवघड असते
कुणी प्रचंड आवडणारे.. ते भाव जास्त खाताना...
डोळ्यांच्या देखत आणि काहिसे लांब होताना..
भाज्यांवर शिंपडून पाणी..
ठसका रोखुनी कंठी.
तुम्ही केविलवाणे हसता ..
अन् तुम्हांस नियती हसते.

हे भलतेच अवघड असते..
📝२६/७/१७

Tuesday, July 25, 2017

टमाटर सूप

















माझाही भाव वाढला पाहिजे
लालबुंद झाला टमाटर
याद राखा माझ्याबरोबर
हिरवे हिरवे आहेत मटर

वकिली करणा-या कांद्याच्या
पाणी आले डोळ्यात
म्हणाला तो टमाटरला
नको रे टाकू असे कोड्यात

रविवारी बसून एकदा
सगळं करुया सेटिंग
त्यासाठी बुधवारीच ठेवू
जनरल बाँडीची मिटींग

तेवढ्यात किचन मधून आवाज आला
आई,  आज मिक्स व्हेजिटेबल सूप
सांगायला पाहिजे का आता
सगळे का झाले बरं चूप


📝२५/७/१७

Saturday, July 22, 2017

गटार माई


.एका  आईने या अमावस्येला  ' गटार माई '  जवळ व्यक्त केलेले भावनिक विचार  कवितेतून :

अमावस्येला गटार गंगे 
विनंती करते तूला 
पडलं जरी माझं पोरं 
सांभाळून घे त्याला 

अमावस्येला नसतेच ग 
नभामध्ये चंद्र कोर 
नित्याच्याच बार मधे 
पित  असेल माझे पोर 

समजवायला गेले तर  म्हणतो 
पुरे झाली तुझी मचमच 
कस सांगायचं याला आता 
काय खोटं असतं आणि काय सच . 

चूक माझीच झाली कारण 
वेळीच उगारला नाही हात 
कधीच नाही आलं पोरगं 
बाराच्या आत घरात 

देवघर , उंबरठ्या  बरोबरच 
तुझ्यापाशी ही एक दिवा ठेवीन 
न धडपडता पोरग घरी आलं 
तरच चार घास जेवीन 

असेल जरी  आईची  भावना 
एकदम टुकारी 
काळजीपूर्वक सगळेजण 
साजरी करा गटारी 

माझे टुकार विचार 
३/७/२०१७

Friday, July 21, 2017

बेवड्यांचा पाय पडे चुकुनी गटारात


कवी श्री. वा. रा. कांत sorry हं🙏🏼
( चाल: बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात)

बेवड्यांचा पाय पडे चुकुनी गटारात
देणार मला काय तू आज चकण्यात

काढिती ग्लासातून थेंब श्रध्देचे
खा-या दाण्यात भरे पोट बेवड्याचे
मदिरेचा वास सुटतो दूर काँलनीत
बेवड्याचा पाय पडे चुकुनी गटारात

त्या गाठी, त्या भेटी बारच्या खाली
अमावस्या तव नयनी दिसू लागली
रिमझिमते अमृत हे कुठुनी जठरात
बेवड्याचा पाय पडे चुकुनी गटारात

हातासह ग्लासाचा तोल सावरताना
बाटल्यांची रिकामी बुचे मिळुनी मोजताना
जिएसटी लावूनी बिल मारले गळ्यात
बेवड्याचा पाय पडे चुकुनी गटारात

📝२२/ ७/१७
#गटारी स्पेशल

पाऊले चालती लोणावळ्याची वाट



पाऊले चालती लोणावळ्याची वाट
भुशी धरणाशी जोडूनीया गाठ

भरुनिया सारी गाडी चकण्याने
नकोच रिकामे पुढ्यातील ताट
पाऊले चालती..

हाफ, फुल पेले सगेसोयरे ते
पाहूनिया सारे पिती पाठोपाठ
पाऊले चालती ..

घेता प्रसाद चिक्की खोब-याचा
बिलामधे  जिएसटीचा
व्हावा नायनाट
पाऊले चालती...

मन धुंद होता, पुन्हा लागे ओढ
रस्सा, अंडी जोड गटारीचा थाट
पाऊले चालती..
📝२१/७/१७

मुळ गाणे:-
पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची तोडूनिया गाठ

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट
पाऊले चालती पंढरीची वाट

आप्त इष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती पंढरीची वाट

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट
पाऊले चालती पंढरीची वाट

मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तस्सा मांडी गोड संसाराचा थाट
पाऊले चालती पंढरीची वाट

Tuesday, July 18, 2017

माझी 'मटारगिरी '



करू मटारी  , मौज हीच वाटे भारी 

नवरत्न सोसायटीचे अध्यक्ष   ' काय. अप्पा खवखवे'   यांनी रात्री जाहीर केले की  यंदा सोसायटीत ' मटारी '  उत्सव जोरात साजरा करायचा .गेल्या अनेक दशकात  सोसायटीत  या ना त्या  कारणाने  हा उत्सव करायचे राहून जात होते . यंदाची अमावस्यां रविवारी आल्याने  तयारीला  आणि कार्यक्रम साजरा करायला  पुरेसा अवधी मिळणार होता 
रोजच्या रोज त्या चिकन मटण  बिर्याणी कबाब तंदुरी  पापलेट सुरमयी  पासून काही तरी वेगळे  खायला मिळणार  याची उत्सुकता सर्वानाच  होती 
या कार्यक्रमासाठी  खास कमिटी नेमण्यात आली. कमिटीतील काही सदस्यांनी खास ए. पी. एम . सी  मार्केट  वाशीहून  ' मटार ' आणू या असे सुचवले . प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या आधी  महिलांसाठी ' सोल मिनिस्टर ' अर्थात मटार सोलण्याची  स्पर्धा घ्यायचे ठरले जेणेकरून  ते सोललेले मटार  वेगवेगळ्या पाककृतीत वापरता येतील . त्यातीलच काही मटार घेऊन लहान मुलांसाठी अर्थातच ' मटार चमचा ' ' हवेतील मटार तोंडात ' अशा स्पर्धेचे आयोजन करावयाचे ठरले . गण्याने तर उत्सवासाठी प्रायोजक मिळ्वण्यासाठी  म.टा त  जहिरात देऊया असेही सुचवून पाहिले 
प्रत्यक्ष  ' मटारीचा ' मेनू ठरवताना मात्र खूप दमछाक झाली. शेवटी काय अप्पा यांना अथक प्रयत्नांतर  मेनू ठराव्यात यश आले. 
१) ' मटारी ' महोत्सव असल्याने सुरवातीला  लहान मुलांना   ' स्वीट मटर  सूप ' आणि मोठ्यासाठी  ' मटारी  वाईन '   ठेवायचे ठरले.
 २) सोबत स्टार्टर म्हणून  मटार पॅटिस, कोबी- मटार - बटाटा भजी  इ इ 
३ ) जेवायला - मटार करंजी  , अक्खा मटार , मटर पनीर मसाला आणि  मटर के परोठे असा जगी बेत ठरला आहे 
 ४ ) उत्सवात काहीच गोड नाही का ? या भावे आजीच्या प्रष्णांवर  शेवटी  ' मटार हलवा ' ठेवायचे ठरले.

बेत तर ठरला आहे आता  सगळे वाट पहात आहेत ' मटारीचा ' दिवस येण्याची 

करू मटारी  , मौज हीच वाटे भारी 

अमोल 

Monday, July 17, 2017

पाऊस मुंबईचा पडतो


कवी ग्रेस यांची माफी मागून
( पाऊस कधीचा पडतो वर टुकारगिरी )

पाऊस मुंबईचा पडतो
तरीही आँफीस जाणे
लगेच जाग मज येते
सकाळच्या ब्रेकींग न्यूजने

रुळात साचले पाणी
लोकलची रांग लागती
जनतेचा चढतो पारा
या हार्बरलाईनी वरती

घेऊन मला जाईना
ही शुभ्र रंगाची ओला
बेस्टच्या थांब्यापाशी
पाऊस तसा बरसला
शापीत वरच्या ओळी
ट्रँफीक जाम सारा
माझ्याच केबीन भोवती
साहेब देतो पहारा
📝१८/७/१७

मुळ ग्रेसफुल कविता:

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा
-- ग्रेस

सोनू ऽ ऽ , तुला व्हाटसप वर भरोसा नाय काय


सोनू ऽ ऽ सुप्रभात 🙏🏼
तुला व्हाटसप वर भरोसा नाय काय?

सोनू तू व्हाटसप वर येत रहा दिवसभर,
-दिवसभर
सोनू तू मेसेज पाठव भरभर,
-भरभर
सगळेच मेसेज फिरून  गोल गोल,
-गोल गोल
सोनू ऽ ऽ तू माझ्याशी गोड बोल,
-गोड बोल

सोनू ऽ ऽ तुला व्हाटसप वर भरोसा नाय काय?
-नाय काय?

सोनू तू दररोज फुले टाकणार
- टाकणार
डाऊनलोड केल्यावर  ती  उमलणार,
-उमलणार
फुलांचा आकार कसा गोल गोल,
-गोल गोल
सोनू ऽ ऽ तू माझ्याशी गोड बोल,
-गोड बोल


सोनू ऽ ऽ तुला व्हाटसप वर भरोसा नाय काय?
-नाय काय?

सोनू तू  सकाळी करणार
मोरया
मोरया🙏🏼🌺
जेवणाच्या ताटावरच लक्ष
ठेऊया
- ठेऊया
मोदकाचा आकार कसा
गोल गोल,
- गोल गोल
सोनू ऽ ऽ तू माझ्याशी गोड बोल,
-गोड बोल


सोनू ऽ ऽ तुझा देवावर भरोसा नाय काय?
-नाय काय?
सोनू ऽ ऽ

Saturday, July 15, 2017

रविवारची टुकारगिरी


रविवारची टुकारगिरी📝

मंडळी नमस्कार 🙏🏼🌺
तुम्ही मुंबईत कधी बेस्ट ने प्रवास केला असेल तर त्या बसवर दारापाशी मोठा Q काढून  तिथे  लिहिलेले  पाहिले असेल  ' *रांगेचा फायदा सर्वाना* ' . आज रांग  हा विषय घेऊन रविवारची ही टूकारगिरी .
लहानपणापासून चा आपला प्रवास हा अनेक रांगेतून गेलेला आहे (  बाल्यावस्थेत अगदी रांगूनच  प्रत्येक जण सुरुवात करतो 😃)  पण जस जस   आपण मोठे होत जातो तस तस  ' रांगेची  चिडचिड  सर्वाना '   असं होऊन जात
आता आठवा बर तुम्ही रांगेत उभे आहात आणि तुमची चिडचिडीत केव्हा झालीय 
१)  लोकल तिकीटाची  रांग  - आपण ज्या रांगेत उभे तीच हळू जाणार
२) टोल  नाका  - इथे ही तसेच  ( additionally  बायको ने सांगितलेल्या रांगेत गाडी घेतली नसेल , एखादा  वाहनचालक मध्येय घुसत असताना आपण त्याला जागा करून देणे - हाय चिडचिड 😁  )
३) मुंबई - पुणे  रोडवरील - अमृतांजन पुलाजवळील जागा (  जिथे आपण ती रांग हळू )
४) शनिवारी रात्री ( मुख्यतः: पुण्य नगरीत ) हॉटेल मध्ये जाण्यासाठी करावे लागणारे वेटींग
५) मॉल मधे  बिल करताना  आपण ज्या रांगेत उभे आहोत ती रांग हळू  ( आता यावर काढलेला उपाय - मी बायको, मुलगी  तीन वेगवेगळ्या रांगेत उभे असतो , जो  बिल देयकापाशी लवकर पोचेल तिथे आपली ट्रॉली घेऊन जायची कसरत करायची , दुस-या रांगेतील मागच्यांना समजवायचे हो ही आमची मुलगी रांगेत उभी आहे  आमचाच नंबर आला आहे  इ इ .)

रांगेत आहोत, पुढे जात आहोत पण रांग थांबावी असं कधी वाटलंय? -
मुबंईत बोरीबंदर स्टेशनाच्या बाहेर जो बसस्टाँप आहेत तिथे सकाळी आपापल्या ठिकाणी कामावर जाणारे एका रांगेतच बस मध्ये चढतात . एक बस गेली की लगेच दुसरी बस तयार असते . अशा वेळी काही वेळा रांग थांबावी असं चक्क वाटत कारण जी बस उभी आहे त्यात ऑलरेडी खूप गर्दी झाली आहे , आता आपण गेलो तर उभारावे लागेल आणि या बसच्या मागे एक मस्त डबलडेकर उभी आहे. तेव्हा जाणारी रांग  थाबू दे  असे वाटण्याचा  विरुध्द्व अनुभव इथे घेता येतो

बाकी लहानपणी शाळेच्या मैदानात जाण्यासाठी, शाळेच्या सहलींमध्ये , ध्वजसंचलन करताना  , पहिला पगार काढण्यासाठी , मुलाच्या शाळेतील प्रवेशासाठी लावलेल्या रांगेने  चिडचिड झाली असे कुणालाच वाटणार नाही  . 
शेवटी कुठल्याही रांगेत उभारताना येणा-या रागाला एका अनुस्वारी टींबाने काबूत ठेवायचा प्रयत्न करायचा  मग ती  रांग  प्रत्येक वेळेला वेगळी रागदारी सादर करेल आणि मग 

थाबूंनी रांगेत सा-या, राग माझा संपला

टूकारगिरी आवडली का ते   नक्की कळवा इथे किंवा a.kelkar9@gmail.com या ईमेल आयडीवर
📝

Wednesday, July 12, 2017

अंदाज पावसाचा , वाटे खरा असावा


कवी- इलाही जमादार याची माफी मागून :-
( मूळ गझल :अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा, बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा )

अंदाज पावसाचा , वाटे  खरा असावा 
प्रत्येक दिवसाचा , तो वेगळा ठरावा 

आषाढ सरी  सुगंधी, भेटती  काळजाला
केलेत वेध  ज्याने, तो  शाळेत असावा

शेतावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
ढगात  वेदनेचा, अग्नी - बाण शिरावा 

का आळ पावसावर, घेता तुम्ही चुकीचा?
की वाटले तुम्हाला, कमी दाब तो  असावा!

भेटून पावसाला, इतुके विचार आता
काबूत एवढाही, का, अंदाज नसावा

माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "भलेही'
दाही दिशा सरींनी , तो , गुंतला  असावा

नाही अखेर कळले , नौका कशी बुडाली 
भयभीत फोटो सांगे  , तो सेल्फीश असावा 

संकल्पना : अमोल 

Monday, July 10, 2017

माझी टूकारगिरी




नमस्कार मंडळी ,

चला  दोस्तहो ब्रेकींग न्यूज वर बोलू काही 

ब्रेकींग न्यूज  हा प्रकार नक्की केव्हा पासून सुरु झाला हे आता आठवत नाही . पण सुरवातीला खरोखरच ब्रेकींग न्यूज ( विशेष घडलेली घटना )  असायच्या. आजकाल  प्रत्येक सेकंदाला प्रत्येक न्यूज चॅनेलवर  डावी कडून उजवीकडे किंवा व्हाईस व्हर्सा  सतत  वेगवेगळ्या बातम्या घेऊन धावणारी पट्टी अशीच ब्रेकींग न्यूजची व्याख्या करता येईल . वेगळ्या भाषेत सांगायचे तर  मी मी तुम्हाला पहिल्यादा सांगतोय  मी मी.  अशी  मी पणाची भावना यात असते . मग अशा परिस्थित्तीत  काहीना  सोशल मीडियावर ( फेसबुक, व्हाट्सअप )  अवेळी ' हे राम ' म्हणावे लागते हा या गोष्टीचा  झालेला दुष्परिणाम . शाळेत असताना  आपणास पूर्वी काही निबंध लिहायला लागायचे  विषय साधारण १) मृत्यू  शाप की वरदान  २)  बस स्थानकावर घालवलेला १ तास  इ इ .  आता  पुढील युगात असेही निबंधाचे बिषय असतील  १)  ब्रेकींग न्यूज शाप की  वरदान  २) सोशल  मिडीयावरचे माझे कालचे १२ तास  इ इ 
तर  थोडक्यात काय  सकाळचे  सात वाजून पाच मिनिटे झाली आहे ' सुधा  नरवणे ' प्रादेशिक बातम्या देत आहे किंवा आजच्या  ठळक बातम्या  हे आकाशवाणी आणि  दुरदर्शनाच्या  गोष्टी या ब्रेकींग न्यूजच्या  जमान्यात  इतिहासजमा झाल्यात असेच म्हणावे लागेल 
एखादी ब्रेकींग न्यूज आली की  त्या बातमी संबधीत माणसे, यंत्रणा  कामाला लागते  मात्र तसा या बातमीशी  काहीही संबंध नसताना दोन जमाती आवर्जून  कामाला लागतात एक व्यगंचित्रकार आणि दुसरा विडंबनकार ( टुकार नव्हे )  . एक शब्दातून व्यक्त होणारा  तर एक  चित्रातून  दोघांचा उद्देश एकच . हसवणूक
विसंगती सदा घडो , विनोदी चित्र दृष्टीस पडो  

आई लेखिका असल्याने पूर्वी दर  दिवाळीला ८-१० तरं दिवाळी एक घरी यायचे . यात पहिल्यादा  मी  शेवटी लिहिले जाणारे  राशी भविष्य आणि  त्या अंकातील व्यगंचित्र  कुढला ही आवाज  न करता  आधी वाचायचो (  राशीचक्र  आणि विडंबन काव्यातील  आमचा हात  असा लहाणपणापासून  होता  तर )  मग इतर  लेखनाकडे वळायचो 

हे सर्व आठवायचे कारण  की  ख्यातमान  व्यगंचित्रकार  मंगेश तेंडुलकर  याचे आज दु:खद निधन झाले .  असा एक ही दिवाळी एक नसेल  की  त्यात मंगेश तेंडुलकरांचे व्यगंचित्र नाही .  प्रासंगिक विसंगती  एका चित्रात मांडणे  हे व्यगंचित्रकाराचे मोठे कसब आणि  मंगेशजींनी  हे शिवधनुष्य अगदी लीलया पेलले. सोशल  मिडीयाच्या युगात त्याची व्यगंचित्रे  फेसबुक , व्हाट्सअप वर  अगदी घटना घडल्या पासून १-२ दिवसातच दिसायची . त्याच्या स्वतः:च्या संकेतस्थळावरही अशी खूप व्यगंचित्रे  पहायला मिळतात . सध्या हाताला  वाईट दिवस आले असताताना  ( राजकीय चिन्ह नव्हे , प्रत्यक्ष लेखनाची कला  )  त्याच हाताच्या मदतीने आशयपूर्ण  चित्र काढणे  ही या कलाकारची तपश्चर्याच म्हणावी लागेल . एक ब्रेकींग न्यूज वाचायला / ऐकायला / समजायला लाग्ना-या वेळेपेक्षा  त्या बातमीचे चित्ररूप वर्णन  काही सेकंदात समजावणे ही खरी  व्यगंचित्रकारी आणि म्हणूनच बहुतेक देवलोकी त्याच त्याच ब्रेकींग न्यूजला कंटाळून  विरंगुळा म्हणून   मंगेशजींना घेऊन यायची आज्ञा  सर्व देवांनी  यमाला केली असेल 
असो . मंगेशजी देवलोकीचा आपला प्रवास सुखाचा होवो या एका टुकार विडंबनकाराकडून  एका श्रेष्ठ  जेष्ठ  व्यगंचित्रकाराला शुभेच्छा  


विसंगती सदा घडो , विनोदी चित्र दृष्टीस पडो  .. 

अमोल केळकर 
a.kelkar9@gmail.com
poetrymazi.blogspot.in 

भावपूर्ण श्रध्दांजली


आयुष्यभर तुम्ही आम्हाला हसवलेत  मंगेशजी ,
 भावपूर्ण श्रध्दांजली  असे म्हणताना ही  दु:खी चेहरा तुम्हाला आवडणार नाही 

म्हणून  हसत हसत पुढच्या प्रवासास  शुभेच्छा देतो 




प्रामाणिकपणाचे फळ: आधुनिक महाभारत


प्रामाणिकपणाचे फळ: आधुनिक महाभारत

 धनुर्विद्या डॉट कॉम  संकेतस्थळ  विक्रमावर विक्रम रचत होते.   शास्त्रीय पध्दतीने तिरंदाजीची माहिती देणारे  एकमेव संकेतस्थळ असा त्याचा  नावलौकीक वाढत होता. संकेत स्थळाचे निर्माते गुरुवर्य द्रोणाचार्य वेळोवेळी  संकेतस्थळावर  तिरंदाजी बद्दलची माहिती / प्रकार/ नियम  अपडेट करत असत.  केवळ हस्तिनापूरातूनच नव्हे तर देशो देशीचे राजे , महाराजे , युवराज  येथील माहितीचा उपयोग करुन धनुर्वीद्येत पारंगत व्हायचा प्रयत्न करत होते.
    असेच एकदा गुगल सर्च  करता करता  ' एकलव्यास ' सदर संकेतस्थळ  सापडले आणि त्याच्या आनंद गगनात मावेनासा झाला. रोज सकाळी न चुकता  सराव सुरु करण्याआधी तो संकेत स्थळाला भेट देत असे आणि नंतर सरावास जात असे. परंतु  सुरवातीपासून त्याला काही तरी उणीव भासत  होती. खुप विचार करता त्याच्या लक्षात आले की या संकेतस्थळावर आपण जरा उशीराच इथे आलो आहोत. गुरुजींनी सुरवातीला दिलेले  नियम आपल्याला माहितच नाहीत .  सुरवातीची माहिती कशी मिळवायची असा विचार करत असतानाच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली.  या संकेतस्थळाचा पहिल्यापासून  वाचक असणारा विद्यार्थी  ' अर्जून ' याच्याशी संपर्क करायचे असे त्याने ठरवले.  तातडीने एकलव्याने निरोपाचा खलीता ( इमेल ) अर्जूनास धाडला .  त्यात लिहिलेला मजकूर बघून अर्जूनाने  एकलव्यास उलट निरोप धाडला आणि त्यात लिहिले  की तुला पाहिजे असलेली सर्व माहिती माझ्याकडे प्रिंट आउट स्वरुपात आहे  मात्र याची देवाण घेवाण करण्याआधी  आचार्यांची परवानगी घेणे योग्य ठरेल.  अर्जूनाने हा निरोप परत पाठवताना  ( अती ) शहाणपणाकरुन गुरुवर्य द्रोणाचार्यांना  बीसीसी ( bcc  बाँबे क्रिकेट असोसीएशन  नव्हे)  मधे ठेवले.  अर्जून एकदम खुशीत होता . त्याला खात्री होती  आचार्य त्याच्या हुशारीबद्दल बक्षीस म्हणून तिरंदाजीतील ४ थी स्टेप सगळ्यात आधी त्याला शिकवणार.  पण झाले भलतेच. आचार्यांच्या एका मेलने   धनुर्विद्या डॉट कॉम  संकेतस्थळ  अर्जूनासाठी कायमचे बंद झाले. अर्जूनाने अनेल निरोप आचार्यांना पाठवले पण सर्व निरोप जसेच्या तसे परत आले. अर्जून हताश होऊन निघून गेला.

आज अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर  अर्जून बनवत असलेला द्रोणाचा-यांचा पुतळा अंतीम टप्प्यात आला आहे.  अर्जूनाने तिरंदाजीचा सरावही सुरु केला आहे पण डाव्या हाताने. काय सांगावे उद्या आचार्यांनी उजव्या हाताचा अंगठा मागितला तर ????

शुभं भवतु !!! शुभं भवतु !!! शुभं भवतु !!!

Sunday, July 9, 2017

गटारी स्पेशल


गटारी स्पेशल : -📝
( चाल: रिमझिम पाऊस पडे सारखा )

इकडून तिकडे मेसेज पाठवा
जुलैला ही ऊन पडे
दारुच दारु चहूकडे गं बाई
गेला बोकड कुणीकडे
( रिमझिम पाऊस पडे सारखा)

हाक मारिता वेटर म्हणुनी
पाहती नजरा दाही दिशांनी
खुणाविता मज ग्लास घेऊनि
लेबल मजला रेड दिसे,  गं बाई
गेला बोकड कुणी कडे
( रिमझीम पाऊस पडे सारखा)

पित्ताशयाच्या लक्ष आठवणी
तरीही उरते पेय पिऊनी
उठता चालू घरी लागता
गटारातही पाय पडे, गं बाई
गेला बोकड कुणीकडे
( रिमझिम पाऊस पडे सारखा)

Saturday, July 8, 2017

गुरु पोर्णीमा



मंडळी नमस्कार 🙏🏼🌺
उद्या गुरु पोर्णीमा . आजपर्यतचा प्रवास ज्याच्यामुळे सुखकर झाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता  व्यक्त करायचा हा दिवस. आई - वडील , शाळेतील गुरुजी  , कॉलेजमधील सर  ते आपण ज्या क्षेत्रात आहोत ( खेळ , संगीत , व्यवसाय , नोकरी , अभिनय इ इ )  तेथील आपले मार्गदर्शक / गाईड  यांची आठवण ठेवून  त्याचे आभार मानायचे  
आजच्या  मॅनेजमेंट  युगात ऍटीट्युड (Attitude)   सगळेच दाखवतात पण एखादी चांगली गोष्ट घडली असता त्या घटनेला कारणीभूत गोष्टीबद्दल ग्रँटीट्युड  राहणे हे ही महत्वाचे असते ( पाश्च्यात्य लोक अनेक प्रकारे असा  Gratitude  व्यक्त करतच असतात )
माझ्यामते  गुरु पोर्णीमा आपण या ही एका उद्दीष्टाने  साजरी करायला हवी 
वरील उल्लेखलेले गुरु  हे सर्व पारंपारिक गुरु म्हणून परिचित आहेत असे म्हणता येईल. आता या काही  गोष्टी ज्यांना आपण 'गुरु ' चे स्थान देऊ शकतो:-

एखाद वाचलेले छान पुस्तक
मनाला स्पर्शून गेलेलं गाणं
एखाद्या गोष्टीत आलेलं अपयश
गरजेच्या वेळी मित्र / नातेवाईक यांनी केलेली मदत
आपल्या कडून झालेली चूक

प्रत्येकाची यादी कदाचित वेगळी असेल . पण ज्या गोष्टीतून आपण शिकतो ते आपले गुरु  किंवा ज्या गोष्टी  जीवन सुसह्य करायला मदत करतात ते आपले गुरु  ( गुरुचे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत्र म्हणा ना हवंतर *  )

* टीप - स्तोत्र आणि स्त्रोत्र  या शब्दात एकदा मी घोळ  घातला होता तेंव्हा शाळेतल्या माझ्या एका मित्राने  मला  योग्य मार्ग / शब्द दाखवला होता .तो  सध्या माझ्यासाठी महागुरूच  आहे  हा भाग वेगळा 😉)
या टूकारगिरीच्या शेवटी आणि एका गुरुचे मला आभार मानायचे आहेत ते म्हणजे  *G for  - गुगल*  . " व्यासोच्छिष्टं जगत सर्वम " असे म्हणतात , आता हे गुगल व्यासांचे  आधुनिक रूप मानावयास हरकत नसावी 
 आमच्या साठी कठीण परिस्थीतीत सर्व मार्ग अगदी चुटकीसरशी ( टिचकीसरशी) गुगल गुरु  सोडवतात . त्याचे ही  आभार 🙏🏼
जी एस टी प्रणाली लागू व्हायच्या आधी जे काही विनोदी मेसेज यायचे त्यात
' गुरूवर श्रध्दा ठेवा '  असा एक विस्तार यायचा  हेच आता ' *गुगल वर श्रध्दा ठेवा* ' असं म्हणलं तरी  चालेल

सर्वाना गुरुपौर्णीमेच्या शुभेच्छा 🙏🏼🌺



गुरु समान कुणी नाही सोयरा
गुरुविण नाही थारा
गुरु निधान गुरु मोक्ष आसरा
देव दैव लाभे सदैव
गुरुचरण लाभ होता
गुरु एक जगी त्राता
🙏🏼🌺

आपल्या प्रतिक्रिया  अवश्य पाठवा इथे किंवा
a.kelkar9@gmail.com

Sunday, July 2, 2017

रविवारची टुकारगिरी



मंडळी नमस्कार 🙏🏼🌺
आपण वेळोवेळी माझ्या 'टु-कार - ईचार या अनुदिलीला भेट देऊन माझा उत्साह वाढवत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे  अनेक आभार.🙏🏼
गेली अनेक वर्षे या अनुदिनीत फक्त टुकार पद्य लेखनच केले. मात्र आता मनातील सरळ - सोपे
( पण टुकार) विचार गद्य स्वरूपात दर रविवारी
' रविवारची टुकारगिरी' या सदरात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे
अर्थात लेखन आवडल्यास कौतुक करायला तुम्ही समर्थ आहातच.😊
आता रविवारच का? तर आमच्या सारख्या चाकरमान्यांसाठी हाच काय तो एक हक्काचा मचमच करण्याचा दिवस
असो😁
आज आपण व्हाट्स अप, फेसबुक, ब्लाँग यावर अनेक उत्तमोत्तम माहिती, लेख, विचार वाचतो.
( ट्विटर बदल माहिती नाही कारण मी तेवढा मोठा नाही☺)
या माध्यमांमुळे लेखकाला/ कवीला  आपले साहित्य कोण प्रकाशित करेल याची चिंता आज तरी  नाही. ज्याक्षणी मनात एखादी संकल्पना रुजते त्याक्षणी ती मोबाईलवर उतरवायची , no proof reading,  तसंही -हस्व, दीर्घ कुणाला कळतयं म्हणा आज काल. ज्याक्षणी लेखन पूर्ण होईल त्याचक्षणी मोबाईल संपुर्ण जगाशी जोडून ते लेखन ( कविता, लेख, चारोळी, वैचारिक, ललित लेखन इ.इ) करुन टाकायचे प्रसिद्ध. सृजनशील लेखन forward होतेच.
( टुकार - लेखनाला मात्र फारच जहीरात करावी लागते - स्वानुभव 😜)
पूर्वी सारखे लेखन कच्चे लिहा मग पक्के करा मग दोन प्रती लिहा,  संपादक महाशयांना पत्राने पाठवा, पोच मिळेल की नाही खात्री नाही,  वृत्तपत्र गावचेच असेल तर कार्यालयात नेऊन द्या ( आईचे अनेक लेख सांगली तरुण भारत,  केसरीत नेऊन दिल्याच आठवतयं अजून)
मात्र आता एका इमेल वर काम सोप झालंय, काय चाललय अप्पानी दोन निळ्या खुणा दाखवल्या की काम झालंय समजायचं
आणि मानधन, त्याचं काय? ते तर पूर्वी ही मिळत नव्हतं, आत्ताही मिळत नाही😉
*पण स्वानंद,  लेखनातुन मिळणारा तो कदाचित आमची पिढी जास्त अनुभवते आहे*
चला रविवारची पहिली मचमच पुरे. परत भेटू पुढची मचमच तयार झाली की परत एखाद्या रविवारी
नेहमी सारखे आपले अभिप्राय नक्की पाठवत रहा
a.kelkar9@gmail.com वर किंवा इथे 

लकलक असती व्हाटसपची न्यारी दुनिया
पाठवती पुढे मेसेज हा हा हा

📝

Related Posts Plugin for WordPress, Blogger...