नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Showing posts with label पाऊस मुंबईचा पडतो. Show all posts
Showing posts with label पाऊस मुंबईचा पडतो. Show all posts

Monday, July 17, 2017

पाऊस मुंबईचा पडतो


कवी ग्रेस यांची माफी मागून
( पाऊस कधीचा पडतो वर टुकारगिरी )

पाऊस मुंबईचा पडतो
तरीही आँफीस जाणे
लगेच जाग मज येते
सकाळच्या ब्रेकींग न्यूजने

रुळात साचले पाणी
लोकलची रांग लागती
जनतेचा चढतो पारा
या हार्बरलाईनी वरती

घेऊन मला जाईना
ही शुभ्र रंगाची ओला
बेस्टच्या थांब्यापाशी
पाऊस तसा बरसला
शापीत वरच्या ओळी
ट्रँफीक जाम सारा
माझ्याच केबीन भोवती
साहेब देतो पहारा
📝१८/७/१७

मुळ ग्रेसफुल कविता:

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा
-- ग्रेस

Related Posts Plugin for WordPress, Blogger...