नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, November 28, 2019

लपंडाव


लपंडाव
( रूपकात्मक,  मनोरंजन हा हेतू)

स्वर्गातील इंद्रप्रस्थ तारांगणात कालनिर्णया प्रमाणे गुरु - चंद्रातील लपंडाव एकदाचा झाला.  एकदाचा झाला असं म्हणण्याचे कारण, काही दिवस स्वर्गलोकातील राजकारण शुल्लक कारणाने ढवळून निघाले होते. त्यामुळे हा कार्यक्रम बघायला कुणी जाईल  की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती.

'सिंहासन' माझेच, मलाच, मीच, असे सतत बोलणा-या देवांचा राजा अर्थात देवेंद्र याला छोटीशी अद्दल घडवायची योजना महा ( शिव) देवाने, ब्रह्मा बरोबर आघाडी करून ठरवली होती. त्यानुसार ब्रह्मदेवाने स्वर्गलोकात "पार्वतीपती" वट लागू केली ज्याने  इंद्रदेवांना आपले 'सिंहासन' सोडावे लागले. २७ नक्षत्रातील प्रत्येकी ४ सदस्य असे १०८ जण असताना केवळ १०५ जणच देवेंद्राबरोबर राहिले आणि राहिलेले ३ घे महा- देवांच्या सांगण्यानुसार अलिप्त राहिले.

याकामात महा-देवांचा जवळचा सहकारी 'नंदी' यांनी देवेंद्र यांना गाफील ठेवण्यात मोठी भूमिका बजावली .

तरिपण गुरु- चंद्राचा लपंडाव कार्यक्रम  'करुनच दाखवू' अशी प्रतिज्ञा इतर देवतांनी घेतल्याने नियोजित कार्यक्रम ठरला.

आता आपल्यातरी काय काम आहे म्हणून 'चंपारण्यातील' गणा सह 'अजीत' समजले जाणारे देवेंद्र कार्यक्रमास उपस्थित राहिले.

शरदाच्या चांदण्यात, सोनियाच्या दिनू या कार्यक्रमाचे आमंत्रण अनेक लोकाचे गण, राजे, देवता, दानव या समस्तांना अगदी ममतेने दिले गेले. क्षणभर विरंगुळा म्हणून सगळे जमले.

आणि तो खेळ सुरु झाला. संध्याकाळच्या वेळी रवीने आपली प्रखरता कमी करुन या खेळात रंग भरायला सुरवात केली. 

एकेकाळचा सर्वश्रेष्ठ , कुणाला न जुमानणारा, खंबीर आवाजाचा, ठाम,  निष्ठावान असा *'गुरु'* मनाचा कारक, मानसिकतेचा कारक, भावनांच्या कारक ग्रहाच्या *चंद्रा* मुळे झोकाळला गेला. अदृश्य झाला

रात्रीच्या पुर्वसंध्येला पश्चिम क्षितीजावर रंगलेल्या या खेळाची मजा सर्वांनी अनुभवली

नियोजित वेळेत गुरु बाहेर आला. तारंगणातील ते दृश्य म्हणजे  अलौकिक होते. द्वितीयेच्या चंद्राची कोर आणि खालच्या बाजूस छोटा गुरु.
यातही देवेंद्राच्या भक्तांना हा शत्रूराष्ट्राचा झेंडा फडकवल्याचा भास झाला आणि त्यांनी तात्काळ निषेध व्यक्त करुन गुरु- चंद्रावर 'स्वर्गलोक-द्रोहाचा' आरोप केला.

काही धार्मिक लोकांना धनप्राप्तीचा उपाय म्हणून द्वितियेचा चंद्र बघितल्यावर हिरवा रंग बघायचे असते हे लगेच लक्षात आले.  तिथे हिरवा रंग दिसला नाही म्हणून त्यांनीही निषेध नोंदवला

कार्यक्रम संपला

पण खरा लपंडाव आता सुरु होईल

अर्थात विष्णूलोकातून भगवान विष्णू आणि नारदमुनी सर्व घडामोडींवर बारिक लक्ष ठेऊन आहेत

📝  २९/११/१९
poetrymazi.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...