नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, November 30, 2019

सूत्रधार


बातमीचा "सूत्रधार तो" ..
( रविवारची टुकारगिरी 📝)


मंडळी नमस्कार  🙏🏻
'मी परत येईन' नंतर गेले काही दिवस सगळ्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती प्रसिध्द झालेली होती  ती म्हणजे

बातमीचा "सूत्रधार" तो, इथे निरंतर न्यूज पाडतो

या सूत्रधाराने सांगितलेल्या किती गोपनीय बातम्या प्रत्यक्षात ख-या निघाल्या हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण यामुळे गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांचा टि.आर.पी  वाढण्यास आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे मनोरंजन होण्यात नक्कीच वाढ झाली हे आम्ही स्वतः या लेखाचे 'सूत्रधार' म्हणून अगदी खात्रीपुर्वक सांगतो 🤓

पण हाच सूत्रधार एकेकाळी अत्यंत विश्वासू असायचा. याचे नियोजन अनेक नाटकांतून दोन अंक जोडताना, भूतकाळात जाताना, कथानक पुढे नेताना, दोन - तीन वेगवेगळ्या घटना एकत्र गुंफताना दिग्दर्शक अगदी खुबीने करायचा.

आठवतीय 'हमलोग' मालिका. प्रत्येक दिवशी मालिका संपली की अशोक कुमार 'सूत्रधार' म्हणून येऊन बोलायचे

एखाद्या कार्यक्रमाचे 'निवेदक' हे 'दिसणारे सूत्रधार' . मात्र असे कार्यक्रम (इव्हेंट मॅनेजमेंट ) पुर्णत्वास नेणारे पडद्यामागचे असंख्य अदृश्य सूत्रधार ही महत्वाचे ठरतात, जे जास्त प्रसिध्द पावत नाहीत.  यात मी "सूत्र शिरोमणी" म्हणून पु.लं च्या 'नारायणाचा' आवर्जून उल्लेख करेन.

 जाता जाता विविध स्नेहसंमेलने, शाळेचे मैत्री मेळावे, कवि संमेलने आणि अशा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे 'सूत्र' संचलन करणा-या सर्व विभूतींची आठवण यानिमित्ताने करणे आवश्यक वाटते.

आरोपींना आम्ही पकडूच पण त्याच्या ' सूत्रधाराला' ही बेड्या ठोकू असे ही आपण वाचतो आणि नंतर विसरतो.

मंडळी , पण अजून एक सूत्रधार आहे बरं जो आपल्या सगळ्यांना कठपुतली बाहुल्यांन प्रमाणे नाचवत आहे. देव, नियती, प्रारब्ध,  कर्म अशी काही वेगळी नावे ही या सूत्रधारास आहेत

यावेळची "ब्रेकींग न्यूज" ( सगळ्यात मोठी बातमी)

आत्ताच आमच्या अंतर्गत सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की प्रस्तुत ( टुकार) लेखकाने जर सन १९९४- ते - १९९७. रासायनिक अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना " सूत्रांचा" योग्य पद्धतीने अभ्यास केला असता तर आज या लेखकावर असा लेख लिहिण्याची वेळ आली नसती 🤪

तरीपण

जीवनगाणे गातच रहावे, 'सूत्र ' धार ते समजून घ्यावे पुढे पुढे चालावे

 📝( सूत्रधार) अमोल
१/१२/१९
poetrymazi.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...