उद्या शनिवार, 'बजरंग बली' उर्फ 'मारुती कांबळे' उर्फ 'मनोज जैन' उर्फ 'वाब्दुल हनुमान' यांचे स्तुती गीत सर्व योगी- मुनी- महंत- मौलवी यांच्या कृपा आशीर्वादाने 'दादांच्या ' शब्दात 📝
अंजनीच्या सुता तुला नेत्याचे वरदान
जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
दिव्य त्यांची पक्ष भक्ती, दिव्य त्यांची माया
इलेक्शन ला गेले सारे मत मागावया
आठवली मग देणी, पोकळ आश्वासन
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
कमळीला 🌷आली मूर्च्छा लागुनिया बाण🏹
राममंदिरासाठी मग उठविले रान
तळहाताने 🤚🏻 घेतला तिनेक राज्यात प्राण
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
निवडणूक विजयाची मनामधे शंका
तिथे तुझ्यानामाचा रे पेटवीला डंका
स्वयं आले सेवक, देती आता दूषण
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
आले किती गेले किती संपले भरारा
धर्म- जाती - पंथांचा परि अजूनी दरारा
सावध कर लवकरी, संपव सैतान
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त बरळतात असे का रे देवा?
घे बोलावूनी आता, कंठाशी आले प्राण
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
📝२१/१२/१८
poetrymazi.blogspot.in
अंजनीच्या सुता तुला नेत्याचे वरदान
जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
दिव्य त्यांची पक्ष भक्ती, दिव्य त्यांची माया
इलेक्शन ला गेले सारे मत मागावया
आठवली मग देणी, पोकळ आश्वासन
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
कमळीला 🌷आली मूर्च्छा लागुनिया बाण🏹
राममंदिरासाठी मग उठविले रान
तळहाताने 🤚🏻 घेतला तिनेक राज्यात प्राण
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
निवडणूक विजयाची मनामधे शंका
तिथे तुझ्यानामाचा रे पेटवीला डंका
स्वयं आले सेवक, देती आता दूषण
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
आले किती गेले किती संपले भरारा
धर्म- जाती - पंथांचा परि अजूनी दरारा
सावध कर लवकरी, संपव सैतान
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त बरळतात असे का रे देवा?
घे बोलावूनी आता, कंठाशी आले प्राण
अन् जाती -धर्मात गणला,गेला आमुचा हनुमान
📝२१/१२/१८
poetrymazi.blogspot.in
No comments:
Post a Comment