नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, November 9, 2018

दिवाळी पहाट


दिवाळी पहाट 🎇

दापोलीपासून खोपोलीपर्यंत
दिवाळी पहाट रंगली
'केंव्हा  तरी(च) पहाटे ' म्हणत
कलाकार मंडळी जमली.

'स्वर ही आले दुरुनी'
जमला आठवणींचा मेळा
फटाक्यांना ही माहित होत्या
फुटण्याच्या त्यांच्या वेळा

' त्या तिथे पलिकडे ' वाहिनींवर
आलटून पालटून लावली गाणी
' भातुकलीच्या खेळामधली'
सोबत  आली राजा राणी

कसा काय कुणास ठाऊक
'केतकीच्या बनात, मोगरा फुलला'
दर्दी रसिकांच्या कौतुकाने मग
नवोदित कलाकाराचा चेहरा खुलला

'ये रे घना, ये रे घना'
बोलावणे केले घनाला
बोल लाविले आम्हीच तरीही
अवेळी का आलास रे सणाला?

' शुक्र तारा मंद जरी वारा '
' संथ वाहते कृष्णा माई'
'उष: काल होता होता'
जो तो तल्लीन होऊन जाई

' मर्म बंधातली ठेव ही '
गाणी काळजात घुसली
' घेई छंद मकरंद' करताना
करंजी तोंडातच फुटली.

' स्वर गंगेच्या काठावरती '
वचन दिले मी तूला
' धागा धागा अखंड विणूनी'
सादर करतो ही कला.

📝७/११/१८
#दिवाळी पहाट
poetrymazi.blogspot.in
a.kelkar9@gmail.com

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...