एका लग्नाची गोष्ट ( गाणे )
( चाल : बाहुलीचं लगीन झोकात लागलं , नवरोबांन भाडणं काढलं )
तुळशीचं लगीन झोकात लागलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं
तुळशीबाई नटून अंगणात थाबंली
सेक्रेटरी येताच बोलणं हे वाढलं
सेक्रेटरी येताच बोलणं हे वाढलं
तिला नाही स्पेस म्हणे पुढे येऊन सासरा
आम्ही तुमच्या तुळशीला देऊ कसा आसरा
दोनशे रुपये मेन्टेन्सचा देऊ का हो दाखला
असं म्हणून मंडपात सगळ्यांना तो चावला
आम्ही तुमच्या तुळशीला देऊ कसा आसरा
दोनशे रुपये मेन्टेन्सचा देऊ का हो दाखला
असं म्हणून मंडपात सगळ्यांना तो चावला
तुळशीचं लगीन झोकात लागलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं
फराळाचे पदार्थ त्याच्या तोंडामध्ये कोंबले
कच-याचे मुद्दे त्याला का हो झोंबले
तरा तरा तो-या मध्ये अध्यक्ष ही धावला
कानामध्ये सेक्रेटरीच्या काहींतरी बोलला
कच-याचे मुद्दे त्याला का हो झोंबले
तरा तरा तो-या मध्ये अध्यक्ष ही धावला
कानामध्ये सेक्रेटरीच्या काहींतरी बोलला
तुळशीचं लगीन झोकात लागलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं
थोडासा फसवा , सेक्रेटरीचा रुसवा
मंडळी हसू लागली
बाळ कृष्ण आणून , अक्षता घेऊन
लग्न लावू लागली
पोरं आली, माळ लावली
सोसायटी आनंदली
मंडळी हसू लागली
बाळ कृष्ण आणून , अक्षता घेऊन
लग्न लावू लागली
पोरं आली, माळ लावली
सोसायटी आनंदली
तुळशीचं लगीन झोकात लागलं
व-हाड सुखावलं
व-हाड सुखावलं
विसंगती सदा मिळो , टुकार विडंबन कानी पडो
२/११/१७
२/११/१७
No comments:
Post a Comment